Thursday, July 28, 2011

पहचान

बंद खोलीत आवाज फक्त दया माया नसलेल्या पावसाचा
अंधार overflow होत असताना
नी पाणी भिंतीतून गळत
अंगात , मनात झिरपताना प्रश्न हाच पडतो
"हा तोच आहे पाऊस"?, ज्यावर माझे डोळे मिटून प्रेम आहे ?

पण ह्याला कसली चव नाही , गंध नाही , भावना नाही
ह्याला फक्त झोडपणे ठाऊक
नी ओळखीचे असले तर फक्त लोकांच्या अंगावरचे शहारे
कशाचा तरी सूड उगवल्या सारख्या ह्या कोसळण्याचे पावसाशी सावत्र असावे नाते

हवेतला उत्साह नी जिवंतपणा शोषत आकाश कोसळत राहते
खिडकीबाहेरच्या अंधाराला अधोरेखित करत


डोळ्यावर sunglasses चढवून , हातपाय चेहऱ्यावर sunscreen lotion थापत ,
रुमालाने उन्हाला क्षणोक्षणी टिपत ,
हाताच्या बोटावर जाणारा प्रत्येक उन्हाळी दिवस मोजत ,
office मधल्या A .C . कॅबीन मध्ये बसून रखरखीत हवा भावनाशुन्य चेहऱ्याने निरखत असताना
काचेबाहेर एक रेष वरपासून ओघळत येते
काचेच्या आतूनच आपण ती धार पकडू पाहतो
वर कडाडलेल्या विजेचा झटका लागून, उन्हाने करपलेले अंगातले काहीतरी, अचानक जिवंत होते
नी बधीर झालेल्या कानांना संजीवनी मिळते, मोजता न येणाऱ्या अंतरावरच्या ढगांच्या आवाजाने .
एक तप करून देव प्रसन्न झाल्यावर जे feeling येईल तसे होते काहीतरी
आणि सुरु झालेली बरसात बघून सुखावलेले जग पाहून मीच माज करत म्हणते ,
"हा तोच" , ज्याच्यावर मी डोळे मिटून प्रेम केले.