Sunday, December 16, 2007

कंटाळा ....कंटाळा.....कंटाळा.....

त्याला टाळा.........दुर पळा.........

तावडीत सापडाल तर खरं नाही.......

ह्या रोगाला औषध नाही........

आणि रोग फार जालिम.....

हळूच घेइल तुमचा जीव.

हसणं.....रडणं.....जगणं....मरणं.............

सारं जग दिसेल पिवळं.....

वाचाल तरच..... ऎकाल जर......

prevention is better than cure..........

उतु नका मातू नका.........

घेतला वसा टाकू नका......

देते मंत्र विसरु नका.......

म्हणणं माझं नीट ऎका......

आपल्यातच लपुन असतो कंटाळ्य़ाचा किडा.......

त्याला आधी बाहेर काढा.........

सापडाय़चा नाही असातसा..........

जीव होइल कसंनुसा

हळूच घ्या झडती मनाची...........

आवडती जागा ती सेतानाची........

नावडतीच्या विश्वाची......

नको त्या रंगांची....नको त्या माणसांची..........

ती अडगळीची खोली आधी साफ करा.......

आपल्याच चुकलेल्या भुतकाळाला माफ करा..........

मग आपल्यालाच उमगेल रोगाचं मुळ....

आपल्याच मनात वाढत असतं कंटाळ्य़ाचं कुळ.....

स्वस्थ बसे तोचि फ़से....तेंव्हा रिकाम्या वेळाला मारा गोळी......

कंटाळा जाइल....कंटाळुन निघुन......मरेल किड वेळ्च्या वेळी......

बाकीची गंमत पुढल्या वेळी......

अदिती.....


5 comments:

ओहित म्हणे said...

केवढे ते ’ळ’ ... वाचताना मात्र आजीबात कंटाळा नाही आला [:)]

Tulip said...

केवढी ....ती ....टिंब...... असं नाही का वाटलं रोहित तुला?:P :))) neways.. me just kidding Asmi. pls don;t mind:D.
छान लिहित आहेस तु.
मराठी ब्लॊग विश्वात स्वागत.

Tejaswini Lele said...

mast!!

a Sane man said...

sahich!

aDi said...

मस्स्स्त!
"आपल्याच चुकलेल्या भुतकाळाला माफ करा..."
ही लाईन फारच सुंदर!