Monday, March 29, 2010

ऊन की बात...


D vitamin कमी आहे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसत जा असा सल्ला जाता जाता doctor ने दिला .

इथे च्यायला रिकामा वेळ कोणाला आहे म्हणून मी तो येता येता त्याच्याच clinic च्या dustbin मधे टाकला.

रात्री नवरयाला गमतीत doctor च्या सल्ल्याबद्द्ल सांगायला गेले तर तो भलताच गंभीर झाला.

तुला सागंतो , दुर्लक्श करु नकोस ,परवा office मधला जोश्या असाच हसता हसता गेला.

नवरे company ला अतिशय absurd काहीतरी बरळायची सवय असते हे ठाउक असूनही घास घशात अडकला.

आणि सर्वानुमते मी ऊन खाण्याचा ठराव पास झाला.....

उठल्यापासुन सगळ्य़ाचं ऊन्हाच्या कोवळेपणावर च्रर्चासत्र सुरु झाले

"नक्कि जा बर का उन्हात" , नवरयाने कामाला जाताना अर्ध्या जिन्यातुन ओरडुन सांगितले.

आणि शेवटी कंटाळुन मी एकदाची कुरकुरत गच्चीत गेले...

गपगुमान मिंटे मोजत खूर्चीत शहाण्यासारखी बसले

जरा डोळा लागला तो कोवळे ऊन समोर येउन हसले...

मी म्हटलं..आलास बाबा..., तुझीच वाट पहात होते

जरा बाजुला आलं नी म्हणालं...

तुझ घर कोणी ऊन्हात बांधलं?

[मी म्हटलं]

हे आवडलं मला, तुझं स्वत:ला ओळखुन असणं...

असले कसले तुझं दिवसचे दिवस दुनियेला भाजणं?

बाकी तुला गरम होत नाही, घाम येत नाही?

कधी एकदा पाउस येतोय असं हॊत नाही?.......

उगाच अवखळ लहान मुलानी चेहरा गंभीर करुन बोलावे तसे एक pause घॆऊन म्हणालं,

comfortable असते गं आपण जसे आहोत तसं असणं..

आधी मला उगाच वाटाय़चं...'पाऊस' असतो तर किती बरं झालं असतं?

सगळॆ जण आपली वाट पहातायत हे feeling किती मस्त

doctors पासुन कवींपर्यंत सगळ्य़ानाच तो लागतॊ

सगळ्यांच्या लाडाचा वर्षाव त्याच्यावर होतो

नी तसं बघायला गेले तर "थंडी"असणंही माझ्य़ापेक्षा बरंच

असं वाटुन वाटुन, तुला सांगतो,मधे मला frustration आलं.., खरंच...!

सारखं वाटायचं....आपल्यालाच काय lifetime negative role play करायला दिला

माझ्या निराश असल्याचा निरोप counsellor ला गेला

तुला सांगतो लक्ष कामातुन इतकं उडलं हॊतं.....

मॆ महिन्याचे उन सुद्धा जरा अशक्त झाल्यासारख. झालं हॊतं...

D vitamin कमी झाले असणार...कोवळ्य़ा उन्हात बस....मी तारे तोडले....

माझ्या p.j. ने गंभीर वातावरण जरा light झाले....

मग पुढे काय?

पुढे काय...?हं...त्या counsellor बरोबर sessions वर sessions झाली...

दिलेला role पार पाडाय़ला option नाही..तर मग तो enjoy च का करु नये हे जुने शहाणपण परत आले....

अच्छा..,हं.....,तरीच माझ्या नवरयाला कधी नव्हे ते घामोळे झाले......

तुला एक भविष्य सांगु का?

तु असेच विनोद करत राहिलीस तर लवकरच तुझा divorce होइल......

१ दा २ दा ठीक ए ..रोज कोण इतके पुचाट joke सहन करील?[ च्यायला हे उन माझ्याइतकच आगाउ आहे]

आता काही नाही...अब सब o.k., back to normal

आता नाही मनात उरलेला कसलाही सल......

नाहीतरी तुम्ही माणसं..बोल लावताच थंडीपावसाला सुद्धा

त्यामुळे तुमच्या लाडाच. होणं हा आता अगदीच गौण मुद्दा

पाउस सुद्धा मला मस्का मारायला येतो ..य़ंदा जरा जास्त तापव बघ लोकाना....

त्यानी माझी आठवण काढुन उचकी लागावी मला...

ज्याचे त्याचे आपापले egos नी आपापले लाड

असो, आता माझी shift संपत आली, तु गुमान खाली जाउन केर काढ

जाता जाता म्हणालं..बाकी सांगू नकॊस कुणाला आपल्या बोलण्याबद्द्ल

नी डॊळ्य़ांसाठी रोज एक गाजर ह्यापुढे खात चल...

चहा घेणार का विचारेन तोवर मेलं इतकं गरम व्हायला लागलं.....

लगोलग खाली उतरुन आधी थंडगार पाणी ढॊसलं..

रात्री नवरय़ाला उत्साहाने माझ्या उन्हाच्या ग्प्पांबद्दल सांगायला लागले

उन लागलं असणार तुला असं म्हणुन त्याने मला as usual गुंडाळुन टाकले

मग म्हणाला, यंदा उन जरा जास्तच ए नाही, केव्हा एकदा पाउस येतोय असं झालय..

मी जोरात उन्हाची बाजु घेत म्हटल...काही नाही जास्त... मला doctor नी कोवळं ऊन खायला सांगितलय....