Monday, September 24, 2012

कारण आई बाबा हा एक brand आहे


आपण आपले कुठे ही भटकत असतो , आपली कामे , deadlines आणि बाकीची अक्ख्या जगाला जिंकायची वगेरे so called स्वप्न घेऊन
आई बाबा घरी असतात
आपल्याला आपल्या  उलझलेल्या सुलझलेल्या गोष्टीची कोडी सोडवण्यात फुरसत नसते
mobile वर त्यांचे रोज दहा missed calls असतात 

घरी असलो तर आपल्याला कामाबिमांच्या गोष्टी बिलकुल करायच्या नसतात ...डोकेच उठते
आणि नाहीतरी कामाचे आपले नि त्यांचे जग किती वेगळे असते ..समजावण्याइतके patience नसतात
आपल्याला इतकी tensions नि stress वगेरे असतात
त्यांच्यासोबत गप्पा मारायला काय वेळ कधीही मिळूच शकतो की
आपल्या आत्ताच्या priorities वेगळ्या असतात

दरवाज्यावर  'काळजी करू नका .....आम्ही उत्तम असतो'  असे म्हणून निघताना
किती धुतला चेहरा नि लपवला तरी त्या आडची काळजी आपल्याला दिसलेली नसते असे नसते
'पण हौस भारी न ह्यांना सांगून बिलकुल ऐकत नाहीत'
'कसे जगायचे' हे कळलंय आम्हाला ह्या over confidance  ची त्यांना खात्रीच नसते

आपल्याला नाही बा चलत कोणी कामाच्या ठिकाणी   नी मित्रमैत्रिणी नी  गृहीत धरलेले
पण आपले उशिरा येणे ....कधी तर न च येणे
वाट्टेल ते खाणे नि हवे ते बोलणे
आपला विचित्र राग नी आपले survive करणे वगेरे
हे सगळे त्यांनी मात्र समजूनच घ्याचे असते
कारण गृहीत धरण्याचे सोयीस्कर logic त्यांच्यासाठी applicable नसते

ते काय असणार असतातच .....
आपण चुका केल्यावर निस्तरायला ......
भीती वाटल्यावर धीर द्यायला
रडू आल्यावर  कुशीत घ्यायला
मोडून पडल्यावर उभे करायला
पण ह्या सगळ्या disaster management  च्या गोष्टी
त्याची गरज पडेल तेंवा ठीक
आत्ता मात्र वेळा  बाकीच्या सगळ्या महत्वाच्या tasks न द्यायच्या असतात
आई बाबा काय......काळ, आज ..उद्या  असणारच असतात

आपल्या सगळ्या इतर preferences मध्ये मुद्दामून नव्हे पण नकळत ही घरची माणसे मधेच मागे राहतात
चालताना भले ठेच लागल्यावर आपसूक आई ग येत असले तरीही range मधेच जाते नी phone disconnect होतात
जगात सगळ्यात कठीण life आपल्या वाटेला आलेले असते
आई बाबांचे काय ..त्यांच्या वेळचे सगळेच सोपे होते
ते जवळ जवळ सत्ययुगात जन्माला आलेले होते
त्यांच्या पिढीचे असे psychological behavioural वगेरे problems नव्हते

त्यांनी बनवलेली टिकवलेली नाती , त्यांनी जमवलेली माणसे त्यांना आयती मिळालेली असतात
आणि आमच्या मात्र relationships प्रयत्न करून ही टिकत नसतात
आमच्या जगण्याची काठीण्य पातळी ड गटाची असते
where as त्यांना काय कुठल्या परीक्षाच द्यायला लागलेल्या नसतात

ते कधी we have had enough म्हणत नाहीत
ते त्यांचे त्यांचे न थांबणारे प्रेम करत राहतात
त्यांना ही राग येत असला कधीतरी आपला
तरी चुका आपले हे वेड्यासारखे पोटात  घेत राहतात 

परीक्षा , आजारपणे , स्पर्धा , परीक्षा , लग्न , मुंजी , हट्ट, महागाई
ह्या सगळ्याला तोंड देता येईल अशी एक system त्यांच्यात जन्मतः fit केलेली असते
पण खरे तर त्यांचे ही डोके दुखत असते नी मधेच sugar ही वाढलेली असते
त्यानाही कंटाळा येत असेल ही शक्यताच मागच्या पुढच्या जन्मात नसते

मग कधीतरी आपण जोरदार पडलो वगेरे नी लागल्यानंतर bag उचलून घरी जातो मुकाट
कारण त्यांना कधी कशाचे explanation द्यायला लागत नसते
नी मग आपल्याला सांभाळताना त्यांना ही ह्या खेपेस लागलेला दम जाणवतो
परत आपल्याला जरा लाज वाटते नी स्वतःचा निरर्थक राग येतो

तुमच्या प्रकारचे आई बाबा manifacture होणे बंद झालेले आहे माहित्ये का आता
आमची मुले बाळे आमच्या इतकी  इतकी lucky नसणार 
कारण तुमच्यासारखे होणे आम्हाला कसले जमणार

कधी कधी वेगळीच गोची होते ...तुमची आठवण येते , तुमची काळजी वाटते नी ती व्यक्त करायला
मातृभाषा ही तोकडीच पडते
ह्या ही भावना तुम्हाला परिचयाच्या असतात
नी आम्ही कुठे ही गेलो तरी
आई बाबा घरीच असतात

वैसे तो

वैसे तो चाँद तारे लाना नामुमकिन ही होगा
पर कहने में तुम्हारे  कुछ चंद पैसे भी न खर्च होगे
मुझे तोह वैसे भी चाँद से कोई लगाव नहीं
पर तुम कहो तो शायद  सुनने में अच्छा लगे

वैसे बहोत बेसुरा गाते हो तुम पहेले से
जानती थी पहले तो यहाँ तक थोड़े न आती.......
पर फिरभी तुम खुश होकर अपने भयानक आवाज में कोई romantic गाना गाते हो
तो एवे ही दिल आ जाता हैं तुम पर और एक बार ....
हर बार 

वैसे तो पिछले साल तुम मेरा बर्थडे भूल गए थे
ये एक बहोत बड़ी गलती होती हे
लेकिन फिर बाद में जब याद आता हैं
के कैसे तुमने  जगह जगह लिख के रक्खा था 
१२ फरवरी भूलना मत =खतरनाक
तो मेरे घुस्से का क्या अचार डालू ?


वैसे तो ,बस तुम साथ तो जरुरी नहीं हे के माहोल हो  कोई अच्छासा.....
क्यों के माहोल बनता तो तुमसे हैं
लेकिन उसके साथ  तुम ice cream भी लाते हो
तो बस चार चाँद लग जाते हैं  

वैसे तो "आज शाम को आ जाता हूँ" ये कहकर जब बाद में एक sms कर देते हो
के नहीं आ सकूँगा यार
और फिर जब अचानक आधी रात गए बेल बजती हैं
और बाहर तुम्हे खड़े होते हो चिढाते हुई smile पहने
तो में भी किसी heroine से कम थोड़े न हूँ

वैसे तो हमारी love story भी शायद common सी हे
पर मेरे लिए काफी मायने रखती हे
बाकि लोग चाहे कुछ भी सोचे और कहे
हमे तोह cheese बहोत पसंद हैं

ब्रेड , बटर , जॅम आणि जगणे .........


सकाळी दुध आणायला बाहेर पडले नि बाकी किरकोळ खरेदी ......
आता काय काल मेले लोक , वाईट वाटलेच पण म्हणून आज खाऊ नको कि काय ? मग गेले बाहेर ...
अशा वेळेला न वातावरणात इतके opinions  तरंगताना दिसतात ....
विषय अर्थात भाजीवाल्यांपासून सगळ्यांचा हाच असतो , 'मुंबई अब सेफ नाही' 
Channel वाले हे मुंबई चे स्पिरीट आहे की नाईलाज वगेरे चे नेहमीचे फुटेज दळत असतात ...........

काल संध्याकाळी भीती कशी पसरत जाते , प्रत्येकाला आपण कसे मरणार आहोत असे वाटायला लागते , भीती एका नजरेतून दुसऱ्या नजरेत pass on व्हायला लागते ते पहिले .
 एक स्टेशन ला  भेटलेली मैत्रीण म्हणली - 'उद्या पडायचे आहेच न बाहेर , घाबरून काय करणार ' आवडले मला ..
वेफर्स खात ट्रेन मध्ये बसलो 
आजूबाजूच्या ब्लास्ट्स च्या गप्पा ऐकून कान बधीर झाले ..कानात गाणी लावली आणि पोचले घरी ..........

आज आपण सगळे,' चक चक वाईट झाले'वगेरे करणारच आहोत , निषेध करणार आहोत , सरकार , पोलीस नि intelligence वाल्यांना शिव्या घालणार आहोत , सोशल नेट्वर्किंग साईट वर मते नोंदवणार आहोत ....

बाकी मग चहा , नाश्ता , जेवण नि उद्या जिंदगी न मिलेगी दोबारा ...........

एका हाताने टाळी वाजत नाही , संसार रथाच्या एकाच चाकावर चालत नाही वगेरे विचार खूप ऐकलेत आपण .....
पण सरकार ला देश चालवायला दिलाय तर तो कसा ...आमची जमीन तुम्हाला कसायला दिलीय , करा काय वाटेल ते .. हवे ते पिक घ्या , नाही वाटले तर नका घेऊ ......
सगळ्या जबाबदाऱ्यांचे नाही होऊ शकत यार out sourcing ........
अण्णा हजारे ना आमचा support आहे कुठे तर फेस बुक वर ?
 एखादी व्यक्ती गेली तर आम्ही तिच्या account  ला जाऊन RIP  लिहिणार ?

आम्ही का  शिकणार का ते माहित नाही , पण generally पैसे कमवायला जी एक सर्वमान्य पद्धत आहे तिची पायाभरणी शाळेत वगेरे होते .....काही ज्ञान वगेरे मिळालेच तर तो शुद्ध side effect  समजावा ....
स्वप्न तर अर्थातच बघतोच ...पैसे , सुख , परदेश , सपनो की राणी , सौदागर , आणखी पैसे , मोठे घर , मुलांची शिक्षणे , त्यांची लग्न , त्यांची स्वप्न ....
आता ह्या सगळ्यात अण्णा हजारे ला आमचा support आहेच की ,नाकारतोय कुठे ?

चख दे मध्ये शाहरुख काहीतरी म्हणतो त्या मुलीना वैतागून ..".मी आधी देशासाठी खेळतो" वगेरे असले पाहिजे ....नि त्या मुलींसाठी 'आम्ही आधी  आमच्या स्टेट साठी खेळतो ' असे असते .

"आम्हीतर फक्त  आमच्या आयुष्यासाठी खेळतो , आमच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू , मी , मेरा छोटा परिवार , सुखी परिवार असतो , मग बाकी काही जोडलेली नाती वगेरे आणि क्रिकेट"! .....अर्थात 

बाकी मग शनिवार रविवार जेवण जरा वेगळे असते तेंव्हा राजकारण वगेरे चवीला , तोंडी लावायला छान वाटते .
एक catharsis  नावाचा प्रकार आहे , माणूस जेंव्हा नाटक म्हणा , सिनेमा किंवा काही वाचतो , तेंव्हा समोरचा असेल  रडत , ह्याला हि भरून येते , दुक्ख त्याचे नसले तरी , पाणी गळते जरा नि हलके वगेरे वाटते ....
तसे अंगातली रग,  नी कोणावर हि न काढता येणारा राग राहुल गांधी , कसाब , पाकिस्तान , अमेरिका , महागाई ला शिव्या घालून काढला की तात्पुरते हलके व्हायला होते , मग पान बदलून कोणत्या हिरोच्या आयुष्यात काय होतंय  , नी कुठे कसला सेल लागलाय वगेरे वाचण्यात वेळ जातोच .

सुट्यांमध्ये काय करायचेय , insurance policies, मुलांच्या शाळा , डबे वगेरे ह्यात आता आम्ही कुठे लक्ष घालत बसायचे .......? कोणी केले बॉम्बस्फोट , कसे केले , किती मेले  , ह्याचा विचार करण्यापेक्षा ..आपले लोक आहेत न जिवंत ..नशीब , बाकी ईश्वर मृतात्म्यांना शांती देओ चे संदेश अमेरिका , पाकिस्तान नी जग भरातून आलेले आहेतच .....

नुसतेच बोलणे नी बरळणे ह्याहून,  एक तर जे अनेक लोक त्यांच्या त्यांच्या परीने जे जे काही करतायत , त्या त्या करण्यात सक्रीय सहभाग घ्यावा , आजूबाजूला काय घडतंय त्याचा थोडासा अभ्यास करावा , आपल्याला काही मार्ग सापडत असेल तर तो कसा सगळ्यांपरयंत पोचेल ह्याचा विचार करावा , रिंगणात उतरून पाहावे तिथून जग कसे दिसते ते 
नाहीतर एक त्याहून सोपे आहे खूप ....
बोलू नये बिलकुल ......!

तुला नाही कळणार अर्थातच .....


विमानातून वरून खाली बघताना माणसे  कशी मुंग्या वाटतात
सगळ्या एक सारख्याच रांगेत , फरक काही वाटत नाही .......
मुंग्यांना  मुंग्या च म्हणतो आपण ....
माधुरी किंव्हा अजय अशी काही नावे ही नाहीत वाटणीला
म्हणजे आधीच गर्दीतले एक करून टाकल्याने प्रत्येक मुंगीचा ego एरवीच hurt होत असेल

माणसे मात्र आकाराने , रंग , रूपाने , उंची , बुद्धीने वेगळी
अशा वेगळ्यांचे जत्थे , थवे , कळप .....
रेखा , हेमा , जया और सुषमा
नाहीतर राहुल  नाम तो सुना होगा न्चे

पण माणसाचे पाकीट उघडून पहिल्या वर माल आत तोच असतो
तेच तसेच दुखणे , ठिणग्या , विस्तव , राख
lays wafers किंव्हा kurkure  चा flavor  तरी बदलतो at least ,  wrapper    बदलल्यावर
माणसांचे तसेही होत नाही ......

uniform  घालून फिरल्यासारखे वाटावे अशी ......
सगळीकडे मी तिच्यासारखी , ती तुझ्या सारखी
तो त्याच्या सारखा
हे त्यांच्या सारखे
ते त्यांच्या सारखे

तसाच येणारा राग ,
तशीच भळभळणारी जखम ,
तसेच येणारे रडू ,
तशीच येणारी आठवण ,
तसेच उमलणारे हसू ,
तसाच माज ,
वैसेही आंखो में तैर रही अधूरी कहानिया
वैसेही दूर जाते वक़्त के फासले
वैसेही कई सारे गलत फैसले

कुछ नया दिखाई नहीं देता
रास्तो पर बस photocopies चलती रहती हैं कई सारी........
सब कुछ एक रंग का .......
सभी की मेहेक एक जैसी ......
आंसू भी  exactly  उतनेही  नमकीन
surprises  भी सबके  उतने ही common ........

और सभीको लगता हैं के' मेरी कहानी हटके हैं '.
मेरे दर्द तुमसे अलग हैं ,
मेरे सपने तुमसे कई जियादा बड़े हैं ,
मेरी कठिनाइयाँ import  की हुई हैं ,
और तुम बस रोते हो छोटी मोटी गरिबसी बातोंपे


एक ही फिल्म लगी हैं दुनिया की हर theater में
हर घर वो ही खाना बन रहा हैं
हर tri angle में वो ही twist
हर पूजा की वैसे ही death
और हर अंजलि राहुल से कहती हैं
कुछकुछ होता हैं राहुल .....
'तुम नहीं समझोगे '

भीड़ में कुछ नया नहीं होता
मुझमें कुछ नया नहीं होता
दिन नया नहीं होता
रात का भी इरादा बस muster पे sign  करने का

जिने के print out निकलते रहते हैं
मेरे खयालो में भी आजकल सब कुछ कल परसों जैसा
तुझ में , उसमें , मुझ में अगर कोई फरक नहीं
तो मेरा होना न होने से जियादा अलग नहीं होता .........

मेरी पहचान मुझ मिल नहीं पाती,
मेरा चेहरा मुझे समझ नहीं आता.

पण तुला  नाही कळणार अर्थातच !

'इस दिवाली आप किसे खुश करोगे ?'


Cadbury च्या खूप गोड वाटाव्यात अशा adds सुरु आहेत बघा सध्या tv वर ....
लहान पणी खूप मस्ती करून त्रास दिलेल्या शेजाऱ्यांना जाऊन cadbury चा box देऊन त्या मस्ती बद्दल ची माफी मागणारा एक जण ..
दिवाळीच्या आदल्या दिवशी पर्यंत आपल्या sub ordinate ला काम सांगत , ती पुरेशी वैतागल्यावर drawer मधून cadbury चा box देऊन तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आणणारा boss .......
'इस दिवाली आप किसे खुश करोगे '?


आत्ताच एक चक्कर mall मध्ये टाकून आले ....'coffee 'प्यायला म्हणून .....mall मध्ये मला उगाच  खूप असूया , असुरक्षितता , खोटेपणा तरंगताना दिसतो कायम  ! 
माझे बाबा म्हणतात  ,'कृत्रिम , खोटे असले  की उकडते कायम ', A.C.असला तरीही .....


मला न नेहमी रस्त्यावर असणाऱ्या मुलांना  त्यांच्या आजू बाजूला दिसणाऱ्या गोष्टींबद्दल काय वाटत असेल ह्याची उत्सुकता वाटत राहते ....
छान कपडे  घातलेली ,आई बाबांकडे हट्ट करून ice cream  मागणारी , Mac D मधले burgers हातात धरून गाडीतून जाणारी मुले .......
काय वाटत असेल त्या सगळ्या बद्दल ?


एक जपानी चित्रपट पहिला होता .....नाव , दिग्दर्शक असे काही खूप आठवत नाहीये 
एक खूप यशस्वी businessman ....आजच्या एका मिटींग मध्ये तो काही partners बरोबर सुरु केलेली company स्वतःच्या बळावर संपूर्ण पणे स्वतः विकत घेऊ शकणार आहे ..
त्याच्या ड्रायव्हर चा नी त्याचा मुलगा एकत्र वाढले आहेत अगदी लहान पणा पासून .....
मिटींग आधी त्याला एक फोन येतो , तुमच्या ड्रायव्हर चा मुलगा मी kidnap केला आहे ....आणि प्रचंड पैशाची मागणी करण्यात येते .....
त्याला काय करायचे सुचत नाही 
त्याची बायको अर्थात ह्यात विचार करण्या सारखे काहीच नाही 'पैसे द्या , तुमचे deal जाऊद्या, पैसे , यश काय ..मिळवालच परत 'असेच म्हणत राहते ...
त्याच्या मनात द्वंद्व सुरु राहते ..शेवटी तो देतोही  पैसे ...
 पण तो खूप  मोठा व्यावसायिक असल्या मुळे त्या केस मध्ये पोलीस involved होतात ....आणि खूप पद्धत शीर पणे त्याला blackmail करणाऱ्या माणसा पर्यंत पोचतात '...
त्याला पकडल्यावर हा व्यावसायिक त्याला विचारतो 'माझ्या हातून तुझे काही नुकसान झाले होते का '
थोड्या वेळाने तो माणूस बोलायला लागतो .......
' मी तुझ्या  घरापासून काही अंतर लांब राहतो , मला दररोज समोर हे प्रचंड साम्राज्य दिसत राहते , रोज ......
का ? 
हे इतके का मिळावे तुला, तु इतका श्रीमंत का ?
 हा अन्याय का ?
मी नाही ओळखत तुला .......मी त्या अन्यायाला ओळखतो , हा त्या अन्यायाचा सूड घ्यायचा प्रयत्न होता '........


अशा  अन्यायाची पुसट जाणीव मला कायम mall सारख्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावर  जाणवत राहते .....
५ रुपयांचा वडा पाव खाऊन लोक दिवस काढतात ...
११० रुपयांची इडली आणि १७० रुपयांचा पराठा वगेरे मिळतो mall मध्ये ...
'ज्यांना परवडते त्यांनी जावे' ...हे उत्तर असू शकत नाही ..कारण सतत  आतून बाहेरून सजून सज्ज असलेले हे malls आकर्षून घेतात लोकांना ......
आणि मग आत गेल्यावर 'तुमच्या कडे नसणार आहेत इतके पैसे' ह्याची जाणीव झालेले चेहरे असे प्रश्न कधीच न पडणाऱ्या चेहऱ्यांकडे असूयेने बघायला लागले तर त्यात वावगे काय ?


काहीतरी चुकतंय मोठ्ठे असे वाटत राहते मला अशा ठिकाणी .
तर .......
एक छोटा stall पहिला  पणत्यांचा ...खूप छान होता ....पण एक पणती १००० रुपयांची बघून फेस आला ....
'हे दिवे लावणेच आहे '!
रस्त्यांवर साधे , जुनाट , खराब  , फाटके कपडे घालून ही सगळी कडे सुंदर पणत्या विकत आहेत लोक जागो जागी .....पण तिथे bargaining करून १०० ला ६ च्या  ऐवजी ८ पणत्या मिळतायत........


रस्ते सजले आहेत .....
दिवाळी च्या आधी चे १ २ आठवडे खूप लगबग उडाली आहे ...
सगळ्यांना घरे आवरायची आहेत ...सजवायची आहेत ....
खूप कसले कसले sale नी offers दिसतायत सगळी कडे ....
फराळ बनतो आहे ...
'विदेस मधल्या रीश्तेदारोना' पोचता होणार आहे ....
daily soaps मधले लोक उतू जाणारी श्रीमंती , जाडी नी फटाके दाखवणार आहेत .
corporate offices , नातेवाईक , मैत्र मैत्रिणीना देण्या साठी dry fruits , sweets , cadburries , artifacts , gifts घ्यायची आहेत ...
नवीन कपडे घ्यायचे आहेत ......


विंदांची कविता आहे प्रचंड प्रसिद्ध 
'देणारयाने देत  जावे , घेणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे '
हे देणाऱ्याचे हात कसे व्हायचे त्याचे अलिखित शिक्षण खरे तर माझी संस्कृती देत आलीय . 
malls मध्ये लहान मुलांसाठी  free painting workshop होते खरे  पण ' हे देणाऱ्याचे हात वाली भानगड 'mallsमध्ये नाही बुवा मिळत ते ....
सण साजरे करावेतच ....पण जितक्या प्रेमाने , उत्साहाने आपल्यांसाठी करावेत ..तितक्याच उत्साहाने अनोळख्या माणसांसाठी ही करावेत '
दसऱ्या चे सोने वाटायला गावांमध्ये मिरवणुका निघतात ...ते प्रतीकात्मक सोने  काय फक्त आपल्याच माणसाला द्यायचे नसते .....
'देण्याची भावना महत्त्वाची  आणि काय देतोय ते ही तितकंच महत्वाचे ' आणि ते महत्व पैशांवर नाही ठरत .
'सुदाम्याने दिलेले पोहे अर्थात साधेच होते पण मला खात्री आहे की ते जगातले  सगळ्यात चविष्ट असतील ह्याची काळजी सुदाम्याने नक्की घेतली असणारे '.....


परत येताना महा मुश्किलीने   एक रिक्षा मिळाली ..... 
बाजूला न कंटाळता हॉर्न वाजवणाऱ्या एका स्कूटर वाल्याची  मी नी रिक्षा वाल्याने मिळून  शाळा घेतली ....
आता कसे दिवाळी आटपे पर्यंत गर्दीच गर्दी असणार ...,
रिक्षा कमी झाल्यात आता ....,
ह्या रस्त्याला एरवी बिलकुल गर्दी नसते वगेरे गोष्टींवर solid गप्पा झाल्या ...
एक भयानक मोठ्ठा signal लागला होता आणि समोर एक छोटे दुकान होते ...तिथे पणत्या आणि फराळ वगेरे होते काय काय ....मी रिक्षावाल्याला ' दोन मिनिटे थांबा हा' असे म्हणून पटकन उतरले ....एक छान पणत्यांचा सेट आणि लाडवांचे पाकीट घेतले ...आणि उतरताना मीटर च्या झालेल्या पैशांबरोबर त्याला ते ही दिले ...'happy diwali 'म्हणून ......काय मिळाले कसे सांगू शब्दात ? त्याने जे व्यक्त केलेन चेहऱ्यावर त्या १० १२ सेकंदात ते  इथे काही केल्या उतरवता येत नाहीये ......


दोन तीन मैत्रिणी यायच्या होत्या उद्या म्हणून काही खरेदी करणार होते , त्यांच्या च जोडीने मला नेहमी मी सकाळी 'बोहनी करते' म्हणून एखादे संत्र किंव्हा चिकू असेच देणाऱ्या फळवाल्या काकांना पण असाच छोटासा खाऊ घेतला .....ते एरवीच खूप लाड करतात पण आज जरा जास्त च खुश झाले आणि म्हणले ' दिवाली के दिन  सुबह आ जाना ..में भी दुंगा तुम्हे gift '.
मज्जा वाटली आहे मला खूप .....
आणि आता दिवाळी यायची वाट बघणे जास्त interesting होणारे ..
कारण माझ्या परीने का होईना ' इस दिवाली आप किसे खुश करोगे ' चे उत्तर मला सापडलेय ..

नेमिची येतो मग valentine's day


[महत्वाची सूचना -  ह्या post मध्ये first person , third person वगेरे काही नियम नाहीयेत ... मधेच संवाद असेल मधेच monologues , ह्याला मुळात pattern वगेरे नाहीये ..yay ..]
आसावरी -यंदा ही खूप पीक आलेय discounts , offers and sell चे ....सम्या ने आणलेन काहीतरी मला surprise  gift वगेरे म्हणजे एकदम three much च आहे . सूर्य नैऋत्येला वगेरे उगवलाय डायरेक्ट किंव्हा ह्या पुढे marketing ला मी नावे ठेवणार नाही अशी शपथ घेते .

स्वरा -surprise gift आहे ?म, तुला आधीच कसे कळलेय ? 

आसावरी -अग्ग स्वतःच्याच घरात चोरा सारखा वगेरे येऊन संशयास्पद रीतीने कपाटा च्या आजूबाजूला फिरत होता ....म्हणजे मला कळलेच होते लगेच पण मी अभिनयात पारंगत असल्याने मला कळलेय हे त्याला कळू नै दिले मी ..

स्वरा -I hope , तु मग तो ऑफिस ला गेल्यावर लगेच काढून बघितले नाहीस हावरटा सारखे ...?

आसावरी :-.............................................................................

स्वरा -देवा देवा ... अशी कशी विकृत आहेस ग तु [शब्दाची मालकीण - नुपूर नानल]

आसावरी-अग काय करणार , समोर cheese cake असताना diet कसे ग करावे माणसाने ?...मी नीट व्यवस्थित उघडून आत काय आहे ते बघून नीट परत तसेच्या तसे ठेऊन दिलेय ..आणि आता मला दिले त्याने की मी परत एकदा दोन कारणांनी सिद्ध करेन की मी किती अशक्य भारी अभिनेत्री आहे ते ......एक तर मला आत काय आहे ते माहित असून मी surprised झाल्याचा अविस्मरणीय अभिनय करणारे आणि दुसरे म्हणजे ,मला अज्जिबात नै आवडलेत ते कानातले डूल, खऱ्या मोत्याचे वगेरे आहेत तरीही ! ...तरी  मी , 'देवा , हे कित्ती सुंदर आहेत ..आत्ताच्या आत्ता घालते ' वगरे करणार आहेच .

स्वरा-हाच problem आहे जगाचा ..तुझ्या सारख्या कुटील कारस्थानी मुलीना पडतात ती मुले , आणि माझ्या सारख्या ........


आसावरी --सोन्ये , तु लगेच गोष्टी personally का घेतेयस ....? येऊ घातलेल्या Valentine's day साठी मी तुला एक लाखमोलाचा सल्ला देतेय ...' कितीदा कित्ता  गिरवणार आहेस , किंव्हा अधोरेखित करणारेस की कसे मुलांना त्याच्च्या हून जास्त किंव्हा मुळातच बुद्धिमान मुली झेपत नाहीत , जड जातात वगेरे ? आणि कसे त्यांना मुर्ख मुलीच आवडतात वगेरे ...आज मी तुझ्या डोळ्या वरचा परदा उठाने वाली हुं ...ज्या ज्या मुली तु म्हणतेस न किती मंद आहेत , किंव्हा मुर्ख वगेरे ...नी ह्यांना कशी पटू शकतात मुले वगेरे ...त्या मुळात काही मंदाकिनी वगेरे नसतातच .....त्या लई हुशार असतात आणि मंदाकिनी  असल्याचा अप्रतिम अभिनय करतात ..मी ही ट्रेन मध्ये भीषण गर्दी वगेरे असली नी उभे राहून पाय वगेरे दुखत असले की ,'अई ग , चक्कर येतेय ', वगेरे अभिनय करतेच ......कसंय न ....बसायला मिळाल्याशी मतलब ....कळले ?

 ह्या वर जरा गौर करो ...आणि तुला मी नाही आवडत माहित्ये मला .मी नसेन तुझी लाडकी पण तु माझी प्रिय सखी आहेस तेंव्हा तुझे दुक्ख निवारण करणे ये मेरा फर्ज हे ..म्हणून तुझ्या साठी  खास एक अशक्य दुर्मिळ offer आहे .

आज संध्याकाळी लोखंडवाला मधल्या lantern cafe जायचे ...आठ च्या मनाने ..नेहमी गाढवा सारखी वेळेत पोचतेस ..तसे करू नकोस मंदाकिनी ....आठ ची वेळ आहे म्हणजे एक वीस मिनटे उशिरा जा .....


स्वरा - बाई , काय पिलान काय हाये ?

आसावरी - मला न वाल वांग्याची भाजी आवडते प्र  चं  ड ...पण येतेय कोणाला करता ....मग मी मावशीला सांगते ....आपल्याला काय भाजी मिळाल्याशी मतलब आहे ...

स्वरा - तु काय मला how to be a perfect selfish person in a day शिकवते आहेस काय आज ?


आसावरी - उग्गाच ती नेहमीची जीन्स आणि ते ढगळ शर्ट घालून जाऊ नकोस झोपेतून उठ्ल्यासारखी ....तो मी परवा आणलाय न तुझ्या वाढदिवसाला तो skirt घाल ....सांगते ते ऐकायचे ...प्रश्न नै विचारायचे बावन्न ....८ :२० ला त्या कॅफे त जायचे ....

स्वरा - आणि नाही गेले तर ......

आसावरी - ती म्हण ऐकली आहेस का ग तु ...you can take the horse to the water.....

स्वरा - छे , मी तर गवार आहे न ..

आसावरी - गवार वरून आठवले ........चपला वगेरे घालशील न नीट ..की sports shoes घालून जाशील skirt घातल्यावर पण .....

स्वरा- चालती हो ....

आसावरी -काय नशीबवान लोक असतात तुझ्या सारखे ज्यांना मी मिळालेय ..मी नसते तर ...

स्वरा - आता काय तु तिथेच स्व प्रशंसा करत मुक्काम ठोकणार आहेस का ...जा न आता 


रात्री ८ २० ची वेळ
 cafe lantern 
स्वरा पोचलीय ..
आजूबाजूला श्री जी , आणि ccd , आणि द धाबा मध्ये मिळून असायची इतकी यथेचछ गर्दी आहे .पण तुलनेने lantern तसे फार गर्दाळलेले नाहीये ...
in fact एखाद दोन कपल्स सोडल्यास कोणीच नाहीये ....पण तो कॅफे छान आहे ...
.नावाप्रमाणे कोपऱ्यात कंदील आहे नी असे लाकडी , दगडी उजळलेले corners स्वरा ला आवडतात खूप ...
ह्या कॅफे चं मेनू कार्ड पण मस्त केलेय वर्क ...नी नावे ही भन्नाट आहेत ....
हे जे कोणी उगवणार आहे त्याला वेळेची कदर नाहीये ...उगाच माज ..
एक तास उलटून गेलाय ....
खरे तर आशु चा राग यायला हवाय .
पण त्या पेक्षा आपली च दया येतेय जास्त ...इतक्यांदा तिच्या पुढे कुरकुर केलीय ..

ते camera मध्ये डोकावून पाहणारे अखिल भारतीय उत्साही हौशी अभिनेते असतात तसे आपण ही प्रेमात पडायची आपली हौस , छंद ह्या वर इतके अडकलोय .....की बाकी सगळ्या छान गोष्टी ह्या एका नसण्या मुळे वजा करायला लागलोय आताशा ...
हल्ली सगळी couples च दिसतायत आजूबाजूला ....
पूर्वी त्यातली कटकट , लाउड गोष्ट , विरोधाभास , फिल्मी पणा दिसायचा , खोटेपणा दिसायचा ....
आता मात्र गर्दी त सगळे प्रेमात पडलेत नी सुखी आहेत असे दिसायला लागलेय ..बदललेय काय नेमके ?

उगाच नेहमी प्रमाणे कल्पनेची जाळी गुंफायची , कसले भारी विणले आहे जाळे म्हणून त्यातेच अडकायचे ...तसे ह्या जाळ्यात उग्गाच अडकलोय आपण ....

पण आताशा खूप उशीर झाला ऑफिस मधून निघायला की निखत ला घ्यायला म्हणून  आलेला निरू दिसतो ....

किंव्हा रिकाम्या रस्त्यांवर  taxy मिळत नाही नी ती वाट बघत उभी राहते तेंव्हा कडेला जे रस्त्यांवर राहणारे लोक असतात त्याच्यातही तिला थंडी ने कुद्कुडणारया एका मुलीला मिठीत घेणारा तिचा तिचा कोणीतरी दिसतो ....

तिच्या आवडत्या juhu mocha ला ती कधीही गेली तरी तिथे नेहमी एक गोड couple असतेच ....

सम्या ही आशु रागावेल मी असे केले तर नी असे नै केले तर कितीदा म्हणत असतो ..

वर वर कुरकुर  नी दंगा पण आणखी किती किती दिसते त्यांच्या दोघांच्या मधले ..खटयाळ , मिश्कील , चिडवणारे , हळुवार ...खरे खरे प्रेम नी खोटा खोटा रुसवा ...हेच का दिसते हल्ली ....

दीड तास उलटून गेला तरी स्वरा तिच्याच विचारात भरकटलेली ,
कोणी तरी येणारे हे ही विसरून .

कोणीतरी किंव्हा कोणी ही नाहीच येणार ह्याची खात्री कधीच झालेली तिची ,भीती त्या बद्दल ची गेली नसली तरीही 

ऐसे ही रुके हे मोड पर न जाने कितने  अर्सो बीत गये ...
सच बात तो ये हे की इंतजार का भी अपना एक मजा था  .......


आजूबाजूचे लोक बदलत गेले , गर्दी कमी होत गेली ...
समोर च्या counter च्या दिशेने ने माणूस आत जाताना फक्त तिला दिसला , ओझरता ....
उंच माणसांकडे लक्ष जातेच नाहीतरी ....
थोड्या वेळाने तिने न मागता तिच्या समोर एक coffee एका काका वयाच्या माणसाने आणून ठेवली ....

तो माणूस - वोह , आप कबसे बैठी हे ...सोचा फिर हमारी special coffee पिलादू ...

स्वरा - वोह बस कोई आने वाला था ...और फिर ध्यान नाही रहा, sorry ......

माणूस - वैसे ये हमारी जो कॉफी हे उसका नाम हे 'शादी वाली कॉफी'...


नाव ऐकून स्वरा ला कॉफी पिता पिता ठसका लागेल की काय असेच वाटले .....
माणूस - हमारे यहा , शादियो में बनाते हे ये कॉफी ...कैसी लगी ?

अचानक ह्या माणसाच्या pleasant बडबडीमुळे विझू पाहणारा स्वरा चा मुड पुन्हा सुधारायला लागला .....
आणि counter वर गेलेल्या माणसाला त्या कोपऱ्याच्या अर्ध्या उजेडात दिसले ते स्वराचे हळूहळू रोशन व्हायला लागलेले डोळे ....
त्या काकांबरोबर गप्पा मारताना कुठे ही उमटायला लागलेले हसू .... 

एकाच चेहऱ्यावर हास्याच्या इतक्या shades असू शकतात ?

 आता कॅफेत कोणीच नाही ...काका ही ,'अच्छा बेटा', म्हणून निघून गेलेले ...जाताना स्वराचे  न थांबवता येणारे हसू  सुरु करून ...

तिला शाळेत , कॉलेज मध्ये , मैत्र मैत्रिणींमध्ये खुपदा बोलणी खायला लागायची ..अजून ही तिच्या नको तिथे हसण्याने पंचाईत होते च पण हसू उगाच येत राहते ....आणि थांबवायचे कसे मग ते ......?


आजूबाजूची गर्दी मिटत गेलेली ...तरी स्वरा चा पाय काही निघेना ..मुड बिघडायला नी सुधारायला काही कारणे लागत नाहीत तिला .
......मग काहीशा वेळाने कॅफे मध्ये एक एक चीज लागायला लागली ....
सुरवात झाली ती इक तारा ने ....
मधेच 'आजा सनम मधुर चांदनी में हम' लागले ....

जायला निघालेली स्वरा परत त्या गाण्यात अडकली ...

'हजारो ख्वाईशे ऐसी' सुरु झाले नी पुढे लागले ते ' आओ हुजर तुमको सितारो में ले चलु , दिल झूम जा ये ऐसी बहारो में ले चलु ' ...

असे कितीदा होते की तुमच्या आवडीची गाणी एका इतक्या अनोळख्या ठिकाणी लागतायत एका पाठोपाठ एक ...?
हातात आलेली कॉफी न मागता, नी ती ही हवी तशी .......

जणू काही तिच्या साठी मैफिल आहे ही ..तिच्या एकटी साठी !

 न मिटलेले हसू , नी मिटलेल्या डोळ्यांनी ती प्रत्येक गाणे enjoy करतेय आणि अचानक गाणी थांबली ...एक एक दिवे कॅफे त तले मंदावायला लागले ....

जायचे नसतेच तिला ....सुरु झालेली कुठली ही आवडती गोष्ट संपलेली , थांबलेली आवडत नाही ..

लहानपणी ही आई गोष्ट सांगत असताना गोष्ट संपली नै पाहिजे असला विचित्र हट्ट ...

पण संपतात गोष्टी ....

इच्छा नसताना कॅफे चा तो कोपरा तिचाच झालाय असे वाटत असताना जायला लागणार ...

जड पावलांनी बाहेर पडायला लागली नी कॅफे कोणीतरी गिटार वाजवायला सुरवात केली ...

पण आता तर ती निघालीय .....
जायला हवेच नाहीतरी ....पुन्हा एकदा ठाम ठरवून बाहेर पडायला निघाली ...

गिटार वाजवणारा तो उंच मुलगा counter च्या इथूनच म्हणला .... - impress करायलाच वाजवत होतो , नाहीतर गाण्याचे कलेक्शन तसे उत्तम ए माझे ...

अशा वेळी नेमके कसे वागायचे बोलयचे असते ते स्वरा ला कधीच सुचत नाही ....


सुदैवाने तिने आशु ने सांगितलेला skirt घातलाय नी पायात ही sports shoes नाहीयेत ...
ती तिथेच रेंगाळली आहे तिथल्या छोट्याश्या दोन पायऱ्यांवर ...

मुलगा - जुहू च्या mocha मध्ये गेली आहेस कधी ? 

स्वरा तिथेच तर असते खुपदा पण अशा वेळी उत्तर द्यायची गरज नसते नी अपेक्षा त्या हून नसते

 ढगळा शर्ट , एक आठवडा जुनी pant , चष्मा , रोखून धरलेली फिरकी घ्यायच्या मुड मधली तेज नजर , चेहऱ्यावर उगाच चा आगाऊ पणा ...

स्वरा काही न बोलता त्याच्या बरोबर चालायला लागलीय ...

मी हृषीकेश ....तु ?

 स्वरा - मी स्वरा , आशु ने पाठवले होते आज इथे ...
blind date

आशु माझी मैत्रीण ....
आम्ही दोघी फारच शिळ्या वाल्या जुन्या मैत्रिणी आहोत ..

पण तो मुलगा आलाच नाही .......
पण मला कंटाळा नै आला ...कॅफे छान होता तो ....

हृषीकेश - हो ,मी पण येतो बऱ्याचदा .....काय करते तुझी आशु ?

स्वरा - चित्र काढते कोणाला ही न समजणारी ....

हृषीकेश - Abstract .? हं आणि तु ? हसण्या पलीकडे ?

दोघे चालत राहतात ...

रस्ता  ही फार आवाज न करता शांतपणे त्याची गिटार , तिची बडबड ऐकत सोबत चालतो आहे ...


गोष्टी काय कशा ही सुरु होऊ शकतात ...


रात्री सम्या ने आणलेल्या कानातल्या डूलांवर चे साभिनय प्रेम जाहीर करताना आसावरी कुठे कमी पडत नाही ... नी आता उद्या स्वरा जेंव्हा , 'कसला भारी मुलगा आहे हृषी', असे म्हणणारे तेंव्हा ही आसावरी आश्चर्य चकित होण्यात ही कमी नाही पडायची '......

Monday, September 17, 2012

छापलेल्या ओळींमधली न उमटलेली कहानी

डायरी पडली हातातून परवा ...
 बरोब्बर त्याच तारखेच्या पानाने का समोर आ वासून बघावे ?
त्या पानावर न एकच प्रश्नचिन्ह काढलेय मी मोठ्ठे. त्या प्रश्नचिन्हा ला दाढी काढलीय ....चेहरा पण काढलाय comedy आणि त्यालाच प्रश्न विचारलाय ......"अशी होते ओळख"?

 मला योगायोगांची आवड आणि तुझा कधीच विश्वास नव्हता .

 फ्रीज चे दार ही कलाकुसरीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बजावायची माझी आवडती जागा ........

 एकदा एवढुशा sticky note वर बारीक बारीक गिचमिड अक्षरात मोठ्ठे प्रेम पत्र लिहिले होते तुला नी फ्रीज वर चिकटवून ठेवली होती .
 तू काय कमी हलकट होतास .... एवढे झकास लिहिलेले प्रेम पत्र वाचायची किती वाईट रीत .....काय तर म्हणे ,"जेंव्हा जेंव्हा फ्रीज उघडायला जाईन , तेंव्हा तेंव्हा एक एक ओळ वाचतो"  आणि मग मधेच चार पाच दिवसांनी एक पिंक टाकायची ..."इतके कशाला भारंभार लिहून ठेवायचे असते तुला"?

 दोन आठवड्यांनी म्हणजे मी नेमके काय लिहिले होते त्यात ते विसरून काही काळ लोटल्यावर एकदा त्या दारा समोर बसवून , लाल पेनाने चुका अधोरेखित करत काय म्हणलास तर ,"शुद्धलेखन सुधार ...बाकी छान लिहीलायेस" .... मी उत्तर ऐकून गार पडल्यावर मुटकुळे उचलून माझे टाकून आलास बेडरूम मध्ये ....

 दुसऱ्या दिवशी उठले , सकाळी उठल्यावर तू नसायची सवय मला मागल्या जन्मापासून आहेच .......

 कॉफी साठी दुध घ्यायला म्हणून फ्रीज चे दार उघडले तर त्यावर एक कोरी sticky note लावलेलीस...तळाशी एकच स्पष्ट वाक्य ....."पुढचे कधी लिहितेस" ?

 मग पुढे चार दिवस फ्रीज च्या दरवाज्याने 'निरोप्याची ' भूमिका पार पडलीन .. माझी full on नौटंकी .....गाणे च काय लिहिले , कधी फिल्म चे dialogues ,कधी 'आज तू माझा जरा नावडता झाला आहेस " असले काहीही गाढव .

 पण मी किती भसा भसा लिहिले तर तुझी उत्तरे अशीच थेट नी एका वाक्यातली ... तुझे असणे ही एका वाक्यातले सोपे,........." मी आहे " आणि नसणे ही एका वाक्यातले ,............. "मी नाहीये " त्या दोन वाक्यां मधले अंतर आवाज नी प्रकाशाचा वेग अशा परिमाणा मध्ये बसवता नाही आलेले ....पण वीज चमकली तरी भीती वाटत नाही तू गेल्या पासून नी ढग गडगडल्या चे अप्रूप वाटत नाही .पावसा बद्दल नकोच काही बोलायला

.सुरवातीच्या माझे काही अडत नाही नी मला तसे तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही असा माझा अविर्भाव असलेल्या आपल्या भेटी गाठी ...आणि मग ६ व्यांदा भेटलो तेंव्हा आपण कोसळणाऱ्या शेअर मार्केट बद्दल बोलत होतो , वेटर ला कॉफी आण असे सांगता सांगता मधेच माझ्या कडे एक टक बघत म्हणलास ,"आत्ता विचार कर ....आणि थांब तिथेच ..म्हणजे मग पुढचे सव्वा वर्षाचे प्यार , त्याच्या पुढचे साडे तेरा आठवडे पश्चात्ताप , पुढचे अडीच महिने तिरस्कार , त्याच्या पुढचा आठवडा स्वतःची कीव करणे , चीड चीड वगेरे आणि मग २३ दिवसांनी back to normal life हे सगळे टाळता येऊ शकेल तुला ....

तुला कायम सगळे माहिती असण्याचा छंद आणि मला न माहिती असण्याची आवड ...तसे तुझे गणित चुकले ...पण अर्थ नाही बदललेला तुझ्या हिशोबाचा .. .

 अगदीच कधीतरी तुझे कुलूप फोडून आत प्रवेश मिळवता आला मला ...नेहमी जगाला घाबरून तुला बिलगायचे मी पण एकदा कधीतरी तू तशी घाबरलेली लहान मुलाची मिठी मारलेलीस मला नी तसाच हात धरून ठेवलेलास ....

 पण ते एक गिने चुने लम्हे सोडले तर तुझा ताबा कधी सुटला नाही नी मला एकदा तो तुझ्या कडे दिल्यावर मिळवता आला नाही ...

 आता एक pattern झालाय ... तूला आठवायचं नाही असे ठरवण्यात दमते आणि झोपते . नाहीतर तू लक्कन आठवलास रस्त्यात मधेच सगळे क्षण हमला करतात , मग मी हमसा हमशी रडते आणि झोपते .

 मध्ये एक वेगळी डायरी विकत आणली शहाणे व्हायचे ठरवून आणि ज्या ज्या दिवसांवर तुझी छाप आहे ते ते खोडून दुसरे च काहीतरी वेगळे खोटे fictional आणि सोपे सुटसुटीत लिहावे असा विचार केला तर सगळेच दिवस तुझे ....

 आता मीच नवी आणायला झालेय ! आपली कहानी कागदा वर लिहिली खूप पण काही केल्या उमटेना ...

 सगळ्या पेंसिलींची धार गेलेली आणि सगळे sharpeners बोथट झालेले ..

 हातात खोडरबर आहे उरलेला फक्त .. बघते न उमटलेली कहानी खोडता येतेय का ते .........!