Friday, June 18, 2010

घर


ताडताड चालत ,दरवाजा आपटत आत यायचं, चपला भिरकावायच्या आणि पाणी आणा अशी entry गेली १५ वर्ष मारतेय माझ्या वसईच्या घरात......
ह्या घरी जेव्हा आलो तेव्हा बिटकी होते बरयापॆकी...आणि आल्या दिवशीच कुत्रा लागला होता मागे.
नवीन घराबद्दल ओढ वाटण्य़ासारखे वयच नव्हतं ते...आइबाबानी रिक्शेतुन सामान हलंवलं...त्याच रिक्शेतुन सामानाबरोबर मी पण आले....
ते घर तयार होत असताना बाबा खुपदा construction site वर जायचे...एकदा तर आम्ही सगळेच गेलो होतो..आई बाबा आणि आम्ही तिघी बहिणी...
तेव्हा तर building चा नुसताच सांगाडा उभा राहिलेला....पण बाबा पार होऊ घातलेल्या गच्चीपर्यंत घेउन गेले होते.त्याना दिसत असणार घर ...! मला आपलं as usual उड्य़ा मारायला interesting अडथळे दिसलेले..
आणि मग एक दिवस आलोच राहायला ह्या घरात.....त्यानंतर ही खुप दिवस भिंतीना रंग नव्हता...सिमेंट च्या भिंती आणि आम्ही तिघी होतोच त्या रंगवायला.....!
पण असा काही खास जीव वगेरे नाहि लागला बुवा , त्यात माझा घाम, रक्त नसेल म्हणुन असेल कदाचित...
ज्याच्या त्याच्या आपापल्या कल्पना असतात नं आपापल्या घराबद्दल!हे घर लावण्य़ात , मांडण्य़ात lead role आईबाबांचा असावा नी आपण supporting artists असावं असं वाटत राहिलं ,पण आईबाबांची "घराची" कल्पना निराळी होती....!
मग हे सिमेंट च्या रंग नसलेल्या भिंतींचं घर कधी आवरुन सज्ज वगेरे राहिलं नाही ...सदा आपलं विक्सटलेलं...कोणी य़ेणार
म्हटलं कि आवराआवरी [लपवालपवी योग्य जास्त] करताना कसली तारांबळ ऊडे....!
"माझ्या घराचं"चित्र वेगळं होतं ह्या घरापेक्षा,त्यामुळे ह्याचे तसे लाड नाही झाले, बाबाना हवं होतं तसं
मोकळं ढाकळं पण नाही राहिलं.....
रस्त्यावरचं एखादं झाड कसं त्याचं त्याचं वाढतं की तसं काहीसं स्वत:च स्वत: हे घर होत गेलं.
आमचा आरडाऒरडा,मारमारया, भांडणं ,रडणं ऎकता ऐकता त्यानं स्वत:चा आत्मा शोधला असणार
कारण कोणीही कधीही येउ लागलं इथे हक्कानं ....
आमच्या कामवाल्या बाई नवरा मारतोय भाऊ,जरा "समज द्या" म्हणायला येउ शकल्या ह्या घरात रात्री.
घराच्या दरवाज्याला कधी कडी लागलेली मी पाहिली नाही अजुन...
घर छान करुया की असं आम्ही एके काळी मागे लागायचो बाबांच्या , नी त्यानी आजवर मनावर नाही घेतलं, बाकी मग आम्हीहि तगादा लावणं सोडून दिलं.
मला खुप ओळखुन आहे पण हे घर, कधी एकटीच असले कि ऎकत राहतं मला.....नी मला काही explain किंवा justify नाही करावं लागत त्याला....
माझं स्वत:च एकटीचं असेल घर कधीतरी आणि काहि महिन्यानी आईबाबा ही मोठया नवीन घरात जातील
तशी मी भटकत असते सारखी नी खुप ठिकाणी राहते .
असं सगळ्य़ांचच होत असेल म्हणा आपापल्या घराबद्दल
पण ह्या कसलेही दागदानिने न लेवलेल्या, सड्य़ाफ़टिंग घरानं मुभा दिलीन सगळ्य़ाचीच नी बदल्यात जीव घेतला अडकवुन...
आठवण वगेरे काही येत नाही त्याची, नाहीतरी आपण कुठे आपल्याला आठवत बसतो?
आजही मी रात्री दिड वाजता येते, दार उघडं असतं.....
माझ्या आवडत्या पांघरुणात, माझ्या ठरलेल्या जागी घरात झोपुन जाते नी घर माझा निष्काळजीपणा मनावर न घेता माझ्यावर माया करत राहतं...

3 comments:

Gajanan Sali said...

मस्त पोस्ट... आणि ब्लॉग सुद्धा सही आहे...
keep it up

Sneha Kulkarni said...

Mast post aahe! aavadla ekdum.

asmi said...

@Sneha-Thanks ga..
Ani mi vachla hota tujha blog aadhi , Rohit nach kadhitari link pathvli hoti