Monday, June 28, 2010

स्वामि

"रमा, तुला काही सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण म्रुत्युपत्र करताना तुझ्या बाबतीत काहीही करायला मन
धजलं नाही.सारं राज्य तुला दिलं असतं, तरी ते अपुरं पडलं असतं.का, कुणास ठाउक, पण माझ्या मागं तु राहशील, असा विश्वासच वाटत नव्हता मला."
"याच तुझ्या मोठेपणाने मी दिपुन जातो. ह्या ११ वर्षांच्या काळात तुझ्या संगतीचे दिवस काही महिने काही महिने तरी भरतील , की नाही , ह्याची मला शंका आहे..
राजे म्हणून राज्याची जबाबदारी पेलत असताना पती ह्या नात्यानं केवढं लक्ष तुझ्याकडे दिलं?रमा,पुर्नजन्मावर माझा विश्वास आहे. तुझी सोबत मिळाली तर अजाणतेपणी तुझ्यावरचा सारा अन्याय भरुन काढिन.पुन्हा ती चुक होउ देणार नाही.रमा, देशील का सोबत?
हि आद्नया नाही, रमा! ही माझी विनंती आहे..."

जेव्हा जेव्हा स्वामि वाचते तेव्हा रमा नी माधवराव पेशवेंची love story मला सारया सारया नात्य़ांहुन अधिक ताठ, ताकदवान , शब्दांपलीकडची वाटाय़ला लागते.....
त्यातला प्रणय़, सौदर्य, ताकद सगळ्य़ाला पुरुन उरते.!
आज काय आहे नी तेव्हा काय होते असा वाद नाही घालायचाय अजिबात कारण शेवटि "स्वामि" रणजित देसाईंची कल्पना आहे....
पण partner ला space देणं नी individuality च्या theories पुढे ही गॄहित धरणारी , selfless lovestory खुप जवळची वाटाय़ला लागते.....
बदल आणि स्वातंत्र्य ह्याची काहितरी गल्लत होउ लागलीय़ की काय असं वाटाय़ला लागतं
वाहुन जाणं[ भरकटणं नाही म्हणत] सोपंच असतं म्हणून ते justify करणारं logic माणुस लगेच तयार करतो..
पण मोहात पडण्य़ापेक्षा, मोहात पडून त्यात वाहवुन न जाण्य़ाची kick जास्त असते
Vicky christina barcelona पाहुन मजा येते, छानच ए की १ - film म्हणून....पण impusive होउन , जसं वाटलं तसं वागुन हाती काय लागलं? किंव्हा दुसरयाला काय दिलं आपण? ह्याचं उत्तर भारलेले काही क्षणच्या पलीकडं किती वेळा जातं?
मला वाटतं, आपल्या generation चा ही एक set pattern होउन गेलाय की बघता बघता...आहे नी हॊत्या त्या सारयाच विचाराना नी theories ना झुगारुन लावायचा?
सगळ्य़ाचाच मग व्यवहार होताना दिसतो अशा वेळी स्वामि मी परत परत परत वाचायला लागते...
ते कल्पनेतलं जग जास्त खरं वाटाय़ला लागतं...
अशा वेळी , "अगं पण त्याचा the end पण tragic च आहे" असं कोणि म्हणालं की माझ्याच जखमेवरची खपली निघाल्यासारखं होतं.....
बाकी माझं प्रेम आहे ह्या प्रेम कथेवर आणि tragic भलेहि असो...अशाच नात्याची आस सुद्धा...
हाताशी काय लागणार चे उत्तर शब्दांपलीकडे!

Friday, June 18, 2010

घर


ताडताड चालत ,दरवाजा आपटत आत यायचं, चपला भिरकावायच्या आणि पाणी आणा अशी entry गेली १५ वर्ष मारतेय माझ्या वसईच्या घरात......
ह्या घरी जेव्हा आलो तेव्हा बिटकी होते बरयापॆकी...आणि आल्या दिवशीच कुत्रा लागला होता मागे.
नवीन घराबद्दल ओढ वाटण्य़ासारखे वयच नव्हतं ते...आइबाबानी रिक्शेतुन सामान हलंवलं...त्याच रिक्शेतुन सामानाबरोबर मी पण आले....
ते घर तयार होत असताना बाबा खुपदा construction site वर जायचे...एकदा तर आम्ही सगळेच गेलो होतो..आई बाबा आणि आम्ही तिघी बहिणी...
तेव्हा तर building चा नुसताच सांगाडा उभा राहिलेला....पण बाबा पार होऊ घातलेल्या गच्चीपर्यंत घेउन गेले होते.त्याना दिसत असणार घर ...! मला आपलं as usual उड्य़ा मारायला interesting अडथळे दिसलेले..
आणि मग एक दिवस आलोच राहायला ह्या घरात.....त्यानंतर ही खुप दिवस भिंतीना रंग नव्हता...सिमेंट च्या भिंती आणि आम्ही तिघी होतोच त्या रंगवायला.....!
पण असा काही खास जीव वगेरे नाहि लागला बुवा , त्यात माझा घाम, रक्त नसेल म्हणुन असेल कदाचित...
ज्याच्या त्याच्या आपापल्या कल्पना असतात नं आपापल्या घराबद्दल!हे घर लावण्य़ात , मांडण्य़ात lead role आईबाबांचा असावा नी आपण supporting artists असावं असं वाटत राहिलं ,पण आईबाबांची "घराची" कल्पना निराळी होती....!
मग हे सिमेंट च्या रंग नसलेल्या भिंतींचं घर कधी आवरुन सज्ज वगेरे राहिलं नाही ...सदा आपलं विक्सटलेलं...कोणी य़ेणार
म्हटलं कि आवराआवरी [लपवालपवी योग्य जास्त] करताना कसली तारांबळ ऊडे....!
"माझ्या घराचं"चित्र वेगळं होतं ह्या घरापेक्षा,त्यामुळे ह्याचे तसे लाड नाही झाले, बाबाना हवं होतं तसं
मोकळं ढाकळं पण नाही राहिलं.....
रस्त्यावरचं एखादं झाड कसं त्याचं त्याचं वाढतं की तसं काहीसं स्वत:च स्वत: हे घर होत गेलं.
आमचा आरडाऒरडा,मारमारया, भांडणं ,रडणं ऎकता ऐकता त्यानं स्वत:चा आत्मा शोधला असणार
कारण कोणीही कधीही येउ लागलं इथे हक्कानं ....
आमच्या कामवाल्या बाई नवरा मारतोय भाऊ,जरा "समज द्या" म्हणायला येउ शकल्या ह्या घरात रात्री.
घराच्या दरवाज्याला कधी कडी लागलेली मी पाहिली नाही अजुन...
घर छान करुया की असं आम्ही एके काळी मागे लागायचो बाबांच्या , नी त्यानी आजवर मनावर नाही घेतलं, बाकी मग आम्हीहि तगादा लावणं सोडून दिलं.
मला खुप ओळखुन आहे पण हे घर, कधी एकटीच असले कि ऎकत राहतं मला.....नी मला काही explain किंवा justify नाही करावं लागत त्याला....
माझं स्वत:च एकटीचं असेल घर कधीतरी आणि काहि महिन्यानी आईबाबा ही मोठया नवीन घरात जातील
तशी मी भटकत असते सारखी नी खुप ठिकाणी राहते .
असं सगळ्य़ांचच होत असेल म्हणा आपापल्या घराबद्दल
पण ह्या कसलेही दागदानिने न लेवलेल्या, सड्य़ाफ़टिंग घरानं मुभा दिलीन सगळ्य़ाचीच नी बदल्यात जीव घेतला अडकवुन...
आठवण वगेरे काही येत नाही त्याची, नाहीतरी आपण कुठे आपल्याला आठवत बसतो?
आजही मी रात्री दिड वाजता येते, दार उघडं असतं.....
माझ्या आवडत्या पांघरुणात, माझ्या ठरलेल्या जागी घरात झोपुन जाते नी घर माझा निष्काळजीपणा मनावर न घेता माझ्यावर माया करत राहतं...