Saturday, December 1, 2007

"भुकंप"म्हणून काहितरी असतं आणि त्यात इतर लोक सापडतात,हे नक्कि....तसंच "प्रेम" म्हणूनही काहीतरी असतं आणि त्याबद्द्ल "इतर" लोकाना माझ्य़ापेक्शा जास्त माहित असावं अस माझ्या निदर्शनास आणून देण्य़ात येत होत -गौरि देशपांडे



Mr.And Mrs.Iyer ,Chini Kum,Dil Se,Yuva,Bombay.....ह्य़ासारखॆ अनेक चित्रपट,बेगम अख्तर, गुलाम अली,फ़रिदा खानुम,आबिदा परविन ह्याच्या गझल्स, जुनी हिन्दि गाणी,आमच्याच घ्ररातल Made for each other couple[अर्थात माझॆ आई बाबा] कविता,आणि प्रामुख्याने गौरी देशपांडॆ ह्या सगळ्य़ानी मिळून मला खुप गोधंळात टाकले आहे.



म्हण्जे मला अस कायम वाटत आलय कि आयुश्यात ज्या ज्या घटना होतात किंवा "ह्या ह्या वेळी हे हे होते "हे जे काही असतं ते गेल्या शेकडॊ वर्शात शॆकडॊ लोकानी तसं केलं म्हणून ........
"एखादी गोश्ट व्हावी ह्या बाबतीतला आपल्या मनाचा "कौल"१००% फक्त आपला असतो तेव्हाच ती करण्य़ात मजा असेल...


आमच्या कामवालीचंही Lovemarriage झालयं हे कळ्ल्यावर मी मुर्खासारखे म्हणालेही........अरे मग मीच काय पाप केलय.....????????स्वत:च्या बौद्धिक ऎपतीनं प्रेम करत असणारे सामान्य पाहिलेत.......आणि प्रेमात आधंळ्य़ासारखे पडून वेड्यासारखे वागणारे हुशारसुद्दा पाहिलेत........


प्रेमाच्या छ्टा कळणारे......न कळणारे........सगळॆच प्रेम करतात.......इथेच खरी गोम आहे......घॊळ आहे......


आणि म्हणूनच प्रेमात पड्ण्य़ाचा अट्टाहास नसला तरी.....प्रेम ह्या सुन्दर सन्कल्पनेबद्दल प्रेम निश्चित आहे........


ज्याच्या साथीन प्रत्येक दिवसाची सुरवात व्हावी.......ज्याच्याकड्न काहीतरी नेहमीच शिकावस वाटाव .......जो बरोबर असतानाहि ......आणि नसतानाहि .....सत्तत जवळ भासावा.......ज्याच्या साथीन जग पहाव.......पुस्त्क वाचावीत.........गाणी ऎकावित..... ....ज्याच्याबरोबर स्वयम्पाक करावा......ज्याच्याबरोबर मस्ति करावि.......रात्रिबेरात्रि उठून गप्पा माराव्यात.......ज्याच्याबरोबर रडावं.......ज्य़ाच्यामुळॆ स्वत:साठी जगावं........ज्याच्यावर रोज उठून प्रेमात पडाव....वेड्य़ासारखे आणि मुर्ख वागावं......... भांडुन ज्याचं भुस्काट पाडावं.......असच खुळ्य़ासारखे काहितरी ........बरंच


पून्हा हा प्रश्न उरतोच वर.......कि हे असे वाटण हे स्वाभाविक असते की असेच conditioning झालेलं असतं मनाचं........


असो ............Sometimes i really feel what if i don't meet him.......n the thought is really really scary......मला जो अभिप्रेत आहे तो .......त्याच्याशिवाय जगणं सोप नसेल......आणि त्याचि जागा कोणीच घेउ शकत नाही.......किती गुंता हा.......
मला भॆटला तो कि आधी भांडणार आहे इतका उशीर केला म्ह्नणुन ...........तुर्तास रोज वाट पाहणं इतकंच हातात आहे.......


अदिती..








6 comments:

a Sane man said...

chhan! :)

aDi said...

कांदेपोहे हे गाणं(जे तू ही पोस्ट लिहीलिस तेव्हा अस्तित्वात नसणार) या फीलिंगचंच प्रातिनिधिक रुप आहे असावं
का असा प्रश्न मनात आला?
विचार अगदी प्रांजळपणे मांडतेस.
आणि एकदम थॉट प्रव्होकिंग...
मस्त पोस्ट!

sagar said...

भरपूर मोठी comment टाकणार आहे सो जेवण करून येणार असलीस तर ये. किंवा popcorn तरी घेऊन ये at least :)
१. तुझ्या पहिल्या post वर comment टाकणार होतो. पण त्यात expected नसताना direct (चांगला) फोटोच निघाला. आणि मग त्या फोटो वर comment केल्यासारखं होईल म्हणून या second last post वर comment टाकतोय (जपून असतो मी सहसा). हि comment पूर्ण blog साठी आहे .

2. एकदा तुझ्या 'Blog Archive' कडे नजर टाक. तीनेक वर्षे झाली तू लिहिते आहेस इथे. blog content मधला change observe कर. तुझ्या सुरुवातीच्या posts एकटेपणावर, कंटाळ्यावर आणि थोडीसे Pessimistic आहेत. पण नंतर नंतर हा ट्रेंड ओसरला आहे. जगाच्या चिंता (हा एकटेपणावरचा रामबाण उपाय असतो) सोडून मग तू हलक्या फुलक्या विषयांकडे वळलीस...आणि latest posts तर जास्ती relationship centered आहेत. i guess that u got married somewhere in that time (end of 2009 ?) :D. असो. सो हा जो आपला प्रवास असतो ना तोच दिसतो Diary/Blogs मधून. परत मागे वळून पाहताना चांगलं वाटतं. काय होतो आपण २-३ years back आणि आता कसे आहोत.
अजून एक, बहुतेक ज्या इराद्याने तू ब्लोग लिहिणे सुरु केलंस कदाचित माझी हि start तिथूनच झाली असेल. i found a very loyal partner in my blog.
पण आता तू इथवर पोचलीस.हे नक्कीच चांगलं आहे. शेवटी 'Blog Archive' काही फक्त लोकांना Navigate करायला नसतात. आपलीच जुनी पावलं आपल्याला दिसत असतात आणि त्याच्या आजूबाजूच्या वाटा सकट. Correct me if i am wrong. मला लोकांबद्दल guesses करायला आवडतं किंवा मला blogs च्या मागच्या feelings पण समजतात कदाचित..

३. आणि अग बाई, नावं दे कि पोस्ट्स ला .... आता तुला पोरं झाली तर त्यांना असंच बारश्याविना ठेवानारेस का ? "अर्रे माझ्या 'खूप जावळ वाल्या बाळा' काय झाला ?", "का बरे रड्तीये माझी 'टपोऱ्या डोळ्यांची पोर' ?", किंवा "आलेले का भूक लागलीये 'नकट्या नाकाच्या' पोराला माझ्या ?" किंवा अगदीच "'टकलू' कुठे निघाला माझा ?" ....असं थोडीच न म्हणणारेस तू त्यांना ? काहीतरी नावं ठेवशील ना पोरांची तुझ्या ? ठेव कि मग पोस्ट्सची नावं काहीतरी..
आता कोणी दुसर्याने suggest केलं तर वाईट दिसेल. आजकालचे आई-बाबा खूप possesive झालेत पोरांबद्दल. कोणी दुसर्याने नाव सुचवले तर म्हणतील "9 महिने आम्ही वाढवलाय, आम्ही केलीये planning त्याची अगदी नावापासून. तुम्ही कोण उपटसुंभ नाव सुचवणारे" blogs च्या बाबतीत पण आपण असेल possesive असतो ना ? तर बघ बाई ठेव काहीतरी नावं .. (किंवा तू G.A. खूप वाचलंय का ? GA कुलकर्णीनच्या कथेतील बहुतेक पात्रांना, नायकांना नावं नसतात. intentionally आहे का हे ?)

4. लिहित राहा अशीच. पुढच्या 5 वर्षांनतर वळून पाहायचं ना ? :D
Happy Blogging !

p.s. (चूक भूल देणे घेणे. मला ते "सुंदर", "अप्रतिम", "भारी" अश्या कामचलाऊ, वेळ मारून नेणाऱ्या, वरवरच्या comments द्यायला नाही आवडतं.
आणि अगदीच नाही आवडली हि comment तर delete कर बिनधास्त. No Worries )

asmi said...

@sagar- tassech pahije na mag...kharakhure sapsht.
"bhadabhada kautuk karne ni danadana shivya dene hi marathi sans-sruti" -ase aple PU.LA. mhanalet nahitari
tenva te tasech rahude.
baki majhyatlya badalabaddal mhanshil tar aadhi mi jara jast avghad hote, ata kami avdhad hotey haluhalu itkach...
baki lagn vagere nahi kelele bua mi ajun ekdahi!
ni bolat rahuch ata asech bharpur

asmi said...

@sagar- email id kai bua tujha?

sagar said...
This comment has been removed by a blog administrator.