Monday, May 3, 2010

निरर्थकाचं लोणचं

सकाळी उठली ती....

काल ह्याच वेळची पहाट प्राजक्ताच्या फुलासारखी टवटवीत होती ....

मग आज विझु विझु पाहणाय़ा पणतीसारखी मलुल का सकाळ?

तिच्याच पोटात बहुतेक भावनांचे खोल डॊह असावेत.

बेतानं काहीच जमेना....

धो धो बरसणारय़ा पावसाच्या व्रुत्तीनं जन्माला आलेल्या तिला, थेंबथेंब, रिमझिम ह्या तरहा माहितच नव्हत्या.

बरं, त्या भावना दुसरयांचे देणं असायच्या।त्यांचा वर्षाव करायला कोणी मिळालं नाही की त्यांच्या भाराने वाकुन , दमुन जायची ती पार...

असा झगडा स्वत:बरोबर जन्मापासुनचा...

तिच्या अपुर्णत्वाची जाणिव इतकी तीव्र नी त्याबद्दलची खंत, खेद नी संतापही तेवढाच टोकाचा!

आनंदसुद्धा अंगाखांद्यावरुन निथळायचा तिच्या आणि दु:खसुद्धा अंधारात दिसु येईल इतकं तीव्र .......

रोजचा दिवस म्हंजे नवं struggle , मग अख्ख्य़ा आयुष्याचा वगेरे विचार करायला लागली की बिथरायचीच

आजुबाजुला दिसणारय़ा सगळ्या आधारांवर जाउन धडकायची मग , एक तर ते तुटेपर्यंत किंवा ती भानावर येईपर्यंत...

अशाच न आवरत्या येणारया mood मधे बाहेर पडली ती आज.

कोणतीच गोष्ट वेळेवर होत नव्हती, रीक्षा वेळेवर मिळेना, station ला गेली तर काहीतरी motormen चा strike होता नी सूर्य़ तापतोय वर बागडत..तिला जाम सुधरेना..

राग काढावा कोणावर ....?

१० १५ २० २५ मिनिटं गेली...train चा पत्त्ता नाही, सगळ्या गोष्टी कशा तिच्या मनाविरुद्धच होतायत ह्या बद्दल कुरकुरुन झालं .

बाजुच्या रुळावर काम करणारय़ाआ बाइचं रांगतं मुल कडकडीत तापलेल्या रुळावर उघड्य़ा अंगानं एकटंच मजेत खेळत हॊतं.

ह्या क्षणापुरतं ते तिला शहाणं करुन गेलं....

अशाच क्षणानी, अनुभवानी, माणसांकडनं आपल्याला मोठं व्हायला लागणार,कारण डॊळ्य़ात अंजन घालायला कोणितरी लागणारच आपल्याला सदा ह्या कल्पनेने नि:श्वास सोडत ती गाडीत चढली.......

No comments: