Wednesday, September 22, 2010

अंजाना अंजानी

As always last moment ठरलेला plan.मनुच्या "त्याला" भेटाय़चा.

मुलगी नाहीतरी गाढव आहे..त्यामुळे आपण पहाणं भाग आहे पण Bangluru ला जायचं? असं एकदम? सुट्टी? reservation?

कालपर्यंत अशक्य वाटणाया सगळ्या गोष्टि भराभरा झाल्या खरया.तत्कालमधे booking झाले.

सुट्टि मिळेल पण य़ेताना एक story तरी आणाय़ची , मग Bangluru ला जा नाहीतर Rajasthan च्या वाळवंटात जा

editor च्या टकलावर टिचकी मारुन त्याला thank you म्हणाय़चा मोह टाळत मी सुटलेच

घर....packing...reservation ची print out , मनुसाठी आंब्याच्या वड्या, traffic असं सगळं करत train सुटाय़च्या १० मिनिटं आधी पोचले

आपला coach , seat no वगेरे बघुन पाण्य़ाची बाटली ढोसायला लागल्यावर माझ्या मनात विचार आला , "आपली पण train कधी चुकत नाही "जब वी मेट मधल्या करिना कपुर सारखी"

स्वत:चं कौतुक आटपल्यावर डब्यात एक नजर टाकली...काका, आजोबा, शिशुवयीन मुलानी आणि त्यांच्या आयानी डबा व्यापलेला होता, उरलेल्या समवयस्कांमधे कोणी बघणेबल नव्हतं...

आता राहता राहिले ते म्हणजे पुढच्या काही stations वर चढणारे लोक...पण त्यात कोणितरी interesting निघुन तो आपल्यासमोर यायचे chances फ़ारच rare ....

नाहीतरी नाहिचे काही प्रेक्षणीय डब्यात तर निदान टकलुने दिलेले काम तरी संपवुया म्हणुन चश्मा लावुन , bag मधुन notes काढुन वाचायला लागले

आणि मग एकदम लक्षात आलं...आरेच्या आपली तर window seat आहे चक्क....भरुन वगेरे आले ..तत्काल मधे preference न देता ही window ?आजचा दिवस विशेषच....

बाकी ह्या दिवसभराच्या पळापळीनंतर अचानक झालेल्या आनंदाच्या over dose ने मला जरा मजबुत डुलकीच लागली...

.मला खरं तर आवडतं train ने फ़िरायला एरवीच......पण कामातुन अजिबातच सवड नाही व्हायची आता...त्यामुळे generally up in the air असायचं

पण आत्ता निवांत सुट्टि आहे नी आशु ने बोलावलय त्याच्याकडे

पठ्या बिल्कुल सांगायला तयार नाही का ते, "इकडे ये मग सांगेन, तुझे अपनी दोस्ती की कसम" वगेरे drama पण करुन झाला होताआणि आशुकडे नाही जाणार असं कसं होइल,

मग सगळा mood train ने च जायचा जमलेला.....\

आलीच train तेवढ्यात.......मग आपली seat शोधत आलो डब्यात....

समोर एक मुलगी तोंड उघडं टाकुन , व्यवस्थित घोरत खिडकिला टेकुन झोपली होती...

एकतर मुलगी, त्यातुन तरुण मुलगी, त्यातुन train च्या डब्यात बिंधास्त घोरतेय ह्याची मला solid मज्जा वाटली

चश्मा जरा तिचा नाकावरुन घसरत चालला होता नी हातातले कागद कधी एकदा डबाभर पळाय़ला मिळतय ह्याच्य़ा तयारीत ......

हात शिवशिवायला लागले....

नी शेवटि न राहावुन bag मधुन SLR काढलाच नी पटापटा २ ३ snaps click केले गपचुप

purse चोरुन तो पळत सुटला....

अरे त्यात माझ्या reservation ची print out आहे, मला TC fine करेल नी मी का fine भरु?

मी पळतेय..तो फ़ारच जास्त वेगात धावतोय...पण मी त्याला सोड्णार नाही....बघते किती धावुन धावुन धावतोय तो......

आता तो उडाय़लाच लागला.......

this is not done.........

तो उडतोय .......मी आपली जमिनीवरुन धावतेय......आणि द्दाण........

खिडकीवर दाणकन डोकं आपटलं.....

मग हळुहळु स्वप्नाचा प्रभाव जरा कमी झाल्यावर आधी purse जागेवर आहे ना ते पाहिलं..

हातातले कागद गायब होते.....

च्यायला.....आता त्या मुलाऐवजी कागद गेले की काय उडुन?

मग थोड्या वेळानं जरा आपल्यातुन बाहेर पडून .जागी होण्य़ाची प्रक्रिय़ा सुरु असतानाच

"ह्या घे तुझ्या notes , अक्षर तरी बरं काढायचस म्हणजे कळलं तरी असतं काय आहे ते" असं म्हणत एक लंबाचौडा हात समोर आला , नी त्याला लागुन एक लइ उंच मुलगा

तशी मी स्वत:ला फ़ार smart वगेरे समजुन असल्याने आपलं लक्ष मिनीट्भर वेधुन घेण्य़ाइतपत handsome आहे मुलगा हे लक्षात आलंच

पण असं दाखवुन कसं चालेल?

मी papers घेतले त्याच्या कडुन आणि formally ..thanks म्हणून fresh व्हायला गेले "सहज’.

छानपैकी टक्क जागी होउन आली मग ती....चश्मा काढुन ठेवलान...डोळे छानपैकी मोठे म्हणता येतील असे नी त्यात काजळ.....

कुठल्या तरी staion ला गाडि थांबलेली...

तिनं उतरुन काहीतरी मस्त खायला आणलन.....

तिच्या seat वर मांडि ठोकुन बसली....आणि offer केले मलापण......

shirt मस्त ए रे तुझा ...कुठ्ला brand? माझे बाबा इतके मस्त गोरे आहेत , त्याना एकदा मी असाच काळा shirt आणलेला...एकदाही घातला नाही त्यानी.......

आणि मग बोलत सुटली ती थेट दमल्यावर थांबली.....पण अजिबात bore नाही झालं मला...

आम्ही साधारण बालवाडिपासुन एकत्र असल्यासारखं बोलत होती बया....

अचानक लक्षात आलं की मीच बोलतेय नी तो नुसतच ऐकतोय.....

मग म्हटलं अरे माणसा पण नाव काय तुझं? मी मैत्रेयी

....तु?...समर? ओके, समर आता तु बोल ..मी ऐकते.....

येडि दिसतेय आपल्यासारखीच......

हां..अगं माझ्या एका मित्राला भेटाय़ला जातोय मी

हो....एकदम घट्ट मित्र ..मी खुप दिवस U.K. ला होतो...अत्ता सुट्टि घेउन आलोय़ तर म्हटलं भेटुन घेउयात

तु?- समर

अरे माझी cousin असते bangluru ला.....

य़ेडी आहे जरा....मैत्रेयी

ओह , तुझ्याहुन पण का? समर

हं....good question.नाही...माझ्याहुन नसावी....पण she is a kid......म्हणजे शेंबडि होती तेव्हापासुन तिची सगळी secrets माहिती आहेत मला, गटारात पडली होति...एकदा एका मुलाच्याshirt वर शाइ ओतलेलीन..

परवा परवा पर्यंटचे सगळे crush मला माहिती आहेत, असं मला वाटाय़चं

तुला माहित्ये का, तिचं तिनं ठरवुन टाकलय....२ वर्ष affair सुरु आहे...नी मला परवा सांगितलन गाढ्वीनं,

आणि आता काकाला पटवायचं तर ते मी......

म्हणून म्हटलं आधी आपण जाउन पहावं काय दिवे लावलेत बयेनं......मैत्रेयी

Are you jealous?समर

अं..?एकदम थांबले बोलायची.........असु शकेल ..पण फ़क्त jealous नसावे..काळजी पण आहेच......मैत्रेयी

आणि मग उठुन गेली दरवाजाजवळ.......

उगाच खुप personal काहीतरी विचारलं य़ार, sorry....समर

its ok.....पटकन एकदम खंराच प्रश्न विचारलास नं-मैत्रेयी

पण तु पण दिलस की खंर उत्तर....समर

हो, पण त्यामुळे जायचा motive संपला की आता........ego ला गोंजारायला चालले होते...माझ्या परवानगीशिवाय तिनं ठरवलंच हेच पचत नाहिये

मग जरा पायरयांवर बसली.......

केस बांधलेले कसेही..ते ऐकत नव्हते अजिबात...

क्षणाक्षणाला mood बदलत होता.....expressions बदलत होत्या ..आणि सगळं किती वेगानं

मग मस्त हसली नी म्हणाली...जाउदे , नाहीतरी मी emotional fool आहेच आधीपासुन

एखाद्या अनोळखी माणसापुढे सगळे कबुली जबाब देउन टाकावेसे वाटतात,....तसं काहिसं झालं ह्याच्या बाबतीत.....

नी बोलता बोलता ह्याला impress करायचच राहिलं [आता इतका हुषार आहे म्हटल्यावर already कोणीतरी impress केलेलं असणार]पण मज्जा य़ेतेय ह्याच्याशी बोलताना.......[मनातल्या मनात- मैत्रेयी]

मग घरचे...आइबाबा, पुढचे plans, interests , ह्यावर बोलता बोलता picture मधे दाखवतात तस्सा भरकन दिवस उड्ला....रात्र मावळलीआणि train पोचली की Bangluru ला......

आशु ला काय कधीही भेटता येइल......आत्ता हिच्याबरोबर थांबायचं काय वाट्टेल ते करुन [मनातल्या मनात- समर]

मनु ने काय आता ठरवलं आहेच नाहीतरी.....मला नाही पटलं तरी ती ऐकणार थोडिच? shit....आता काय करु?.......[मनातल्या मनात- मैत्रेयी]

आता उतरु train बाहेर..ती कित्ती गप्प झाली लगेच...

थांब जरा..तुला एक गंम्मत दाखवतो.....नी तिला तिचे आ वासलेले फ़ॊटो दाखवले झोपेतले

तिनं पुन्हा एकदा आवासला.......आणि हसायला लागली

असं वाटलं- रोज हिला असं हसत हसत बघताना उजाडावं नी मावळावं- समर

असं वाटलं- ह्याच्या सोबत रोजच उगाच हसायला मजा येइल, नइ?- मैत्रेयी

पण आत्ता तरी उतरतोय train मधुन

समोर मनु उभी आहे तिच्या त्याला घेउन, तुम्हाला भेटाय़च्या नादात माझी wicket गेलि की पण.....[मैत्रेयी]

आशू ? चक्क station ला? अच्छा....तर ये बात हे? तो आखिर ये एक love story हे.......[.समर]

तुम्ही कसे ओळ्खता एकमेकाना.?.......मनु

ते महत्त्वाचे नाहीय़े...तु काय शाइ ओतली होतीस लहानपणी कोणाच्या shirt वर.....समर

मैत्रा...तु हे सांगितलस ह्याला? I dont believe this....मनु

मग तु मला सांगितलस का आशुबद्द्ल? I still cant digest that.......मैत्रा

पण मह्त्त्वाचे हे की आम्ही एकत्र आहोत......आणि आत्तापुरतं तेवढं पुरेसं आहे.......

[ ताजा कलम- पण generally प्रवास करताना शेजारी कधीही इतके interesting लोक येत नाहीत]


1 comment:

Aditya Soman said...

I'm reading this for the 3rd time today in last 6 months.. donno why, aaj awadla (अन आता ह्यावर माज करून I know म्हणू नकोस)