Monday, June 27, 2011

न सांगता

न सांगता




लहानपणी तुला सारखी लागायचे मी
जरा लक्ष दिले नाही कि गाल फुगवून बसायचे , नेहमीची नाटके
डोळ्यातून हे एवढे पाणी काढायचास मोठ्याने रडत , नि मी सगळे टाकून आले नी उचलून घेतले कि पुढच्या क्षणी खी खी करून दाखवायचं
धोशा लावायचास गोष्ट सांग , गोष्ट सांग .....
आता कधीतरी मला मोह होतो म्हणायचा , मला सांग कि गोष्ट .....
पण मला नाही न तुझ्यासारखा फतकल मारून जमिनीवर बसून हट्ट करायला scope ....
मी कायमच मोठ्ठी होते न तुझ्याहून
पण आता तू ही झालायस की....
मी न करता माझे हट्ट पुरवायचे कसे सुचत नाही रे

लहानपणी शाळेत रोज काय काय झाले हे रोज रोज मला पुढ्यात बसवून सांगायचास
नी जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्यासारखे मी ऐकायचे सगळे
कोणी मारले , कोणी वर्गात मस्ती केली , बाई कशा ओरडतात नी त्रास देतात
नी काय तुझा तो homework घेताना मला वाटायचे की देवा , हा पटकन मोठ्ठा होऊन जाऊदे ....
खरेच झालास
पटकन मोठा नी आता वाटते ,चालले असते जरा अजून हळूहळू गेला असता वेळ तर
आता खरेच महत्त्वाच्या गोष्टीही तुझ्या मला माहित नसतात
तू घरात असलास तर बाहेर फक्त तुझे बूट किंवा चपला दिसतात

लहानपणी आपण पत्त्याचा बंगला करण्यापासून , लपाछपी, राम लक्ष्मण सीता सगळे खेळलोय
मला तर तुझ्या बाबाने वेड्यात काढलेले ...
नी एकदा तू अक्खा दिवस भर कपाटात लपून बसलेलास
मला होते माहित
पण तुझा 'कस्सं हरवले' चा आनंद हवा होता मला भरभरून ......
रात्री मग बाबाने त्याचे शर्ट बघायला कपाट उघडले नी तुला त्यात मांडी घालून बसलेले बघून साष्टांग नमस्कार केला
तू ही वर seriously आशीर्वाद दिला होतास नी आम्ही सगळे हसत बसलो होतो


लहानपणी इतका आईवेडा होतास ...
तुझी आज्जी म्हणायची ..मोठे पणी बिलकुल तुझ्या वाटणीला यायचा नाही
मी
फुशारून म्हणायचे नाहीच मुळी....
पण आज्जी शहाणी होती , नी माझ्याहून पाहिलेले पावसाळे ही जास्त
शिवाय तुझ्या बाबाचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर ताजा असणार
सापडेनासा होतोस जेव्हा तेंव्हा वाटते आजी हवी होती तुझी
'तुम्ही म्हणलात', म्हणून झाले असे , असा वाद घातला असता
नी हळूच समजूतदार पणे हसलो असतो दोघी

लहानपणी तुझे
, माझे इतके फोटो होते
काही झाले कि तू म्हणायचास 'बब्बू फोतो'
नी तुझ्या बब्बुला हौस ही दांडगी
तू माझा make up थापल्यानंतरच्या वेळचे अक्खे फोटो सेशन आहे समोर पडलेले
कोणी आले की तुझे फोटो पाहिल्याशिवाय नी running commentory ऐकवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाहीस
तुझे
फेसबुक वर असतात तुझे फोटो
पण माणसे बदललेली
मी आपले हे जुने फोटो काढून हसत बसते एकटीच

बायकांचे होत असणार हे बहुतेक असे
कारण तुझ्या बाबाला महिन्यातून मधेच एखाद वेळी आठवते ,'चिरंजीव आहेत कुठे'?
मग तुम्ही एक काय त्या long drive ला जाऊन आलात गप्पा मारून की direct पुढचा महिना
मग मलाच 'अस की जरा घरी', असा हट्ट कसा करावा हे कळत नाही
बाबाचा मित्र वगेरे नंतर झालाय
त्याच्या किती complaints केल्या आहेस माझ्याकडे
आपली गट्टी किती जुनी ए रे कार्ट्या.......

लहानपणी promise केले होतेस की सगळे सगळे येऊन सांगशील मला
आताशा येऊन सांगतोस ते निर्णय असतात
ज्यावर मी हसून, छान असे म्हणायचे असते
आईने समजूतदार असले पाहिजे हा नियम ज्याने केला असेल त्याला अंगठे धरून उन्हात उभे केले पाहिजे
मला कशी कळायची तुला रात्री ३ ला भूक लागलेली
तसे तुला ही मी न सांगता माझे हट्ट कळायला पाहिजेत

Monday, June 20, 2011

प्रयत्ने वाळूचे

तसे सगळ्यांनाच दिलेल्या असतात साधारण सारख्या गोष्टी...म्हणजे नशिबाबद्दल किंव्हा परिस्थिती बद्दल नाही , पण श्वास साधारण सारख्या पद्धतीने घेतो , किंवा चप्पल तुटली तरचे वैतागणे , किंवा झोप .
ह्या सगळ्यातली सगळ्यात गमतीची , आणि माणसाला सामान्य किंव्हा असामान्य बनवणारी , एखाद्या सर्वसाधारण माणसाला आकाशात भरारी घ्यायला लावणारी किंवा एखाद्या विलक्षण माणसाला फार काही वेगळे करू न देणारी गोष्ट म्हणजे 'वाटणे ' ....
मला कुठल्या ही गोष्टीबाबत , माणसाबाबत , परिस्थिती बद्दल नि प्रसंगाबाबत काय नी किती 'तीव्रतेने वाटते' .....


समाजाच्या मानसिकतेची ताकद नी त्याचा प्रत्येक माणसावरचा अंमल ही आणखी एक विशेष गमतीदार गोष्ट ......"मला काय किती , वाटते"हे ही खुपदा आजूबाजूला काय घडलंय किंवा घडतंय त्या वर अवलंबून राहते
मी चालताना अक्ख्या रस्त्यावर कोणी नाही नी पडले तर मला त्याचे काही "वाटत नाही" , आणि गर्दीत पडले तर मला लाज "वाटते ".
चोरी करायला किंवा खोटे बोलायला मला प्रोब्लेम नसतो , फक्त ते चारचौघात उघडकीला आले तर कानशिले लाल होतात .
माझ्या एखाद्या decision बद्दल बॉस ने माझ्या एकट्याबरोबर चर्चा केली नी तो फार बरा नाहीये असे दाखवले तर त्याचे मला इतके काही वाटत नाही , पण हेच एखाद्या conference मध्ये २८ लोकांच्या पुढ्यात झाले तर माझा अपमान होतो .
तसे मला काही लग्न अमुक अमुक वयात व्हायलाच हवे , किंव्हा व्हायला हवेच असे वाटत नाही , पण आजूबाजूला सगळ्या दुनियेतील माणसे लग्न करायला लागल्यावर मला "करून टाकायला पाहिजे की काय" असे वाटायला सुरवात होते .
so basically these social pressures decide how one should think or behave or act , where as ideally it should be one's own reasoning applicable only to him/her .This might create chaos but it will certainly bring in varied perspectives ....hopefully more creative as well as productive .
समाजाच्या एकत्र असण्यामुळे ,एकसंध विचारसरणीमुळे होणारे काही फायदे आहेतच पण ह्याचा दुष्परिणाम असा की कुठल्या टप्प्यावर कोई कसे वागायला हवे हे ती ती व्यक्ती जन्माला जायच्या आधी ठरवलेले असतेच ....लिहिलेले कुठे ही नाही , पण नियम पाळावे मात्र लागण्याचे अदृश बंधन येते ....

acceptance ही त्याहून मोठी मजा ...आता "पर्यायच नाही" म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपण "मान्य करतो" , किंव्हा स्वीकारतो त्यामागे "असहाय्यता असते"..खूप मोठे denial असते .
पण जेव्हा एखादी गोष्ट आपण मुळापासून मान्य करतो , आवडीने , पटून तेंव्हा परिस्थिती किती ही कठीण असली , किंव्हा निर्णय कितीही जड तरीही ते जमून जाते .'cast away' मध्ये chuck ला माहित असते की kelly परत त्याच्या आयुष्यात असणार नाहीये , त्यांचे एकमेकांवर निरतिशय , नी एकमेकांपासून लांब राहून सतत वाढत गेलेलं प्रेम असतानाही .
they just express all the love , talk about what they did for each other when they were not with each other .
while leaving he looks at her and says, ...."I know , you have to go" .she looks at him and nods .
सोपे नक्कीच नसेल ते ....पण सोपे करायचा मनापासून प्रयत्न दिसतो त्यात .
समजूतदारपणा हा पर्याय नाही म्हणून नसतो आणायचा , गोष्टी स्वतः साठी नी इतरांसाठी सोप्या व्हाव्यात म्हणून आवडीने विकत घ्यायला काय हरकत आहे ?..कारण फुकट तसा तो खूप कमी जणांना वरून येताना मिळालेला असतो .
the road less traveled किंव्हा बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको ....हे दोन्ही approach पडताळून पाहणे गरजेचे असते .
अनेकदा 'तिथे जाऊ नकोस , भूत असते' ह्या घालून दिलेल्या भीतीने १०० पैकी ८५ लोक त्या वाटेला जात नाहीत ....राहिलेल्या १५ लोकांना रस्त्यावर ट्राफिक तर लागत नाही .मंजिल लवकर मिळते आणि कधी कधी तर रस्त्यात गुप्त खजिना ही मिळतो .
बाकी ८५ लोकांना 'काही झालेच , तर आजूबाजूला आहेत लोक मदतीला ' हेच safe feeling जास्त महत्त्वाचे वाटत असेल .

नी कधीतरी "असे करायचे नसते" , असे म्हटल्यावर "करायचे नसते होय , मग केलेच पाहिजे" , हा हट्ट आतून येतो , पण तो चांगल्याच[productive ] गोष्टी घडवतोच असे ही नाही .
अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतात , आपल्याला वाटते म्हणून त्या घडणार नसतात , इगो बाजूं ठेऊन हे सगळे खोलवर जाऊन पहिल्या नंतर आणि आवडायला लागल्यानंतर मात्र एक विलक्षण ताकद येत असेल माणसात , जी येण्यासाठी आधी कठीण पेपर सोडवावे लागत असेल , फाटत असेल , लागत असेल जिव्हारी पण त्या नंतर एरवी जमणार नाहीत अशा गोष्टी जमून जातात .
नी जमणार नाही असे काही उरत नाही .....कारण त्यानंतर कोणाला काही prove करण्यासाठी करायचे नसते .......

खुपदा मला हे करायचं आहे , पण काही केल्या जमतच नाही असे वाटते तेंव्हा ती गोष्ट खरेच आपल्याला किती मनापासून हवीय हा प्रश्न विचारायला हवा ...कारण जे जे प्रयत्नांनी हवे असते आपल्याला ते आपण मिळवतोच ...
त्यामुळे मला बारीक व्हायचं आहे पण जमतच नाहीये ,
सिगारेट सोडायचीय ..किती प्रयत्न केले पण छे,
coffee उद्यापासून बंद करणार , पण उद्या उजाडत नसेल तर खरेच आपल्याला ती गोष्ट व्हायला हवीय का ह्याचा विचार व्हायला पाहिजे ........

अभ्यास कठीण आहे , मान्य ....मग चलो , सोप्पा करून टाकूयात हा approach कमवायचा असतो ......equation सरळ सोपे सुटसुटीत केले की उत्तर सापडायची शक्यता वाढते नी नाही सुटले तरी हरकत नाही ...ऑक्टोबर ला बसुयात ह्याची तयारी होतेच कमीत कमी .ते ही नसे थोडके!