Wednesday, August 11, 2010

बेडूकउडया


अर्धवट उमललेली स्वप्न डोळ्य़ात, असे काही बिलकुल होत नाही बघा आपलं..
असलंच काही तर काल रात्रीची झोप असते उरलेली आणि आपल्याला अर्थातच न दिसणारं मुसळ........
हळुवार , नाजुक, निरागस , निष्पाप वगेरे होत असतं काय काय लोकाना......
त्या सगळ्य़ाची एक रेसिपी असते भरपुर cheese असलेली
आणि cheese तसं खुप लोकाना आवडतं
ह्रिदयाची भाषा नी मनाचे अलवार हितगुज वगेरे जातं आपल्या डोक्याच्या साडे बत्तीस फ़ुट वरुन॥
कारण
आपली स्वप्न पळता पळता fed out होतात..त्यानाच नेमके लागतात No Parking चे boards आणि red signals
मग घ्यावा लागतो u turn आणि परत आपण खुप हिंडुन परत जिथे होतो तिथेच
सापशिडीत आपल्याला साप चावत राहतो आणि त्याना शिड्या लागत राहतात
म्हणून त्याना मोगरा सुचतो आणि आपण अगर मगर करत राहातो

कलासक्त कलोपासक ,सौदर्यशोधक द्रुष्टि आपल्याला हवीच असते की पण ती पेट्रोल च्या नी तुरडाळीच्या
किमती बघुन अधु व्हायला लागते,
मग एक cup coffee की किमत तुम क्या जानो, रमेशबाबु? असल्या कल्पनांमधे सारी सारासार विचारबुद्धि
केट्य़ा खात खात fail होत जाते.
मग आपण जगतो ते सुर्याच्या ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत ,
सकाळ च्या दात घासण्य़ापासुन रात्रीच्या दात घासण्य़ापर्यंतचा आपला
प्रवास.....
चांगला वाईट ह्या सगळ्य़ाच्या पलीकडचा.......
आपण निवडलेला नी system ने approve केलेला......
त्या तोचतोच पणाचा, बुळबुळीत जगण्य़ाचा कंटाळा आला
की जरा चढेस्तोवर दारु प्यायची नी ओकाय़चं
तेवढच जरा बंड केल्यासारखं ही होतं नी हलकं पण वाटतं
पुन्हा मग आपण ह्या भारावणाय़ा, बेभान करणारया , उष्ण कविकल्पनानी भरलेल्या जगात शिव्या घालायला सज्ज होतो
कदाचित शिव्यांनीच भरलेलं जग जास्त स्वच्छ आणि sorted असावं
किंवा पचायला जड असलं तरी आपली धाव च कुंपणापर्यंची असावी.....

No comments: