सकाळी दुध आणायला बाहेर पडले नि बाकी किरकोळ खरेदी ......
आता काय काल मेले लोक , वाईट वाटलेच पण म्हणून आज खाऊ नको कि काय ? मग गेले बाहेर ...
अशा वेळेला न वातावरणात इतके opinions  तरंगताना दिसतात ....
विषय अर्थात भाजीवाल्यांपासून सगळ्यांचा हाच असतो , 'मुंबई अब सेफ नाही' 
Channel वाले हे मुंबई चे स्पिरीट आहे की नाईलाज वगेरे चे नेहमीचे फुटेज दळत असतात ...........

काल संध्याकाळी भीती कशी पसरत जाते , प्रत्येकाला आपण कसे मरणार आहोत असे वाटायला लागते , भीती एका नजरेतून दुसऱ्या नजरेत pass on व्हायला लागते ते पहिले .
 एक स्टेशन ला  भेटलेली मैत्रीण म्हणली - 'उद्या पडायचे आहेच न बाहेर , घाबरून काय करणार ' आवडले मला ..
वेफर्स खात ट्रेन मध्ये बसलो 
आजूबाजूच्या ब्लास्ट्स च्या गप्पा ऐकून कान बधीर झाले ..कानात गाणी लावली आणि पोचले घरी ..........

आज आपण सगळे,' चक चक वाईट झाले'वगेरे करणारच आहोत , निषेध करणार आहोत , सरकार , पोलीस नि intelligence वाल्यांना शिव्या घालणार आहोत , सोशल नेट्वर्किंग साईट वर मते नोंदवणार आहोत ....

बाकी मग चहा , नाश्ता , जेवण नि उद्या जिंदगी न मिलेगी दोबारा ...........

एका हाताने टाळी वाजत नाही , संसार रथाच्या एकाच चाकावर चालत नाही वगेरे विचार खूप ऐकलेत आपण .....
पण सरकार ला देश चालवायला दिलाय तर तो कसा ...आमची जमीन तुम्हाला कसायला दिलीय , करा काय वाटेल ते .. हवे ते पिक घ्या , नाही वाटले तर नका घेऊ ......
सगळ्या जबाबदाऱ्यांचे नाही होऊ शकत यार out sourcing ........
अण्णा हजारे ना आमचा support आहे कुठे तर फेस बुक वर ?
 एखादी व्यक्ती गेली तर आम्ही तिच्या account  ला जाऊन RIP  लिहिणार ?

आम्ही का  शिकणार का ते माहित नाही , पण generally पैसे कमवायला जी एक सर्वमान्य पद्धत आहे तिची पायाभरणी शाळेत वगेरे होते .....काही ज्ञान वगेरे मिळालेच तर तो शुद्ध side effect  समजावा ....
स्वप्न तर अर्थातच बघतोच ...पैसे , सुख , परदेश , सपनो की राणी , सौदागर , आणखी पैसे , मोठे घर , मुलांची शिक्षणे , त्यांची लग्न , त्यांची स्वप्न ....
आता ह्या सगळ्यात अण्णा हजारे ला आमचा support आहेच की ,नाकारतोय कुठे ?

चख दे मध्ये शाहरुख काहीतरी म्हणतो त्या मुलीना वैतागून ..".मी आधी देशासाठी खेळतो" वगेरे असले पाहिजे ....नि त्या मुलींसाठी 'आम्ही आधी  आमच्या स्टेट साठी खेळतो ' असे असते .

"आम्हीतर फक्त  आमच्या आयुष्यासाठी खेळतो , आमच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू , मी , मेरा छोटा परिवार , सुखी परिवार असतो , मग बाकी काही जोडलेली नाती वगेरे आणि क्रिकेट"! .....अर्थात 

बाकी मग शनिवार रविवार जेवण जरा वेगळे असते तेंव्हा राजकारण वगेरे चवीला , तोंडी लावायला छान वाटते .
एक catharsis  नावाचा प्रकार आहे , माणूस जेंव्हा नाटक म्हणा , सिनेमा किंवा काही वाचतो , तेंव्हा समोरचा असेल  रडत , ह्याला हि भरून येते , दुक्ख त्याचे नसले तरी , पाणी गळते जरा नि हलके वगेरे वाटते ....
तसे अंगातली रग,  नी कोणावर हि न काढता येणारा राग राहुल गांधी , कसाब , पाकिस्तान , अमेरिका , महागाई ला शिव्या घालून काढला की तात्पुरते हलके व्हायला होते , मग पान बदलून कोणत्या हिरोच्या आयुष्यात काय होतंय  , नी कुठे कसला सेल लागलाय वगेरे वाचण्यात वेळ जातोच .

सुट्यांमध्ये काय करायचेय , insurance policies, मुलांच्या शाळा , डबे वगेरे ह्यात आता आम्ही कुठे लक्ष घालत बसायचे .......? कोणी केले बॉम्बस्फोट , कसे केले , किती मेले  , ह्याचा विचार करण्यापेक्षा ..आपले लोक आहेत न जिवंत ..नशीब , बाकी ईश्वर मृतात्म्यांना शांती देओ चे संदेश अमेरिका , पाकिस्तान नी जग भरातून आलेले आहेतच .....

नुसतेच बोलणे नी बरळणे ह्याहून,  एक तर जे अनेक लोक त्यांच्या त्यांच्या परीने जे जे काही करतायत , त्या त्या करण्यात सक्रीय सहभाग घ्यावा , आजूबाजूला काय घडतंय त्याचा थोडासा अभ्यास करावा , आपल्याला काही मार्ग सापडत असेल तर तो कसा सगळ्यांपरयंत पोचेल ह्याचा विचार करावा , रिंगणात उतरून पाहावे तिथून जग कसे दिसते ते 
नाहीतर एक त्याहून सोपे आहे खूप ....
बोलू नये बिलकुल ......!