Monday, December 31, 2007

खिडकीबाहेरची रोषणाई......झगमगाट.....रस्त्यावरचे उत्साही चेहरे तिला नकोसे झाले होते....उबग आला होता तिला त्या सगळ्याचा.घरभर अंधार लावुन,जुने चुरगळलेले कपडे घालुन खिड्कीजवळ बसली होती कधीची.....
नवीन वर्षाच्या स्वागताची इतकी ज्ल्लोषात तयारी?इतकी....की आपल्या बरोबर असणाय़ा गेल्या अख्ख्य़ा वर्षाला त्या नादात घाईघाईत निरोप देउन टाकावा..?भविष्यकाळाची एवढी ऒढ?सरसकट विचार केला तर ,आयुष्य चाळुन पाहिलं तर आपण ज्या गोष्टिना कवटाळून जगतो त्या म्हण्जे आठवणी...कडू..गोड..मग असे असतानाही नविन वर्षाब्द्द्ल इतकि खात्री की य़ॆताना ते बरोबर आनंद्च आणणार ...इतकं फसवाय़चं स्व:तलाच....एक वेळ होती जेव्हा तिलाही असंच वाटायचं....पण आताशा य़ॆणारं प्रत्येक नवीन वर्ष स्वप्नांची फसगत करुन जातं य़ा मताला ती पोचली होती.
कधीची केलेली coffee थंडगार..एक कोपरयात पडून होती...घरात तिला पुरुन उरेल इतका अंधार होता...तेहि तिच्याचसारखं काळॊखंलं होतं आतुनबाहेरुन...तेहि सहन होइना तिला...त्याच तिरमिरीत उठुन धाडकन दरवाजा आपटुन बाहेर पडली
बाहेर माणसंच माणसं होती..उत्साहाने भारलेली...तिच्या अंगावर शहारा आला....तिला वाट्लं...ऒरडुन सांगावं बंद करा हा ज्ल्लोष, हे celebration...निराशा....दु:ख,त्रास, हे सारं काही असणार आहे नवीन वर्षात...तेंव्हा ग्प्प बसा...आणि घ्ररी जा....प्रार्थना करा हे वर्ष कमी अपेक्शाभंगाचं असेल...एक शांत जागा सापडॆना तिला कुठे....
त्याच तिरमिरीत निघाली पाय फुठॆल तिथे....लोकाना , गर्दीला टाळत...भान हरपुन ,कशाच्या तरी शोधात...??????
चालताचालता ती पुलापाशी आली....वारा खुप होता....बोचरा...आणीक तिला हवा तसा एकटेपणाही....तिनं वाकुन खाली पाहिलं.....नज़र जितकी खॊल जाउ शकेल तितकं...उडी मारण्य़ाच्या कल्प्नेच्या मोहात ती कायम होतीच...पण तेवढी हिंम्मत तिच्यात कधीच नव्ह्ती....आणी मनातल्या त्या भयावह,अवाढव्य अंधाराचं काय कराय़चं ते हि काहि कळेना.....पुलाजवळ बसून ती ऒक्साबोक्शी रडाय़ला लागली.खुप वेळ रडल्यावर तिला बरं वाट्लं...थकलेली....गलितगात्र ...बसुन राहिली तिथेच न जाणे कितीक वेळ...
मग कधितरी तिचा सेल वाजला.....त्याचा msg होता....कुठॆ आहेस?घरी आलोय़.वाट बघतोय.ति तिच्याच नकळत उठली....धावतपळत निघाली ,आली होती तशीच भान हरपुन, त्याच्या ओढीनं
रस्तयावरुन पलीकडे जाताना तिला त्याच्या आवडीची फुलं दिसली...तिनं घेतली पटकन..नाक्यापाशी आल्यावर तिच्या लक्शात आलं घरात काहीच नाहीय़ॆ खायला...तिनं थोडी फळं, दूध आणि ब्रेड घॆतला ...आणि लगबगीनं घ्ररापाशी आली
तो बाहेर उभा होता...शांतपणे....दरवाज्याला रेलुन...काहितरी गुणगुणत
तिनं दार उघडलं...दोघं आत आले...त्याला दिसला तो फक्त काळॊख आणि तिला दिसली दार उघडताना आलेली प्रकाशाची तिरीप..तिनं सांगितलं नाही तरी त्याला समजत होती तिची घालमेल...तिचे विचार.
ती फ्रेश व्हायला आत गेली...त्याने घरातले मंद दिवे लावले....त्यांच्या आवडीची गाणी लावली....वाफाळत्या coffee चे मग्स हातात घेउन खिड्कीपाशी आला
ती बाहेर आली....तिला अंमळ रागच आला त्याचा....तिच्या मनात, विचारात , मुड्स , आयुष्यात घुसखोरी करण्याचा.
ति ही खिड्कीपाशी गॆली...कःहितरी बोलणार एवढयात त्यानं तिला जवळ घेतलं आणि म्हणला....तसं सगळंच एकुण कठीण ,वाइट आणिक दु:खाचंच असतं in gegeral....तसंच पाहात राहिलो आपण तर....म्हणुण प्रयत्नपुर्वक मजेत रहायचं....आणि मनापासनं केलास प्रयत्न तर काहि वेळानं सवयीनं आपोआपही राहता येतं आनंदात....अंधारात फार वेळ नाही राह्ता येत फ़ार काळ....त्रासच होतो....म्हणुन दिवे, सेलेब्रेशन....आणि ह्याला फसवणं नाहि म्हणत...हयालाच जगणं सुसह्य करणं असं म्हणतात ....असं करून बघ..सोपं जाइल जरा...
तिनं त्याच्याकडे पाहिलं....त्याच्य मंद हसणारया...धीर देणाय़ा चेहरयाकडॆ ....काठोकाठ पाणी भरलेल्या नजरेनं....आणि त्याच्या कुशीत शिरली पटकन डॊळे पुसून ....
तो तिच्या कानात हळुच म्हणाला..... रडुबाई..wish u a very very happy new year.
ती म्हणाली...to u too.
आणि त्याच्या मिठीत ....खिडकीबाहेरची रॊषणाई....झगमगाट....उत्साह पित राहिली....

5 comments:

ओहित म्हणे said...

याला पुर्वार्ध किंवा ऊत्तरार्धही आहे काय?

Sneha said...

sundar...

guess_bunzy said...

Aawdla!!... Khoop kahi nahi lihilas asa watatay!!... But still ... Good!!

Amol

Nupur said...

chaan lihilay.. Detailing mule jast impact yetoy.. GOOD WORK!

sagar said...

"अंधारात फार वेळ नाही राह्ता येत फ़ार काळ....त्रासच होतो....म्हणुन दिवे, सेलेब्रेशन......."

खरच कि ग !