Wednesday, September 22, 2010

रात्र

रिकाम्या रस्त्यांवर, रात्री अडीच ला bike कडेला लावुन भंकस करायला किती मजा येते

रात्रीला भारुन टाकलेल्या पिवळ्य़ा प्रकाशाला company असते एखाद्या टपरीवरच्या रेडिओची.

अशा किंचीत थंड वेळी उकळणारया चहाच्या वाफ़ा ...

आणि अखंड बडबड



आडगावच्या एखाद्या station वर शेवट्ची train चुकली म्हणून आपल्यासोबत थांबलेली रात्र

नी सकाळी घेतलेल्या times of india चं अंथरुण पांघरुण

मधेच झोप उड्वुन जाणारी एखादी तुफ़ान मेल

आणि शांतता


lights गेल्यावरही पुर्ण अंधार न होणाय़ा शहरातल्या रात्री नी अंधार दिसावा म्हणून

कंदिल लावाव्य लागणाय़ा गावातल्या रात्री

अशाच एका प्रचंड काळोख्य़ा गावातुन चालताना काजव्यानी पेटलेलं झाड डोळ्याच्या कोपरयात कुठेतरी राहुन गेलय़

कधीतरी रात्रभर शहरातली वीज गेलेली निघुन नी नजरचुकीनं जाणवलेलं आभाळ

आणि चंद्र



पावसाचं नी रात्रीचं affair सुरु असतंच ब्रेक अप न होता

भले भांडणं कीती ही होवोत

कधी रात्रीला हलके हलके बिलगणारा पाउस तर कधी तिला चिडवणारा

भांडण होऊन निघुन गेलेल्या पावसाची वाट बघत ताटकळत असलेली रात्र

आणि तिच्यात मुरत जाणारा पावसाचा गंध



रात्रीची भितीबरोबरची link तशी बरीच जुनी

पण रात्र मला दिवसापेक्षा जास्त passionate नी spontaneous वाटते

नी जरा किंचीत वेडीच

म्हणजे दिवस वाटतो एखाद्या responsible माणसासारखा सतत कामात बुडलेला

त्याचं सगळं कामाचं गणित बिनसवुन टाकणारी रात्र

नी हसते वर त्याच्याकडे बघुन , बघता बघता लपेटून घेते जगाला

आणि हळूच दिवसाला म्हणते good night


No comments: