Saturday, May 1, 2010

लहानपणी कधीतरी बोधकथा नी लघुकथांसारखा प्रकार वाचला होता, बाकी ज्या ज्या गोष्टींमधुन काही शिकायचे असते..त्यांच्याकडे लक्षपुर्वक दुर्लक्ष केल्याने बोधकथांचे पण जरा राहुनच गेलेय खरं! पण साहित्याचा न मला तो किंचीत आगाउ अविष्कार वाटत आलाय! वाचा आणि बोध पण घ्या...असो गोष्टि म्हणुन वाचायला मजा आली हॊती
आणि वाटलं नाहीतरी संपादकाच्या मताशी तो सहमत असतोच असं नाही , तसच बोधकथांमधुन बोध इतरानी घ्य़ाय़चा असल्याने ते काम त्याच्यांवर सोडुन देता येते..
शिवाय बोधकथा लिहिण्यासाठी जितका स्वत:ला न कळलेला विषय घ्यावा तितके उत्तम...इतका scope असल्यावर प्रेमासारखा अगम्य आणि अख्ख्या जगाने चावून , रवंथ करुनही न संपलेला विषयच हाती घ्य़ायचा ठरवलं.
फक्त एक बदल आहे...बोधकथांचं सोपे असते काय बोध घ्यायचा ते निश्चित कळते, ह्या प्रकारात ते लिहिणाय़ाच माहित नसल्याने त्याला दुर्बोधकथा हे नाव जास्त समर्पक वाटतं....!


दुर्बोधकथा -१
...आणि त्यांचे भांडण झाले.
दिवसातलं फोनवरचं ८ वं आणि प्रत्यक्षातलं ३ रं.
मुसमुसत ती बेडरूममधे गेली .bag भरुन धाडकन दरवाजा आपटुन तडक बाहेर पडली.
तो ही तिला जाताना पाहत राहिला
साडे पाच तास पुर्ण अबोला , msg नाही काही नाही, निरव शांतता!
"बरयाच दिवसानी कळतय शांतता क्या चीज हे , नाहीतर हल्ली विसरायलाच झालं हॊतं", असं स्वत:शीच काहीबाही बडबडला....
बेल वाजली. दार उघडलं.
तो धाडकन आत शिरला.
एका हातात bag आणि दुसरया हातात तिला घेउन बाहेर पडला.
चालता चालता १२ व्य़ा मिनीटाला तिला खेकसुन म्हणाला, "तुझ्यासारखं कोणालाच भांडता येत नाही.."




दुर्बोधकथा -२
येता येता तिनं दोघांसाठी ice cream चे कप आणले २.
तिला खर तर पटकन अधाशासारखं खाउन टाकायच असतं ice cream
धीरमुळी निघत नाही
पण तो यायचाच होता अनायसे थोड्याच वेळात. दोघानी खाय़ला मजा येइल आणखी, म्हणुन ठेवलन fridge मधे.
जरा काहीतरी आणाय़ला बाहेर पडली
धापा टाकत तो मित्राबरोबर आला.
च्यायला, काय उकडतय म्हणुन गार पाणी ढोसायला त्याने fridge उघडला
आतमधे ice cream पाहुन कायच्या काय गार वाटले त्याला.
एक कप मित्राला दिला, उरलेला उडवून टाकावा असं जाम वाटलं त्याला...
ती आली .आल्या आल्या जाउन आधी fridge उघडला.
आत एकटाच ice cream चा कप पाहुन खट्टु झाली
फुरंगटुन आत गेली.
मागुन तो आत आला.चमच्याने ice cream तिला भरवत म्हणाला, च्यायला, किती वाटलं खाऊय़ा म्हणुन, पण ठेउन दिलं तुझ्यासाठी...
दोघानी एक कप पुरवून खाल्ला खुप वेळ... ice cream च छान असणार म्हणा ते.




दुर्बोधकथा ३
लग्न कसं करायच ह्याबद्दल तिच्या काही कल्पना होत्या.
लग्न कसं करायचं ह्याबद्दल त्याच्या तशा काही कल्पना नव्ह्त्या, त्यात काय विशेष असतं करण्य़ासारखं? हिच असली तर एक कल्पना होती.
त्यानी लग्न कसं करावं ह्याबद्दल दोघांच्या घरच्यांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या बरयाच कल्पना होत्या.
एक तर मुळात लग्न आणि ते ही एकमेकांशीच , ह्या conclusion ला यायला त्यानी बराच वेळ घेतला होता तर नेमकं लग्न कसं करायचं ह्या मुद्द्यावर काही ताळमॆळ जमेना,,,,
साधं कस करावे लग्न हेच ठरत नाही तर कसे झेपणार नंतर असा प्रश्न दॊघाना पडला...
रात्रभर लोक ह्या बद्दल चर्चा करत बसले होते.
सकाळी office ला जाता जाता एका देवळात त्यानी लग्न करायचं ठरवलं. bike देवळाबाहेर लावून त्यानी फ़ोनाफ़ोनी केली , त्या दिवशी त्या रस्यावरच्या traffic jam कारण वेगळच होतं...
तुम्हाला नातवंडाना सांगायला आम्ही already एक गोष्ट दिली की आम्ही..., कसं react व्हावे ते न कळलेल्या रुसलेल्या आईबाबांची समजुत काढण्य़ात लग्नाचा पहिला दिवस सुखात संपला......




दुर्बोधकथा ४
"उद्या सकाळि लवकर उठुन national park ला जाउयात फ़िरायला"?शुक्रवारी रात्रि ११ साडॆ ११ च्या मानाने तिला सुचलं
खरंतर deadlines शी लढता लढता शुक्रवारी पार मेटाकुटिला आला होता, त्यात उद्या सकाळी लवकर उठायच्या कल्पनेने झोपायची मजा संपलीच!
पण तिचा उत्साह उतु जाणारा चेहरा पाहुन त्याला नाही म्हणवेना....
"जाउयात बरं का, असं उसन्या उत्साहाने म्हणता म्हणता झोपलाच तो...
त्याच्या दमलेल्या चेहरयाकडे बघुन मग उगाच हट्ट केला असं तिला वाटलं
त्याला किंचीत थोपटुन . त्याने mobile मधे सेट केलेला ६ चा अलार्म तिनं बंद केला.
मधेच कधीतरी पाणी प्यायला म्हणुन तो उठला, किती वाजले ते बघावं म्हणून cell पाहिला तर अलार्म बंद केलेला होता.
शांत झोपलेल्या तिला जवळ घेउन मग तोही झोपला परत.
"national park मधे सकाळी आले कि काय मस्त जातो दिवस" कुठ्ल्यातरी झाडाच्या पानांशी खेळणाय़ा तिचा फोटॊ काढता काढता तो म्हणाला.

5 comments:

ओहित म्हणे said...

"दुर्बोधकथा" हे नाव सोडलं तर बाकी सगळं मस्त होतं! सिरीज सुरू राहील ही आशा ... मजा येतेय वाचायला! :)

NM said...

I agree with Sangram... Durbodhkatha nako :)

हेरंब said...

वा.. मस्त आहे एकदम !! आवडलं..

asmi said...

@Herambh- thank u!

shri... said...

दुर्बोधकथा 2, chaaan vatli...