Wednesday, September 22, 2010

not a very happy ending

तुला आठवतं का?

station वर एकदा train ची वाट पहात होतो संध्याकाळी...आणि समोर एक train already उभी होती..ladies compartment च्या बाहेर एक मुलगी "इंतजार" types expressions मधे दरवाजात ताटकळत उभी होती...

train सुटणार एवढ्यात तिचा आशिक तिथे आला....आणि अख्ख्य़ा दादर station च्या साक्षीने त्याने एकदम SRK style मधे तिला flying kiss दिला........

हमसाहमशी रडतात खरं तर, पण मी हमसाहमशी हसुन लोळाय़ची बाकी होते platform वर...आणि तु आपला," काय वाटेल त्या आशिक ला", ह्याचा विचार करत ,हसं दाबायचा प्रयत्न करत होतास.............

कधी विसरु नाही शकणार त्या couple ला, इतक्यांदा त्यांना चघळलं आपण.

समस्त loud प्रेम करणारयांची आपण य़थेच्छ रेवडी ऊडवली कायम नी त्यात एकमेकाना loveletters लिहिणारया नी अलवार हळुवार प्रेमकाव्य करणाय़ांची तर विशेष...........

आपण normal होतो , always logical होतो...आपल्याला त्यांच्यापेक्षा खुप जास्त कळतं एकुणच जगण्य़ातलं नी प्रेमातलं असा आपला समज होता.

परवा seminar ला राहुल भेटला होता..त्याने सांगितलं तुझ्या recent break up बद्दल......मी तर अजुनही"आपल्यातुनच" बाहेर नाही पडलेले ..पण मान्य नाहीच करणार मी...

nyway...felt really sad for you

आणि हो ..त्या आधी परवा अचानक ती train वाली आणि तिचा आशिक दिसले असेच....ती जरा जाड झाली होती....पण छान दिसत होते ते एकत्र

हसायला नको होतं नई आपण इतकं?


No comments: