Sunday, May 24, 2009

"डोळ्य़ात तेल घालुन संन्यासी ते गुप्त धन शोधत होता". हे वाक्य मी सा्धारण ४ थी ची परीक्शा आटपल्यानंतर सुट्टीत एका गोश्टीच्या पुस्तकात वाचलं होते.
बास ,म्ह्न्जे ...तेल डोळ्य़ात घातल्यावर असे काही दिसतं, जे आपल्या साध्या नजरेला दिसत नाही, ह्याबद्दल माझी खात्री पटली.
पुस्तक आधी बाजुला टाकुन मी स्वयंपाकघरात गेले नी आइचा डोळा चुकवुन खोबरेल तेलाची बाटली घेतली नी थोडॆ थोडॆ दोन्ही डोळ्य़ात घातलं.
मन:चक्शुना कल्पनेच्या पलीकडलं दिसू लागलं होते, डोळॆ मात्र घट्ट बंद होते .....
आता मला ही खजिना दिसणार ह्या कल्पनेने डोळॆ उघडले तर खजिना सोडा खाली ऊतरायचा जिना ही मोट्या मुश्किलिनं दिसत होता, तो सबंध दिवस सगळं जग धुरकट दिसण्यात गेला.
आज असं वाटतं ,खजिना नको पण माणसं तरी नीट दिसावीत , उमजावीत , म्हणुन तरी डोळ्य़ात घालाय़ला ह्या सहित्यातल्या उक्तिप्रमाणे तेलाचा उपयोग व्ह्यायला हवा होता , नई!
असो ,दिसतं तसं नसतं, ह्या नुसार साहित्यातल्या वाक्यांचा उपयोग हा फक्त रसास्वादापुरताच! हा पहिला धडा मी ४ थी त शिकले.
नी असे म्हणतात कि शिकलेले वाया जात नाही, कुणास टाऊक ,असेल ही खरे कदाचित !
माझा १ ला धडा मात्र मी नीट शिकलेय....
अदिती.

Saturday, May 2, 2009

तीला चहा आवडत नाही तरी ती माझ्यासाथी पीते
माझी वाट पाहता पाहता रोज बस तीची चुकते
तीला भेट्लो नाही तर दीवस संपत नाही
ऒफीस कधी सुटणार असे सार्खे वाटत राही
प्रेमातले काही कळत नाही, तीची सवय मात्र झालीय
मी कधीचा तीचा, ती कधीच माझी झालीय

पाऊस त्याला आवडत नाही तरी ंंमाझ्यासोब्त भीजतो
ंमी घरी नीघून येते, जीव त्याच्याकडे उर्तो
रात्र कधी संपणार ह्याची रोज मला ही घाई
्तो नसेल सोबत तर आता अर्थ कशाला नाही
प्रेमाचे काही माहीत नाही त्याचा ध्यास मात्र जडलाय
मी क्धीची त्य़ाची तो कधीच माझा झालाय.

अदु