Saturday, May 8, 2010

त्यांच्या घरात ते चौघे....तो , ती आणि त्यांच्या २ मुली.....
ते दोघे पस्तिशीच्या घरातले, थोरली वयवर्ष ७ नी बिटकी ४ ची.....!
घर म्हणजे उपद्य़ापाचा कारखाना त्यांचं....!वडिलपणाची जिम्मेदारी त्याच्या एकट्य़ाकडे होती....रोज कडकडुन भांडण्य़ारया मुलींचे भांडण ती सोडवायला जायची नी मन लावुन त्यांच्याहुन मुल होउन तन्मयतेने भांडाय़ची....
त्यामुळे चुकून कधीतरी तिला आईपणा सुचला तरी मुली तिला फ़ार entertain करत नसत.तिला बिल्कुल खपत नसे ते! अतिशय गंभीरपणे जेव्हा थोरली बाबाच्या पाठीवर बसुन फ़िरताना ती तिच्या division मधल्या अनिकेत शी लग्न करणार असल्याचे सांगायची तेव्हा तिच चक्क जळफळाट व्हायचा...!मुली फ़क्त आपल्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करतात, timepass वगेरे, seriously घेतच नाहीत १ पैसा आपल्याला हे तिचे ठाम मत.....
संध्याकाळी मुलींबरोबर फ़िरणं, खेळणं , भांडणं सुरु असताना तो आला की मुली मुळीच तिला दाद द्यायच्या नाहीत....नाठाळ आहेत कारट्या असे नेहमी म्हणायची ती.....
एकदा कधीतरी बिटकी हिचं ऐकुन ऐकुन तिलाच बोलता बोलता नाठाळ म्हणाली.....तो हसत सुट्ला खोखो नी ही चाट.....
संस्कारच नाहीत कारट्य़ांवर असे म्हणता जिभ चावुन थांबली कारण काय सांगा...उद्या हे हि बिटकीनं उचललं तर......?
दोघिंची शाळा एकच....त्याच्या मस्तिखोरपणाच्या आठवड्य़ातुन "क्ष" तक्रारी य़ाय़च्या....नी ति कोणत्या तोंडाने बोलणार? तिच्या मस्तिखोरपणाच्या नी धांदरटपणाच्या गोष्टी आजीकडुन शेकडयांदा ऐकुन आता मुलीना तोंडपाठ झाल्या होत्या.....
तरी शाळेत जाउन खुपदा ऐकुन घेतले कि तिला तोल जायचा अधे मधे ..नी मग स्वत:चा हात दुखेपर्यंत माराय़ची......
रडून लाल नी एवढय़ाशा झालेल्या रडं आवरु पहात कोपरयात बसलेल्या मुली पाहुन मग तिलाच रडायला येई मग....kitchen मधे जाउन स्वत:ला डागण्य़ा द्यायच्या मग आततायीपणाबद्द्ल!
रात्री मुली त्याला बिलगुन झोपल्या कि तिला वाटायला लागे आईपणात पार नापास झालो आपण.....
मग त्याची उरलेली रात्र तिला समजावण्य़ात सराय़ची.....
कधीकधी त्याचा समंजसपणा तात्पुरता संपला की त्यांचीही व्हायची भांडणं..मग थोरली नं य़ेउन पोलिसाना बोलवायची धमकी दिली कि दोघं हसणं दाबत गप्प व्हायचे.....
त्याला त्याच्या कामासाठी जावं लागे बाहेर frequently ......पण कितीही busy असला तरी रोज रात्री जिथे असेल तिथुन दोघिना फोन करुन बोलत राही.....
बापलेकिचं बोलणं अखंड सुरु झाले की मधे़च तिला हुक्कि यायची कुजकटपणा करायची....माझ्या मुली आहेत........मी वाढवलय पोटात ९ महिने..., माझा फोन आहे.....मी बिल भरते...माझी परवानगी कोण घेणार.....?
त्याचं घरात नसणं ना तिला सहन होइ ना मुलीना....!आपण दुसरा बाबा आणूय़ा का असं तिनं म्हटल्यावर मुलीनी २ दिवस बोलणं तिच्याशी..पुन्हा असं बोलणार नाही अस, 50 times म्हटल्यावर त्या normal ला आल्या....
मग तो आला कि कोण त्याचा ताबा घेणार ह्यावरुन तिघींमधे चढाओढ लागे.....मुली शिरजोर होउ लागल्या की तो माझा नवरा आहे ,तुमचा बाबा व्ह्यायच्या आधीपासुन वगेरे सुरु करायची......असले दोघेही घरात तरी त्या दोघी, त्यांची आपापली कामं, ह्या गोंधळात एकमेकांच्या फ़ार वाटणीला येत नसत...
पण निदान आसपास आहोत असे feeling असायच.तो असाच tour वरुन परत आला कि त्याला बिलगुन ति नेहमी म्हणे......ह्या मुली पटकन मोठ्या का नाही होत...माझ्या नवरयाला पार घेउन टाकलय दोघीनी...! नि तो गंभीरपणे म्हणे..अगं..स्त्रिया म्हणे क्षणकाळाच्या पत्नी नी अनंतकाळच्या माता असतात....मग? हो क्का? असतील बुवा...पण मला हवा वाटला माझा अख्खा नवरा एकटिला अधेमधे तर त्यात काही चुक आहे असं नाही वाटत मला...मग तो गप्प व्हायचा बोलता बोलता.
serious व्हायचं timing कायमच चुकायचं तिचं.....
काळजी खरं तर त्याला सतत वाटत राही त्याच्या वेड्य़ा बायकोची ,मुलींपेक्षा जास्त.....!
असाच कुठेतरी tour वर गेला होता.......यायचा होता २ ३ दिवसात.....तिचा वाढदिवस होता.....त्यानं नी मुलीनी surprise plan केले होते......
तो यायचा होता वाढदिवसाच्या आदल्या रात्री.....१२ वाजता....
जीवाचा आटापिटा करुन, काम आटपुन कशीबशी त्यानं flight पकडली.....
तो दुसरया दिवशी य़ाय़चा म्हणुन त्याच्या, मुलींच्या आवडीचं जेवण करु ह्या विचारानं ती बाजारहाट करायला बाहेर पडली........
सगळं सामान घेउन येत असताना थोरलीनं रडत रडत फ़ोन केला बिट्की चावली म्हणुन.....तिची समजुत घालत फोनवर बोलण्य़ाच्या नादात तिनं रस्ता cross करायला घेतला.......
जाग आणली ती असह्य वेदनेने.......hospital च्या bed वर....
तिनं सहन करायचा खुप प्रयत्न केला तरी डॊळ्य़ातुन निसटलीच वेदना......
मग जरा भान आलं तसं बाजुला दिसल्या दोघि नी हातात फुलं घेउन मंद हसत तो......
happy bitrh day......असं म्हणत त्यानं तिला जवळ घेतलं...दुखलं तिला नी फार बरं ही वाटलं.......
मुली एक मिनिट तिथुन हलल्या नाहीत ते ३ दिवस.......
घरी आली ती ..तो घर सगळं सजवलेले.....happy birthday च्या पुढे be- attached केला होता......तिला जपत तिघानी लाड केले तिचे......
रात्री मुली झोपल्यावर पहिल्यांदाच उभे आडवं झापले तिला.....!
कोणी सांगितले होते फोनवर बोलत रस्ता cross करायला?नी मग अखंड तिला ओरडत राहिला....ती त्याच्या मिठीत जाउन रडत राहिली...
त्यांच्या आवाजानं मुली जाग्या झाल्या नी दोघाना रडताना बघुन थोरली हमसाहमशी रडाय़ला लागली...
खुप वेळ रडून झाल्यावर म्हणाली.. ok, तुला आण नवा बाबा हवा असला तर...पण जाणार नाहीस न आम्हाला टाकुन?
आता ह्यावर हसावं की रडावं ते दोघांनाही कळेना.......
पण आपल्या सारख्या वेड्या माणसावर आपला शहाणा नवरा नी शॊन्यासारख्या मुली वेड्यासारखं प्रेम करतात हे बघुन वेदनेतही सुखावली ती....!
नी पुढची १५ मिनिटं शहाण्य़ासारखी वागली....
बाकी सुरुच राहिल तिच्या वेड्य़ा family चं एकुण धडपडत एकमेकांबरोबर मोठं होणं....!

5 comments:

ओहित म्हणे said...

सुरेख ... मजा आली ...! तुझे हळू हळू ठेवणीतले बाण बाहेर येताहेत ...

आने दो ... छान आहेत

sagar said...

अस्मिता चं "Asmi" असं केलंस (i guess). मग या post ला पण नाव दे ना मस्तपैकी . "वेडाई" किंवा "वेडूली" कसं वाटतंय ?
आणि अजून काही posts नावाविना ठेवण्यामागे काही कारण आहे का ? स्वतःच्या पोरांची नावं ठेवण्याइतकीच मजा posts ची titles टाकताना येते (निदान मला तरी)

asmi said...
This comment has been removed by the author.
asmi said...

@sagar- post lihun takli ekdum, far vichar n karta....
mhaje ase apsuk houn jate tenva its more fun, i guess.
mag navache vagere rahun jate majhe.
n btw- nav majhe aditi aahe - pan malahi nave thevayla swatahala khup avdte[ he patle asel na sangram tula?] ..lol. mhanun asmi....

asmi said...

@sangram- bhatyatale alasache shatra takun dile tar kevdhe tari ban aahet .....
pan alsane jaga vyapun takliy n....
aso shikke nahi marat basat..
maja ali mala pan lihayla.
thank you