Monday, June 28, 2010

स्वामि

"रमा, तुला काही सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण म्रुत्युपत्र करताना तुझ्या बाबतीत काहीही करायला मन
धजलं नाही.सारं राज्य तुला दिलं असतं, तरी ते अपुरं पडलं असतं.का, कुणास ठाउक, पण माझ्या मागं तु राहशील, असा विश्वासच वाटत नव्हता मला."
"याच तुझ्या मोठेपणाने मी दिपुन जातो. ह्या ११ वर्षांच्या काळात तुझ्या संगतीचे दिवस काही महिने काही महिने तरी भरतील , की नाही , ह्याची मला शंका आहे..
राजे म्हणून राज्याची जबाबदारी पेलत असताना पती ह्या नात्यानं केवढं लक्ष तुझ्याकडे दिलं?रमा,पुर्नजन्मावर माझा विश्वास आहे. तुझी सोबत मिळाली तर अजाणतेपणी तुझ्यावरचा सारा अन्याय भरुन काढिन.पुन्हा ती चुक होउ देणार नाही.रमा, देशील का सोबत?
हि आद्नया नाही, रमा! ही माझी विनंती आहे..."

जेव्हा जेव्हा स्वामि वाचते तेव्हा रमा नी माधवराव पेशवेंची love story मला सारया सारया नात्य़ांहुन अधिक ताठ, ताकदवान , शब्दांपलीकडची वाटाय़ला लागते.....
त्यातला प्रणय़, सौदर्य, ताकद सगळ्य़ाला पुरुन उरते.!
आज काय आहे नी तेव्हा काय होते असा वाद नाही घालायचाय अजिबात कारण शेवटि "स्वामि" रणजित देसाईंची कल्पना आहे....
पण partner ला space देणं नी individuality च्या theories पुढे ही गॄहित धरणारी , selfless lovestory खुप जवळची वाटाय़ला लागते.....
बदल आणि स्वातंत्र्य ह्याची काहितरी गल्लत होउ लागलीय़ की काय असं वाटाय़ला लागतं
वाहुन जाणं[ भरकटणं नाही म्हणत] सोपंच असतं म्हणून ते justify करणारं logic माणुस लगेच तयार करतो..
पण मोहात पडण्य़ापेक्षा, मोहात पडून त्यात वाहवुन न जाण्य़ाची kick जास्त असते
Vicky christina barcelona पाहुन मजा येते, छानच ए की १ - film म्हणून....पण impusive होउन , जसं वाटलं तसं वागुन हाती काय लागलं? किंव्हा दुसरयाला काय दिलं आपण? ह्याचं उत्तर भारलेले काही क्षणच्या पलीकडं किती वेळा जातं?
मला वाटतं, आपल्या generation चा ही एक set pattern होउन गेलाय की बघता बघता...आहे नी हॊत्या त्या सारयाच विचाराना नी theories ना झुगारुन लावायचा?
सगळ्य़ाचाच मग व्यवहार होताना दिसतो अशा वेळी स्वामि मी परत परत परत वाचायला लागते...
ते कल्पनेतलं जग जास्त खरं वाटाय़ला लागतं...
अशा वेळी , "अगं पण त्याचा the end पण tragic च आहे" असं कोणि म्हणालं की माझ्याच जखमेवरची खपली निघाल्यासारखं होतं.....
बाकी माझं प्रेम आहे ह्या प्रेम कथेवर आणि tragic भलेहि असो...अशाच नात्याची आस सुद्धा...
हाताशी काय लागणार चे उत्तर शब्दांपलीकडे!

4 comments:

ओहित म्हणे said...

लव स्टोरी जशी आहे तशी समजण्यात सही मजा असते. ... :)

बाकी "पण मोहात पडण्य़ापेक्षा, मोहात पडून त्यात वाहवुन न जाण्य़ाची kick जास्त असते" हे मस्त होतं ... खरय

shri... said...

sandarbh dililya tinhi goshti chan..aahet..khaas karun..Swami & partner..v pu.kale..always best..ani movie mahnshil tar..last week madech pahili..tv var..chan vatli..

shri... said...

aaani ..ho...tuzhy likhan baddal lihaycha tar rahun gela....good one.

Aditya Soman said...

परत; आपली generation इतकी गई गुजरी नाहीये यार. माझं हे अजिबात म्हणणे नाही कि अशा love -stories सगळीकडे असतात.. पण त्या खरच असतात, कुठेतरी, एखाद-दोन.. तितक्या dreamy way मध्ये नक्कीच नाही; कारण जग तसा नाहीये आता, पण तरी मला असा वाटत कि लोक आजही एवढा प्रेम नक्कीच करू शकतात कि "मी" पण बाजूला राहील अन "आपण (Us)" ला योग्य महत्व मिळेल.
हे आता इथे लिहून उपयोग नाही.. कारण discussion होणार नाही :)