Saturday, July 2, 2011

तुझे माझे

चित्र कुठले काढायचे त्याचा विचार न करता चित्रकार नुसताच canvas समोर उभा राहिला तर ?
एक एक रेघ दुसरीला बोलवत गेली ....दुसरीहून तिसरी लांब झाली ...चौथी वर्तुळात हरवून गेली आणि त्यांनी चित्र बनवले ...चित्रकाराने फक्त सुरवात केली हातात पेन्सील धरून ........

इतक्या प्रचंड गर्दीत गाणी ऐकायला मला मजाच येऊ शकत नाही असे मी बत्तीस वेळा म्हणूनही मला गीतुने आणि वैभ्याने नेलंच ओढून ......
संगीताचा गर्दीवरचा प्रभाव प्लेग सारखा असतो , एक मेल्यावर सगळे पटापटा मारून पडायला लागतात , असे मी म्हटल्यावर मला कसे दाखवलेच पाहिजे काय असते मजा असे परस्पर ठरवून मला नेण्यात आले ......
गीतू नि वैभ्या गर्दीत एकजीव झाले ....उकडलेला बटाटा आणि वाफवलेले मटार एकजीव करतात patice साठी तसे ......मला लोकांना बघून मजा येत होती ...गाणी सुरु होती मागे .......मधेच कान सुखावून जात होते ही .....
पण जसे bike वरचे दोघे पडले एकाच वेगाने , एक सारखेच तरी लागते वेगवेगळे न .....दुखते वेगवेगळे .....तसे गाणे ही गर्दीतल्या प्रत्येकाला वेगळे भिडते ....
मला गाणे एकटीसाठी हवे असते ....
गाणे एका वेळी एकासाठीच असावे ......वैभ्या म्हणतो तसे त्याचे एका वेळी एकीच वर प्रेम असते तसे .....!

'गाणे बघणे पहिल्यांदाच बघतोय, .....बाकी गाणी ऐकायची असतात बहुतेक'.

तू पहिल्या क्षणापासून आगाऊ होतास .......
चेहऱ्यावर माज नी मिश्कील हसू
काही लोकांना ते कसे ही राहिले नी काहीही घातले तरी चांगलेच दिसतं त्या पैकी एक .....
उगाच काहीतरी तुझ्याच इतके आगाऊ उत्तर द्यावे असे आले ही मनात ....

'मला नाही आवडत इतक्या गर्दीत गाणे ऐकायला' ....

मला जे आतून जे वाटते ते इतक्या पहिल्या क्षणापासून तुझ्याकडे बोलत आलेय .....ओळख झाल्याच्या पहिल्या वाक्यापासून .....तुला आहे त्याहून वेगळे किंव्हा खोटे काही सांगावेसे वाटले नाही नी त्या नंतर कधी तुझ्या डोळ्यात बघितल्यावर खोटे बोलता आलेही नाही ....नजर चुकवून बोलायचे अयशस्वी प्रयत्न तू पाव सेकंदात हाणून पाडलेस ......

'तुला नाही कळणार'.....

हे ही तुलाच जमू जाणे .....

तू ओळखतोस तरी का मला ? उगाच अशी विधाने कशाला करावीत .....?

जोरात बोल ..ऐकू येत नाहीये .....

जाऊदे न .......मला असे लोक ही आवडत नाहीत जे आधीच ठरवून टाकतात समोरच्याला काय वाटत असेल किंव्हा नसेल ते .......


मी कशी तुला बघून इतकी इम्प्रेस झाले होते की, ऐकू येत नाहीये नी त्यामुळे नीट भांडता येत नाहीये असा बहाणा करून मीच कसे बाहेर जाऊन बोलूयात असे suggest केले असे तू नेहमीच म्हणत आलास .......नी मी नुसती हसत आले त्यावर ...

bandra ला होते ते concert ...
Delhi, समुद्र , बनारस , अबिदा , Run Lola Run , लहानपण , पोलिसांनी पहिल्यांदा कसे पकडलेले तुला , मी गटारात कशी पडलेले .....
marine drive ला जाऊन तिथे ६ कप वेगवेगळ्या flavors चे ice cream खाण्यात ३ वाजले

काही लोकांना डास आवडीने चावतात , तसे तुझ्यावरचे प्रेम जाहीर करायला पोलीस अर्थातच आला तिथे ..
आपल्याला हटकले
आपल्याला एकमेकांची नावे ही माहित नाहीत म्हटल्यावर त्याला आपला हेतू शुद्धच वाटला असणे साहजिकच होते ....
मला हसू आवरत नव्हते आणि त्याला राग .........

वैभ्या नी गीतुचे फोन शेवटी घेतले मी त्यांच्या अनगिनत missed calls नंतर ....शिव्या खाल्ल्या नी नंतर वैभ्या शी काहीतरी पंधरा मिनिटे वाद घालायला लागल्यावर तू येऊन फोन बंद केलास
बंद केलास ?
इतका ताबा पहिल्या भेटीपासून घेता आला माझा ?
माझ्या सारख्या मुलींबरोबर असा माज केला की त्या खपवून घेतात असे म्हणून मला बाकी मुलींमध्ये २२ दा जमा केलंस त्यानंतर ............
आमच्या घराखाली सोडलस मला नी मागे न वळून बघता तडक गेलास निघून ........मी ही खाली उभी वगेरे नव्हतेच राहिलेले .....
पण मला आपली पहिली मुलाकात तुझ्यापेक्षा जास्त आवडते , ह्यात तुला राग कसला येतो इतका ....मला moments वर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम येते कधी कधी ह्याचा ?

एक आठवड्यानंतर रात्री मी नी गीतू पराठे लाटत जब we मेट बघत होतो ...तेंव्हा रात्री १६ वेळा बेल वाजवलीस ........
खून करायच्या पवित्र्यात गीतुने हातात लाटणे घेऊन दार उघड्लेन .....
तुला तीन मिनटे बघितलन नी काही न बोलता दार बंद केलंन .....
.
मला येऊन म्हणली .......अग्ग्ग , बाहेर एक असा कोणीतरी आलाय ......ज्याच्यावर माझी वाईट नजर गेलीय .....ती बाहेर उभी असलेली व्यक्ती किती भयानक handsome, hot , उंच बिंच, केसांचा रंग , कपडे , बूट .....हातातले घड्याळ , mobile कोणत्या कंपनी चा वगेरे सगळे यथेच्च यथा शक्ती वर्णन केल्यावर तिला आठवले की तिने तोंडावर दार लावलेन नी त्या पाठोपाठ प्रश्न पडला की असा कोणीतरी आपल्याकडे काय करतोय .....तू कुरियर वाला असणे शक्यच नाहीये , आणि माझा एखादा असा मित्र मी तिच्या पासून लपवून का ठेवेन वगेरे वाद नंतर घालायचे ठेवून , make up करून गीतुने दार पुन्हा उघड्लेन .....

तू ती बेशुद्ध वगेरे पडावी ह्या हेतूने हसलास .....

ती mute झालेली नी तू मला म्हणलास ....पंधरा मिनटात तयार हो ..आपल्याला जायचंय ....जरा एक चक्कर मारून येऊ ....१५ २० मिनटे
कुठे ते सांगायची पद्धत नाहीच तुला नाहीतरी .......

मी 'जब we मेट बघतेय पण'
गीतू ह्या उत्तराने नक्की बेशुद्ध पडली मनातल्या मनात
तुझ्या डोळ्यात पण एक अक्क्खे मिनिट अविश्वास तरळून गेला .....
मी बाहेर घेऊन जातोय नी हा माज ? असा वाला ......

पण मी ही इतक्या सहज तुला शरण नव्हते येणार ..पहिला डाव तू जिंकल्यावर तर नाहीच ...
ठीके ए , मग picture संपल्यावर जाऊ .....
हां...बघू ....असे काहीतरी मोघम उत्तर दिले मी .....

पराठे खात आपण तिघांनी picture पहिला .....

त्यानंतर बाहेर जायला मला कंटाळा आला असे मी म्हणणार होते ....पण तू थांबला होतास इतक्या वेळ म्हणून मग नुसते कपडे बदलून आले तुझ्याबरोबर ....

१५ २० मिनटे कधीतरी पूरलीत का आपल्याला ?
अर्थात पुन्हा पहाट उजाडली घरी परत यायला .....
ह्या वेळी ही तू नंबर नाही मागितलास .......तुझा दिलास

'मला वाटते , मी माझ्याकडून योग्य तितके efforts घेतलेले आहेत , ओळख वाढावी म्हणून ....आता तुला बोलावेसे वाटले तर तू फोन कर ..नाहीच केलास तर ही आपली शेवटची भेट आहे .It was really nice meeting you .
पुन्हा एकदा सुसाट निघून गेलास .......

तुला कधीच नीट निरोप घेता येत नाही ....


मी ही हट्टी आहेच पण.....
मला तुटेपर्यंत ताणायला कसे आवडते हे मला त्या दोन आठवड्यात गीतुने १ लक्ष वेळा सांगितले .......
१२ वेळा दुध उतू गेले , त्या २ आठवड्यात सगळ्याच्या सगळ्या पोळ्या करपल्या , सगळ्या assignments तीन तीन दा करायला लागल्या
एका रात्री झोपेत मी तुला काहीतरी सांगतेय असे वाटून जाग आली ..
.तू असणार नव्हतासच ....ह्या आधी कधी होतास ? पण ह्या आधी का नव्हतास आणि ह्या आधी कितीदा आठवण आलीय हे सांगायला न राहवून रात्री अडीच ला फोन केला ....तू पंजाबमध्ये होतास ......

खूप बदाबदा बोलेन असे वाटलेले , पण अर्धा तास रडलेच फक्त तू पंजाब मध्ये आहेस हे ऐकून
तो मी केलेला पहिला फोन .....जिथे रडलेच फक्त नी ये please इतकंच अध पाव वाक्य

तू ही कमी हट्टी नाहीस ......
चार दिवसात यायचा होतास तो चांगला एक आठवड्याने आलास
मला माझ्याहून जास्त प्रेम दुसरयावर करायला नाही आवडत ......माझे माझ्यावर प्रेम असते तेंव्हा माझे ही माझ्यावर प्रेम असणार असते ....दुसर्यांच्या बाबतीत ह्याची काय खात्री ? आणि एकदा माझे लक्ष माझ्या वरून उडले की परत तिथे येणे कठीण ...
तू उडवलेस ते ......आणि मग मजा बघत बसलास

आधी गीतूचा फोन नंबर मिळवलास , तिला अपोआप गायब व्हायला सांगितलस .....
तिच्यावर काय गारुड केले होतेसेच तू ....ती कशाला तुझ्या शब्दाबाहेर जातेय ........?

मला झालेला तुझा ताप ...कोणामुळे माझा मालकी हक्क गेलाय स्वतः वरचा हेही इतके झोंबत होते .....राग नसा नसात भरला होता ...पुन्हा तुला फोन करायचा नाही हे स्वतःला दार क्षणाला बजावून द्यायला लागत होते नी सगळे ओकायला गीतुही नव्हती घरात ....

मोठ्याने गाणी लावत कांदा कापत रडत होते नी तू दार वाजवलस.......
रडक्या चेहऱ्याने दार उघडले
बाहेर तू उभा होतास .....
बघत बसलो मग कोन आधी हरतेय ते ...

एक सणसणीत कानाखाली वाजवायची इच्छा आली मनात .......
तू मारलेले मला किती लागेल ?
पाटीवर लिह्ल्यासारखा स्वछ कसा ओळखता येतो तुला माझा प्रत्येक भाव ?

कांदा कापतेय म्हणून पाणी आहे डोळ्यात ...तुझ्या प्रेमात रडत नाहीये मी .........
अर्थातच ....मान्य केले तर दुखेल न तुला ?
आता ही इतके धावत माझ्याकडे यायची इच्छा असताना , मीच मिठीत घ्यायला हवंय हाच हट्ट आहे न तुझा ? हरकत नाही .....



तेवढ्यात गीतू आली .....इतके वाईट timing ? ते गीतुलाच जमू शकते पण .....गम्मत म्हणजे तिच्या बरोबर वैभ्या ही होता .....
तू त्या दोघांसमोर ही किती सहज मिठीत घेतलस मला .....निखळ का काय असते तसे ...............



तुझे माझे नाहीचे ....तुझेच ए ....
तुला कुठे पर्याय असतो ?

1 comment:

Guruprasad Naigaonkar said...

laeech bhari aahe he.........