Wednesday, May 19, 2010

बाकी शुन्य

बे दुणे चार.....
२८ सात्ता किती?
पटकन सुचत नाही....
लहानपणी गणिताच्या तासाला डोकं दुखायला लागायचं,पोटात कळा यायच्या....मग शेवटच्या बाकावर जाउन ताणुन द्यायची...
घरी ही गणित बाबानी शिकवायला घेतले कि रडारड नी आरडाओरडा!


मग काय करायचं ठरवलं आहे?-अनु
हं......बघु गं काहीतरी, picture बघायला जाउयात का?-ती
विषय टाळू नकोस....अनु
ए...बघ यार threads and homez ला sell सुरु ए ., चल आटप लवकर...ती
अगं पण......अनु
तु येणारेस की नाही? ती
न आवडणारा नी न झेपणारया विषयापासुन पळ काढणं ही tendency च असावी बहुतेक.....!अनु
Look, I don't want to talk about it.... ती
why?अनु
bye.....ती

हातात प्रगतिपुस्तक पडायचं तेव्हा गणितातले marks पाहुन लाज वगेरे वाटाय़ची नाही....तिनं मोठ्या मनाने त्या विषयाला माफ केले होते कधीच....
शिवाय हा विषय न येण्य़ाचा जगण्याशी खुप संबंध येइल असं वाटलं नव्हतं....


hi, कशी आहेस......?
बरं झालं भेटलीस.....
i just got engaged .मिनु
wow, congrats ...य़ार...-ती
लग्न करतेय पुढच्या २३ ला.....
आणि तु य़ेणारेस....invite email करेन.....
by the way...तुझं काय....?
"अभि आणि तु"?-मिनु
......अगं , hello...? oh...yeah ...i know
ऐक ना ....have to rush....! तु पाठव मला invite
नक्की य़ेइन....पण अत्ता जरा पळु? ...जरा गडबड सुरु आहे गं
bye...-ती
२ अधिक २ चार फक्त अभ्यासातल्या गणितातच होतात.....
आयुष्य़ातल्या गणितात वजाबाक्याच जास्त नी आपली बाकी शुन्य
म्हणून तिला गणित आवडत नाही....


Why dont you meet some counsellor?- अनु
का? वेड लागलय़ मला?-ती
dont over react......अनु
then dont teach- ती
come on...I m just trying to help- अनु
Dont....cos you cant ....even I cant
so?अनु
so.....nothing!ice cream खाउयात का?-ती
Are you crazy? अनु
हवय की नकोय?ती

गणिताची पण Practicals असतात म्हणे....
हो का? trial n error वगेरे?
आधी माहित असते तर जरा विचार केला असता..
नाहीतरी जगण्यातल्या theory नी practical मधे जेवढा फ़रक असतॊ तेवढा ह्यात असणारच.


अगं , य़ेणारेस ना?अनु
कुठे?ती
अगं मिनू च्या लग्नाला?अनु
आज ए का ते?ती
अगं परवा जाउन shopping करुन आलीस न त्यासाठीच....?अनु
हं....अगं जरा कणकण वाटतेय बघ...ती
खोटं बोलु नकोस....ठणठणीत आहेस...अनु
अगं नाही॥खरंच.....तु जा पण please....तिचं gift आणुन ठेवलय ते घेउन जा नक्की!-ती

" a is equal to be, b is equal to c, so a is equal to c"- पण मग आपल्याच सारखं घडुनहि मिनुनं तिचा गुंता सोडवलाच की.....कारण तिचं गणित मुळात चांगलं होतं

कपाट आवरताना आत कुठेतरी लपवलेला, टाकून द्यायची इच्छा असतानाही जमल नाही, म्हणुन ठेउन दिलेला त्या दोघांचा एकत्र फ़ोटो बाहेर पडला....
आणि मग १२००० व्या वेळेला स्व:तला आवरायचा निश्फळ प्रयत्न फ़ोल ठरला...
तिनं मग डॊळे पुसायच ही सोडून दिलं...
जमिनीवर आडवी होत ती त्याच्या आठवणीत विरत गेली......
सगळ्य़ा आठवणी आत तितक्याच तरुण नी ताज्या कशा राहिल्या आहेत?
नी जखंमा ही इतक्या ओल्या..?
असंच कधीतरी काम उशीरा आटपुन घरी सोडायला तो आला होता....
bye...good night! असं म्हणुन ती निघत असताना , त्यानं तिला थांबवलं...
"मला असं वाटतय की मी प्रेमात पडलोय तुझ्या"....!तो शांतपणे म्हणाला
ती ऎकत राहिली...
नी मग त्याच्या प्रेमात वाहून गेली .हौद गळका असल्याचं गणित तिला काही आठवलं नाही

look, raavi.....I know this is going to be really difficult for both of us.....
but we will have to do it...
Let it go....we are not meant to be with each other...
ती ऐकत राहते.....
there is no point in dragging this....we will regret this.I hope u understand.
तो बोलत राहतो.....
त्याने प्रेमाचा वर्षाव केला नी तसाच कधीतरी मांडलेला पसारा गुंडाळुन निघुनही गला

हिशोब तसा फीट्टंफ़ाट वालाच की.....!


किती दिवस झाले आता?
२५, ४०, १००, २०० ,किती वर्ष?

गणितं चुकल्यावर कशी लक्षात येतात?
पाया पक्का नाही तर कशी य़ेणार गणितं?
चालायला घेतलेला रस्ता चुकला नी हरवलो तरी कोणत्यातरी रस्त्याला लागतोच की, नी मग वेळ लागला तरी आपला रस्ता ही सापडतोच!
गणितात तसं होत नाही....एक step चुकली, की संपलं....
तिनं माफ़ केले तरी गणितानं ते मनावर घेतलं
नसावं.


अगं...अशी का दिसतेयस?अनु
म्हटलं नव्हतं....बर वाटत नाही म्हणुन?
कसं झालं लग्न?
छान दिसत असेल ना आपली मिनु?ती
why dont you talk about yourself?अनु
काय राहिलय आता बोलण्यासारखं? मी जर रमतेय माझ्या भुतकाळात तर तुम्ही लोक ओढुन का बाहेर आणु पहाताय?
because thats abnormal.....अनु
Then let it be that way! माझे तुझ्यावरच,, आइबाबांवरचं, कामावरचं, खाण्य़ापिण्य़ावरचं प्रेम झालय का कमी?
सोडुन द्या नं...
You know what, a few years back when I watched devdas, i couldn't stop laughing .असं कोणी उध्वस्त वगेरे करुन घेतात काय?
but now I can relate to it so much....
कदाचित माझा पिंड देवदासाचा आहे.....!
त्याच्याबरोबर माझी प्रेम करायची हिम्मत नी इछ्छा सती गेली समज.
आता पुन्हा नाही जमेलसं वाटत.......!

तीनं आपलं आयुष्य "अंदाजे"जगायचा plan केला होता.पण ते तसं प्रमाणात करायची गोष्ट असते., हे जरा उशिराच आलं ध्यानात!
नी आता गोळाबेरीज पाहावी तर बाकी शुन्यच की......
ह्या जन्माचं राहिलं खरं .....पण पुढ्च्या जन्मी ती नक्कि शिकणार गणित!







6 comments:

ओहित म्हणे said...

येडी बिडी आहेस काय? ... खटाक् अशी छान गालावर नक्षी करावीशी वाटतीये ... तिच्या!

बाकी शैली वगैरे आवडली वगैरे लिहायची इच्छा नाही! छान लिहीलयस!

goinghome said...

When you are ready to move on, and only then, someone nicer will come along.

NM said...

It's nicely written. But instead of falling in the end, you can just make people rise. All we need in life, is a little bit of hope.

ओहित म्हणे said...

this comment reminds so much of the climax scene of DevD ... when the car bangs on the wall ... n essentially you see dev choosing life over death! that's the turning point ...

asmi said...

@nik-some stories have their own endings destined even before the birth.
Nahi kai?
I dont find the end tragic, its just not a kind of end that we would want to watch or read.
but then all d stories are not meant to be fairy tales.
though soon will be writing a post with some hope .
Thanks ..I totally got u.

sagar said...

एकदा काय झालं एकजण खूप low होऊन-होऊन "शून्य" होऊन बसला. अगदी उदास, frust , केविलवाणा. negative होता येत नाही म्हणून शून्य नाहीतर अजून कमी झालं असता.
एकटेपणात हाडापर्यंत मुरत चालला होता त्याच्या. "०" विचार करायचा "काय हे , कोणाच्या हि पुढे जाऊन बसलो तरी काहीच फरक पडत नाही. दुसर्या अंकात हि नाही काही फरक आणि माझ्यातही नाही. श्या ..कसले हे priceless , useless जिणे ??"
मग अचानक एके दिवशी "७" आली. आणि "शून्या"च्या पुढे जाऊन बसली "शून्या, माझ्यासारखा introvert नको राहूस रे. सतत आत बघत. चल, मी आहे तुझ्या पुढे. आता ७० जन्म तरी बरोबर राहू "

आणि हो...theory आणि practical मध्ये फरक आहे याच्या पण :D