Thursday, August 26, 2010

waiting room

WAITING ROOM

ती.......
तुला तसा कपडे काय असावेत ह्याचा sense नाहिच, पण fortunately तु कधी उलटा नाही घातलेलास shirt किंवा बटणं वरखाली वगेरे......
मला खुप आवडलं असतं तुझ्यासाठी shopping करायला.
पण आपल्यात तसं काही नाहीच......

काहीही assume करायचं नाही आणि काही आलं मनात तर लपवुनही नाही ठेवायचं हे आपलं ठरुन गेलय , पण तरीही उरतचं काही माझं माझ्यापाशी....
तुझ्यापाशीही उरत असेल का काही ?
तसे विशेष प्रश्न नाही पडत पण आपल्याला एकमेकांबद्दल, एकमेकांच्या past बद्दल किंवा future बद्दल ही.......
रस्ते कधीही बदलु शकतायत ना आपले, पण तोवरचा प्रवास मस्त असणारे आपला.....
काहीच "पण" नाहीत असं नाहीच, पण आपण कदाचित आपापल्या मुक्कामाला नेणाय़ा गाड्य़ा येईपर्यंत एका "waiting room" मध्ये असु बहुतेक.
माझ्याकडे तुझ्या train चे तिकिट नाही नी तुझ्याकडे माझ्या.तोवर मात्र तुझ्यासोबत "waiting room " खुप छान वाटतेय.




तो
मला complications आवडत नाहीत, पण तु आवडतेस.
हे खरं तर खुप contradictory statement आहे, पण खरं आहेच.
रोज काहीतरी emotional पसारा मांडाय़चा नी मग आवरत बसायचा छंद आहे तुला.
आणि परत तु कशी व्यवस्थित नी sorted आहेस दाखवायचा आटापिटा.
काय करावं तुझं?
दुसरयांच्या आयुष्याचा ताबाच घ्यायची सवय तुझी, पण खरच वाटत, देउन टाकावा तुला तो ताबा.
लहान मुली कसं बाहुलीला आपलीच समजुन न्हाऊमाखु घालतात, जेवण भरवुन, तीट लावुन थोपटत निजवतात तसा ताबा सगळ्य़ांचाच घ्यायची तुझी हौस दांडगी ए.
मग तुला राग आला की फटकावायला पण कमी नाही करत.
I enjoy your company .
पण म्हणून हेच "ते" नातं असंहि नाही वाटत मला.
तुला माहित्ये मला ह्या बाबतीत काय वाटतं आणि रोज दुखावली जाताना तुला बघतोय मी.
रोज उन्मळुन पडताना नी तितक्याच जिद्दिनं पुन्हा उभ्या राहणाय़ा तुझं कौतुक आहे मला.
मला सगळच माहित्ये आणि तुला ही , तरी आंधळी कोशिंबीर खेळाय़चीय़ तुला?
तुझ्या ह्या वेड्य़ा स्वभावापाय़ी खेळाय़चाही मोह होतॊ कधीतरी.
पण त्यात मी तुझ्या हाताला लागलो नाही तर चिडाय़चं कशाला?
बघ तुझा रंग लागायला लागलाय माझ्या विचाराना
अशा वेळी time please ला गत्यंतर नाही

क्रमश:

Wednesday, August 11, 2010

बेडूकउडया


अर्धवट उमललेली स्वप्न डोळ्य़ात, असे काही बिलकुल होत नाही बघा आपलं..
असलंच काही तर काल रात्रीची झोप असते उरलेली आणि आपल्याला अर्थातच न दिसणारं मुसळ........
हळुवार , नाजुक, निरागस , निष्पाप वगेरे होत असतं काय काय लोकाना......
त्या सगळ्य़ाची एक रेसिपी असते भरपुर cheese असलेली
आणि cheese तसं खुप लोकाना आवडतं
ह्रिदयाची भाषा नी मनाचे अलवार हितगुज वगेरे जातं आपल्या डोक्याच्या साडे बत्तीस फ़ुट वरुन॥
कारण
आपली स्वप्न पळता पळता fed out होतात..त्यानाच नेमके लागतात No Parking चे boards आणि red signals
मग घ्यावा लागतो u turn आणि परत आपण खुप हिंडुन परत जिथे होतो तिथेच
सापशिडीत आपल्याला साप चावत राहतो आणि त्याना शिड्या लागत राहतात
म्हणून त्याना मोगरा सुचतो आणि आपण अगर मगर करत राहातो

कलासक्त कलोपासक ,सौदर्यशोधक द्रुष्टि आपल्याला हवीच असते की पण ती पेट्रोल च्या नी तुरडाळीच्या
किमती बघुन अधु व्हायला लागते,
मग एक cup coffee की किमत तुम क्या जानो, रमेशबाबु? असल्या कल्पनांमधे सारी सारासार विचारबुद्धि
केट्य़ा खात खात fail होत जाते.
मग आपण जगतो ते सुर्याच्या ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत ,
सकाळ च्या दात घासण्य़ापासुन रात्रीच्या दात घासण्य़ापर्यंतचा आपला
प्रवास.....
चांगला वाईट ह्या सगळ्य़ाच्या पलीकडचा.......
आपण निवडलेला नी system ने approve केलेला......
त्या तोचतोच पणाचा, बुळबुळीत जगण्य़ाचा कंटाळा आला
की जरा चढेस्तोवर दारु प्यायची नी ओकाय़चं
तेवढच जरा बंड केल्यासारखं ही होतं नी हलकं पण वाटतं
पुन्हा मग आपण ह्या भारावणाय़ा, बेभान करणारया , उष्ण कविकल्पनानी भरलेल्या जगात शिव्या घालायला सज्ज होतो
कदाचित शिव्यांनीच भरलेलं जग जास्त स्वच्छ आणि sorted असावं
किंवा पचायला जड असलं तरी आपली धाव च कुंपणापर्यंची असावी.....