Friday, May 21, 2010

अकबराने बिरबलला प्रश्न विचारला......
भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?
बिरबलाने एका वाक्यात उत्तर दिलं-" न फ़िरवल्याने"
तसच काहिसं झालय ....
कामाचा mood का लागत नाहिये?
एखादं affair का करावसं वाटत नाहिये?
बेडूक का ओरडत नाहीयेत?
"सोप्पय, पाउस न आल्याने"!
सगळे plans , सगळं भविष्य , सगळ्या गोष्टि जणु काही त्याच्यावर अवलंबुन आहेत....
हल्ली घरात कोणी काहीं म्हणालं, तरी त्याला एकच उत्तर देतेय मी
घर कधी आवरणार आहेस?- पाउस आल्यावर....
अगं जरा पाय चेपुन देशील का?-पाउस आला न कि लग्गेच.....
बिल भरायचय, नविन script लिहायचीय़,फ़िरायला जायचय अशा सगळ्य़ाच गोष्टीना मी पावसाचा मुहुर्त लावतेय हे बघुन बाबा म्हणाले, बर मग लग्न कधी करतेयस?
ताडकन म्हटल खरं- पाउस आल्यावर, मग जिभ चावली....नी वर -पावसातच करणारे हो, फ़क्त ह्या पावसात असं कुठं म्हटलय मी? as usual माझी गिरी तो भी टांग उपर...!
पण आवडेल मला खरं तर धोधो पावसात लग्न करायला समुद्रावर एखाद्या धुसर पहाटे......!
आत्ता म्हणाल तर ढग हळुहळु जमायला लागलेत काळे डगले घालुन....
गच्चीवरच्या टाकीवर जाउन त्यांच्याशी गप्पा मारत बसायचं.- आपल्या नेहमीच्याच गोष्टी हो.....
वरच्या दुनियेत सारे काहि आलबेल ना वगेरे?
एखादा हिरमुसुन , आक्रसलेला पांढरा ढग जरा वाकुन कानापाशी य़ेतो नी म्हणतो.....येवढी झळ सोसली अक्खा उन्हाळाभर तरी माझ्या पोटी नाहीच आलं बघ पाणी...
अजुन कितिदा होरपळाय़च उरलय कोणास ठाउक, बाजुनं एखादा उतरु आलेला त्रुप्त काळा नभ पाहुन तो सुस्कारा टाकतो....
मग तसाच तरंगत विरत हवेत हरवुन जातॊ...
ह्य़ा वेळी तरी त्याला घनघोर बरसायला मिळणार नाही........!
टाकीवर आडवं झाले कि वरुन लगबगीनं सावरत निघालेले ढग दिसतात.....एक दगड जरी मारलेला लागला नेमानं तरी फ़ुटतील इतके भरलेले.....
पण त्यांचं destination ठरलेल असताना कशाला आपण अडवा...आपल्यासाठीच्या ढगांमधे पाणी भरलं जातय अजुन! no peoblem
आपण थांबु अजुन जरा वेळ असा निरोप काळ्या मेघाना वेशिपर्यंत सोडाय़ला गेलेल्या त्या पांढरया ढगाकडे देउन मी पुन्हा खाली य़ेते....
अगं जरा नाक्यावरुन दुध घेउन ये असं आईने म्हटल्यावर , "पाउस आल्यावर" असं म्हणाय़चा मोह टाळून बाहेर पडते....
येता येता गुलजार ची गाणी कानातुन मनात , नी मग अंगभर बरसायला लागतात....जुने पावसाळे black n white photos सारखे तरळाय़ला लागतात.
दुध घेउन घरी य़ेताना एका वळणावर वीज चमकते नी light जातात....
हे M.S.E.B वाले पण पावसाची वाट पहात असणार.....लोक त्या पावसात रमुन निदान दोन दिवस loadshading च्या नवने कमी शंख करतील ....
अशाच एका पावसाळ्य़ात समुद्रावर गेले होते...भेळवाल्याकडॆ ओली भेळ नव्हती....धुसफ़ुसत घरी जाताना धो धो पाउस आला नी माझी सुकी भॆळ भिजवुन गेला.
२६ जुलॆ चा अक्खा दिवस marine drive वर बसुन , भिजत उधाणलेला समुद्र बघण्यात घालवलाय....

पाउस हा basically भिजण्यासाठी, वाहुन जाण्य़ासाठीच असतो....
ते" वाफ़ाळता चहा नी कांदाभजी’ वगेरे वर्णनं करुन typical नका करु माझ्या पावसाला.....
तो येतोच मुळात य़ेतॊ नव्या उत्साहानं, नव्या आठवणीत भिजवायला
कुठे डोंबलाची छ्त्री नी raincoats काढताय बाहेर
तुमच्या काळ्या छ्त्रीकडॆ बघुन हसेल तो नी वारयाला सांगुन पार उडवुन लावेल ती....
don't be a spoil sport
छत्री नी raincoats मुद्दामुन विसरा घरी, भिजत जा office मधे..A.C. त जाउन कुडकुडल्याचा अभिनय करा
bike वरुन पुन्हा भिजायला बाहेर पडा...खरय़ा पाउसप्रेमीना पाउस कद्धीच बाधत नाही....
आणि कोपरयावर जाउन नुसतं नखशिखांत भिजत रहा.....
कण न कण भिजला अंगाचा की मग मोकळॆ आपण पावसाच्या इतर तरहांसाठी....!
घरी पोचेस्तोवर पाउस येणारे हे माहित असते नी म्हणुनच पावलं घराकडॆ वळत नाहीत......
प्रचंड भिजल्यावर आई किवा बाबांकडुन खसखसुन डोकं पुसुन घ्यायला काय मज्जा येते राव....

2 comments:

shri... said...

te baki ...lagnach..correct lihlays...

Jaswandi said...

aayla tujhi hi post vachlich navhati... bhannat lihila ahes..