Tuesday, December 4, 2007

दिवस उघडला.....रोजच्यासारखाच.....नियमित आणि सातत्याने गेल्या ह्जारो दिवसासारखाच......स्टॆशनवर अशीच अतिशय एकसुरी......एकाच छापाच्या चेहय़ाची गर्दी.......आणि ह्या गर्दीच्या लोंढ्याला पोचायच होतं आपापल्या पोटाच्या खळगीला जिवंत ठेवण्य़ासाठी, आपला जीव,रक्त,घाम विकत घेणारयांकडॆ...

ट्रेन पकडणं ही देखील survival of the fittest सारखी जीवघॆणी कसोटी असतॆ....तीत पार होउन लॊकानी गर्दीत ट्रेनमध्ये चढून शक्य तेवढा जीव भांड्य़ात टाकला.....ह्य़ा गॊष्टीतली तीही कशीबशी लोकलमधे चढली.......ती नवीनच होती शहरात..... त्यामुळॆ तीला सवय नव्हती अजून.....अनेक गोष्टींची.....

बायकांच्या ड्ब्यात चौथ्या सीट्साठीची भांडणं,फेरीवाल्यांकडून वस्तु विकत घेणं,पाय़ावर पाय पड्ला म्हणून बाचाबाची,के सिरीयल्समधल्या नाय़िकांच्या संकटांबद्दल सामुहिक चर्चासत्रं,विणकाम...शिवणकाम,रामनाम जपणं,सोत्त्र म्हणणं..... ते म्हणतानाच शॆजारचीला शिव्या घालणं इत्यादि गोष्टी चालल्या होत्या....ती आपली पहात होती........

ट्रेन आपली धावत होती.......तिच्या आतल्या विश्वात काय चाललय.....ह्याबद्दल काडीचाहि रस न घेता.....आणि तिचं आयुष्यसुद्धा त्यांच्यासारखंच होतं....सॆकंदाचीहि उसंत न घेता....त्याच त्या रुळांवर रोज धावणारं....रुळलेलं.....रूळांशी जोडलेलं.......आजुबाजूच्या रुळांवरून धावणारया ट्रेनमधुन उतू जाणारी माणसं[वेल.....मला म्हणायचय.....पुरुष....आणि सगळॆच पुरुष...माणुस असतात असे नाही...] शक्य तितक्या हावरट नजरेने समोरच्या ट्रेनमधल्या शक्य तितक्या बायकांना चाटत होते........असे सगळ्य़ांचं काहिबाही चालु होतं आणि तेवढ्यात वेगात धावणारी ट्रेन......शक्य तितक्या वेगात थांबली.......आणि ट्रेनमधल्या चर्चेला वेग आला.काहींचं मस्टर चुकणार होतं,लेटमार्क लागणार होता,मिटिंग्सना उशिर झाल्यानं अडचण होणार होती....ऎकूण काय प्रत्येकाचं स्वत:च्या टीचभर जगात उलथापालथ होणार होती...
ट्रेन थांबल्या थांबल्या मोटरमनला शिव्या घालुन झाल्या....थोडी वाट पाहुन झाली तरीही ट्रेन सुरु होइना.....म्हणून काही उत्साही लॊक खाली उतरले.....दरवाज्यात लटकलेला एक गाडीखाली आला होता.......
काहीजण हळ्हळले......काहीजणानी घड्य़ाळाकडॆ पाहून ...चकचक ....उशिर होणार आता....अशी प्रतिक्रिया दिली..........काहीना मात्र फार उत्सुकता होती....कसा आला गाडीखाली....?आहे कि मेला.....?
ती सुन्न झाली......तिनं अशा मरणाबद्दल फक्त ऐकले होतं,वाचलं होतं.....पण आज पहिल्यांदाच ती असा अपघात पहात होती........
तो आ वासुन मरुन पड्ला होता......अर्थात त्याला त्याब्द्द्ल काहिच पड्लेली न्व्हती.....infact after a long time he had stressless rest.....as now he was free from deadlines......as he was dead...dead forever.....
तिला वाटंलं......हे असं मरण?एका क्शणात तो आहेचा होता झाला......आणि आपण आपलं जगतोच आहोत........पिपातल्या मेल्या उंदराचं जिणं...........
तिचं लक्श कशात लागेना........ती ट्रेनंमधुन उतरली.......दिवस उजाडला.....तसा मावळला........
आणखीन एक दिवस......कालच्यासारखाच........ती ट्रेनमधे चढली.......बायका काल मेलेल्या माणसाची गोश्ट चघळत होत्या.......लटकलेले पुरूष तो नेमका का आणी कसा पडला....ते तावातावात सांगत होते......
ट्रेन ऐकत होती आणि धावत होती......जगण्य़ासाठी रोज मरणाय़ांचे लोंढे घेउन धावत होती.......निर्लेप......
तिलाहि सवय होइल हळूह्ळु.........
तो मात्र सुटला........बाकि सारे मरतील रोज तीळतीळ.........

अदिती.....

3 comments:

Prashant said...

अत्यंत धक्कादायक,

"अर्थात त्याला त्याब्द्द्ल काहिच पड्लेली न्व्हती"

मला माझा अनुभव आठवला... अगदी अंगावर काटा आला वाचताना.

aDi said...

सुरुवातीचा "शक्य तेवढा जीव भांड्य़ात टाकला" हा शब्दप्रयोग भारी वाटला!
पण पुढे वाचत गेल्यावर वेगळंच फीलिंग आलं...
दिस पोस्ट इज लाईक इटर्नल ट्रुथ ऑफ लाईफ!

shri... said...

"तो मात्र सुटला........बाकि सारे मरतील रोज तीळतीळ........." last line apratim....