Saturday, May 15, 2010

celebration

भरतीच्या समुद्राच्या लाटेसारखे किनारयावर थडका मारत फुटणं...
लाल केशरी होत सुर्याचं पाहता पाहता पश्चिमेत विरघळुन जाणं.......
मागंल्याच्या प्रसन्न गंधाने प्राजक्ताचं पहाटेला कोवळी हाक देणं....
उन्हानं आपला पिवळा पदर अलवार वसुंधरेवर ढाळणं.....
गच्च भरलेल्या नभानं सारा पाऊस ओतुन रितं होणं......
प्राक्तनच असल्याप्रमाणं पाचोळ्याचं वारयासोबत सुसाट धावत नाहीसं होणं....
उगवत्या दिवसासाठी पक्षांनी रोजच न चुकता गाणं म्हणणं.....
जमिनीला भेटण्य़ासाठी धबधब्याचं कड्यावरुन खोल उडी घेणं....
रोज़च्याच रुळलेल्या रस्त्यावरुन रात्रीचं रोज नव्या उत्साहानं य़ॆणं.....
चंद्रकोरीचं कधी सरणं कधी ऊरणं
आकाशाचं चांदणं अंगभर लपेटुन घेणं.......
सुरवात , मध्य , शेवट, उदय, अस्त, आनंद, दु:ख सारं काही आसुसून उपभोगणारया निसर्गाचं
वेदनाही साजरं करणं
फ़ुलणारय़ा फ़ुलासोबत काटयालाही त्याची टोचा़यची व्रुत्ती जगु देणं.......
सारं काही विनातक्रार स्विकारायची शैली जेव्हा शिकेन
तेव्हा निवडुंगाचे सौंदर्य शोधावं नाही लागणार......!

8 comments:

Jaswandi said...

mastch! surekh ahe..

asmi said...

@agge teju..thank u!

sagar said...

u got the punch, asmi !

ओहित म्हणे said...

"फ़ुलणारय़ा फ़ुलासोबत काटयालाही त्याची टोचा़यची व्रुत्ती जगु देणं......."

हे जबऱ्या होतं!

asmi said...

@sagar- thank you re..!

asmi said...

@joba-thanku

shri... said...

"सारं काही विनातक्रार स्विकारायची शैली जेव्हा शिकेन
तेव्हा निवडुंगाचे सौंदर्य शोधावं नाही लागणार......! " Pharach chaan.....

Pratima said...

awesome lihili aahe hi kavita tu