Wednesday, September 22, 2010

आणखिन एक मुर्ख theory

प्यार करने के लिये दिमाग की नही, दिल की जरुरत होती हे?

ok.... ह्या thoery नं जाउन पाहावं तर रस्त्यावर १० १२ देवदास , ४० ५० तुटलेली दिलं नी sad songs लागतात वळणावळणावर

.....बरं ..अरेरे म्हणून परत निघावं तर काही जख्मी दिलं

तेवढयातल्या तेवढ्यात पुढचा धक्का खाउनपण आलेली असतात...



संप्रेरकं, ग्रंथी, मेंदु , स्त्राव ठरवतात मला प्रेमाबद्दल काय वाटतं ते?

हे ऐकुन तर मला hotel चं kitchen बघु नये म्हणतात ते एकदम पटलंच

आमचं प्रेम आंधळं नाही, वाहावत जाणारं नाही असं म्हणणारया बुद्धीवाद्यांच्या पाठीमागुन,

पटली/पटला नसेल, असा कोल्ह्याला द्राक्ष आंबट सुर लागतोच



अलीबाबा नेमका कुठल्या घरात ए हे कळावं म्हणून एका चोरानं त्याच्या दारावर म्हणे फ़ुली मारली होती...

ही idea चांगली आहे नइ,म्हणजे दारावर दस्तक देण्य़ापुर्वीच कळावं

अर्थात अलीबाबाच्या दासीनं त्याला वाचवण्य़ासाठी सगळ्य़ाच दारांवर फ़ुल्या काढून ठेवल्या होत्या

म्हणजे accidents नी risks ला scope भरपुरच

पुण्य़ात कसं CAD B घ्यायला गेलं की पैसे देउन बाहेर उभं राहायचं

आणि मग आपला no flash होत राहतो,कळतं तरी की no कधी लागणार

काहीतरी एखादी system असावी नइ अशी



किती ही नाथा कामत ची चेष्टा केली तरी त्याच्या ठेचा खरयाच असतात की नी

त्याला काही painkiller नसतात ,

३ वेळा घ्या आठवडाभर नी खडखडीत बरे व्हा असं काहीतरी असायला पाहिजे होते

मग जळल्या नसत्या रात्रीच्या रात्री कढत पाण्य़ानं

ह्या गाढव ballad करत नाचणाय़ा दिलामुळे वाया जातात दिवसचे दिवस

current status committed असणाय़ा बहुतेकाना कावीळ झालेली असते

पण हरलेल्या किल्लेदाराच्या चेहरयावर एक समाधान पण असतं दिलोजान से लढल्याचं

ते कसं कळावं किनारयावर उभं राहून?



राजपुत्राला सांगितलेलं असतं ७ व्या दालनात जाउ नकोस , धोका आहे

असं म्हटल्यावर तो धोका पाहायची उत्कंठा त्याला भाग पाडते

तसच असावं काहीसं प्रेमाचं



होतच असं नाही खरं दरवेळी

पण कहाणी सुफळ संपुर्णच असावी ज्याची त्याची

किती आवडत्या , नावडत्या वळणावरुन , राक्षस, दुष्ट जादुगार , चेटकीणी नी डोंगर ओलांडुन पार केलेल्या गोष्टिचा निदान शेवट happy च असावा


No comments: