Friday, July 29, 2011

उजळण्या

आनंद कितीदा overflow होऊन वाहतो अंग खांद्यावरून ? मुंबईत फक्त सकाळचे दोन तास येते पाणी तसा limited व्यक्त होतो तो ..
जखमा मात्र अश्वथामासारख्या ...चिरंजीव ....
डोळेही दुक्खाना धार्जिणे

तुकारामांनीही दुक्ख डोंगरा एवढे नी सुख जवापाडे का म्हटले असेल ?
Freud च्या theories ना मन हे जन्मतः "अपुऱ्या दिवसाच्या बाळासारखे" नाजूक असते , हेच सापडावे अभ्यासातून ?
वेदनेशी नाळ जोडलेली असणे काही ठाऊक नसतानाही ?
जन्माला येण्यापुर्वीच माहित असलेली भावना
जिवंतपणाची पहिली खुण म्हणजे रडणे ?

नवीन काही फार शिकत नसावा माणूस .
हे त्या अभिमन्यू सारखे आहे
जन्मापुर्वीचेच धडे गिरवण्यात मश्गुल असताना चक्रव्युह भेदायचे राहून जाते
गृहपाठ पूर्ण होत नाही
परत आणखी काही जन्म त्याच त्याच चुका करण्यात घालवायचे

ट्रेन मिळाली नाही कि चरफडायचे ...
मनासारखे झाले नाही की वैतागायचे
आजूबाजूच्या लोकांच्या मतांनी आपले सुख मोजायचे
ते अर्थातच कमी पडणार असते कायमच

dieting कसे जड जाते करायला नी smoking ची सवय सुटणे तसे कठीणच
तसेच असेल कदाचित
कण्याचे अश्रूंशी नाते असेल जवळचे
तर आनंदाची allergy च होणे साहजिक ए
मग उमललेल्या फुलांपेक्षा लक्ष माना टाकलेल्या फुलांकडेच जायचे
नी स्वतःच्या रडण्याने सुरु झालेले आयुष्याचे वाक्य इतरांच्या रडण्याच्या पूर्णविरामाने संपायचे