Thursday, December 6, 2007

रस्त्यावरुन चालताना
माझं बोट सोडून .....मन हळूच निसटतं...
धावतं..नाचत सुटतं....उडतं....बागडतं...
अन....पडलं ...वा आदळ्लं जमिनीवर....
की फुरंगटून बसतं...
अरे ...बघ की जरा आजुबाजूला... चारजणांचं ऐकावं ......
डॊळॆ उघडून जमिनीवरुन चालावं...हे साधं गणित कधी तुला उमजावं.....?
तर हळूहळु सावरत ...
माती झटकत उभं रहात ..
वर मलाच सुनावतं....दुसरयाच्या ठेचेनं मी कसं शहाणं व्हावं....?

अदिती......

2 comments:

ओहित म्हणे said...

छान आहे ब्लॉग ... आधीचा पोस्ट आणि हा पण. लिहीत रहा ... बोले तो keep writing [:)]

asmi said...

अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद......
फोटो अप्रतिम आहेत अर्थात हे मी सांगायची काहीच गरज नाही म्हणा......
काही जण लिहीतात ....खूप छान लिहीतात.....पण काहीजण फ़ार कंमी शब्दात खुप मस्त आणिक शब्दांच्या पलीकडच सांगतात....
तुझं काहीसं तसं आहे....
anyways wd like to talk to u.....to share d thouthts......
मैत्र ही सुद्धा एक मोठी मजेदार आणिक जपण्य़ासारखी गोष्ट असते......