[महत्वाची सूचना - ह्या post मध्ये first person , third person वगेरे काही नियम नाहीयेत ... मधेच संवाद असेल मधेच monologues , ह्याला मुळात pattern वगेरे नाहीये ..yay ..]
आसावरी -यंदा ही खूप पीक आलेय discounts , offers and sell चे ....सम्या ने आणलेन काहीतरी मला surprise gift वगेरे म्हणजे एकदम three much च आहे . सूर्य नैऋत्येला वगेरे उगवलाय डायरेक्ट किंव्हा ह्या पुढे marketing ला मी नावे ठेवणार नाही अशी शपथ घेते .
स्वरा -surprise gift आहे ?म, तुला आधीच कसे कळलेय ?
आसावरी -अग्ग स्वतःच्याच घरात चोरा सारखा वगेरे येऊन संशयास्पद रीतीने कपाटा च्या आजूबाजूला फिरत होता ....म्हणजे मला कळलेच होते लगेच पण मी अभिनयात पारंगत असल्याने मला कळलेय हे त्याला कळू नै दिले मी ..
स्वरा -I hope , तु मग तो ऑफिस ला गेल्यावर लगेच काढून बघितले नाहीस हावरटा सारखे ...?
आसावरी :-.............................................................................
स्वरा -देवा देवा ... अशी कशी विकृत आहेस ग तु [शब्दाची मालकीण - नुपूर नानल]
आसावरी-अग काय करणार , समोर cheese cake असताना diet कसे ग करावे माणसाने ?...मी नीट व्यवस्थित उघडून आत काय आहे ते बघून नीट परत तसेच्या तसे ठेऊन दिलेय ..आणि आता मला दिले त्याने की मी परत एकदा दोन कारणांनी सिद्ध करेन की मी किती अशक्य भारी अभिनेत्री आहे ते ......एक तर मला आत काय आहे ते माहित असून मी surprised झाल्याचा अविस्मरणीय अभिनय करणारे आणि दुसरे म्हणजे ,मला अज्जिबात नै आवडलेत ते कानातले डूल, खऱ्या मोत्याचे वगेरे आहेत तरीही ! ...तरी मी , 'देवा , हे कित्ती सुंदर आहेत ..आत्ताच्या आत्ता घालते ' वगरे करणार आहेच .
स्वरा-हाच problem आहे जगाचा ..तुझ्या सारख्या कुटील कारस्थानी मुलीना पडतात ती मुले , आणि माझ्या सारख्या ........
आसावरी --सोन्ये , तु लगेच गोष्टी personally का घेतेयस ....? येऊ घातलेल्या Valentine's day साठी मी तुला एक लाखमोलाचा सल्ला देतेय ...' कितीदा कित्ता गिरवणार आहेस , किंव्हा अधोरेखित करणारेस की कसे मुलांना त्याच्च्या हून जास्त किंव्हा मुळातच बुद्धिमान मुली झेपत नाहीत , जड जातात वगेरे ? आणि कसे त्यांना मुर्ख मुलीच आवडतात वगेरे ...आज मी तुझ्या डोळ्या वरचा परदा उठाने वाली हुं ...ज्या ज्या मुली तु म्हणतेस न किती मंद आहेत , किंव्हा मुर्ख वगेरे ...नी ह्यांना कशी पटू शकतात मुले वगेरे ...त्या मुळात काही मंदाकिनी वगेरे नसतातच .....त्या लई हुशार असतात आणि मंदाकिनी असल्याचा अप्रतिम अभिनय करतात ..मी ही ट्रेन मध्ये भीषण गर्दी वगेरे असली नी उभे राहून पाय वगेरे दुखत असले की ,'अई ग , चक्कर येतेय ', वगेरे अभिनय करतेच ......कसंय न ....बसायला मिळाल्याशी मतलब ....कळले ?
ह्या वर जरा गौर करो ...आणि तुला मी नाही आवडत माहित्ये मला .मी नसेन तुझी लाडकी पण तु माझी प्रिय सखी आहेस तेंव्हा तुझे दुक्ख निवारण करणे ये मेरा फर्ज हे ..म्हणून तुझ्या साठी खास एक अशक्य दुर्मिळ offer आहे .
आज संध्याकाळी लोखंडवाला मधल्या lantern cafe जायचे ...आठ च्या मनाने ..नेहमी गाढवा सारखी वेळेत पोचतेस ..तसे करू नकोस मंदाकिनी ....आठ ची वेळ आहे म्हणजे एक वीस मिनटे उशिरा जा .....
स्वरा - बाई , काय पिलान काय हाये ?
आसावरी - मला न वाल वांग्याची भाजी आवडते प्र चं ड ...पण येतेय कोणाला करता ....मग मी मावशीला सांगते ....आपल्याला काय भाजी मिळाल्याशी मतलब आहे ...
स्वरा - तु काय मला how to be a perfect selfish person in a day शिकवते आहेस काय आज ?
आसावरी - उग्गाच ती नेहमीची जीन्स आणि ते ढगळ शर्ट घालून जाऊ नकोस झोपेतून उठ्ल्यासारखी ....तो मी परवा आणलाय न तुझ्या वाढदिवसाला तो skirt घाल ....सांगते ते ऐकायचे ...प्रश्न नै विचारायचे बावन्न ....८ :२० ला त्या कॅफे त जायचे ....
स्वरा - आणि नाही गेले तर ......
आसावरी - ती म्हण ऐकली आहेस का ग तु ...you can take the horse to the water.....
स्वरा - छे , मी तर गवार आहे न ..
आसावरी - गवार वरून आठवले ........चपला वगेरे घालशील न नीट ..की sports shoes घालून जाशील skirt घातल्यावर पण .....
स्वरा- चालती हो ....
आसावरी -काय नशीबवान लोक असतात तुझ्या सारखे ज्यांना मी मिळालेय ..मी नसते तर ...
स्वरा - आता काय तु तिथेच स्व प्रशंसा करत मुक्काम ठोकणार आहेस का ...जा न आता
रात्री ८ २० ची वेळ
cafe lantern
स्वरा पोचलीय ..
आजूबाजूला श्री जी , आणि ccd , आणि द धाबा मध्ये मिळून असायची इतकी यथेचछ गर्दी आहे .पण तुलनेने lantern तसे फार गर्दाळलेले नाहीये ...
in fact एखाद दोन कपल्स सोडल्यास कोणीच नाहीये ....पण तो कॅफे छान आहे ...
.नावाप्रमाणे कोपऱ्यात कंदील आहे नी असे लाकडी , दगडी उजळलेले corners स्वरा ला आवडतात खूप ...
ह्या कॅफे चं मेनू कार्ड पण मस्त केलेय वर्क ...नी नावे ही भन्नाट आहेत ....
हे जे कोणी उगवणार आहे त्याला वेळेची कदर नाहीये ...उगाच माज ..
एक तास उलटून गेलाय ....
खरे तर आशु चा राग यायला हवाय .
पण त्या पेक्षा आपली च दया येतेय जास्त ...इतक्यांदा तिच्या पुढे कुरकुर केलीय ..
ते camera मध्ये डोकावून पाहणारे अखिल भारतीय उत्साही हौशी अभिनेते असतात तसे आपण ही प्रेमात पडायची आपली हौस , छंद ह्या वर इतके अडकलोय .....की बाकी सगळ्या छान गोष्टी ह्या एका नसण्या मुळे वजा करायला लागलोय आताशा ...
हल्ली सगळी couples च दिसतायत आजूबाजूला ....
पूर्वी त्यातली कटकट , लाउड गोष्ट , विरोधाभास , फिल्मी पणा दिसायचा , खोटेपणा दिसायचा ....
आता मात्र गर्दी त सगळे प्रेमात पडलेत नी सुखी आहेत असे दिसायला लागलेय ..बदललेय काय नेमके ?
उगाच नेहमी प्रमाणे कल्पनेची जाळी गुंफायची , कसले भारी विणले आहे जाळे म्हणून त्यातेच अडकायचे ...तसे ह्या जाळ्यात उग्गाच अडकलोय आपण ....
पण आताशा खूप उशीर झाला ऑफिस मधून निघायला की निखत ला घ्यायला म्हणून आलेला निरू दिसतो ....
किंव्हा रिकाम्या रस्त्यांवर taxy मिळत नाही नी ती वाट बघत उभी राहते तेंव्हा कडेला जे रस्त्यांवर राहणारे लोक असतात त्याच्यातही तिला थंडी ने कुद्कुडणारया एका मुलीला मिठीत घेणारा तिचा तिचा कोणीतरी दिसतो ....
तिच्या आवडत्या juhu mocha ला ती कधीही गेली तरी तिथे नेहमी एक गोड couple असतेच ....
सम्या ही आशु रागावेल मी असे केले तर नी असे नै केले तर कितीदा म्हणत असतो ..
वर वर कुरकुर नी दंगा पण आणखी किती किती दिसते त्यांच्या दोघांच्या मधले ..खटयाळ , मिश्कील , चिडवणारे , हळुवार ...खरे खरे प्रेम नी खोटा खोटा रुसवा ...हेच का दिसते हल्ली ....
दीड तास उलटून गेला तरी स्वरा तिच्याच विचारात भरकटलेली ,
कोणी तरी येणारे हे ही विसरून .
कोणीतरी किंव्हा कोणी ही नाहीच येणार ह्याची खात्री कधीच झालेली तिची ,भीती त्या बद्दल ची गेली नसली तरीही
ऐसे ही रुके हे मोड पर न जाने कितने अर्सो बीत गये ...
सच बात तो ये हे की इंतजार का भी अपना एक मजा था .......
आजूबाजूचे लोक बदलत गेले , गर्दी कमी होत गेली ...
समोर च्या counter च्या दिशेने ने माणूस आत जाताना फक्त तिला दिसला , ओझरता ....
उंच माणसांकडे लक्ष जातेच नाहीतरी ....
थोड्या वेळाने तिने न मागता तिच्या समोर एक coffee एका काका वयाच्या माणसाने आणून ठेवली ....
तो माणूस - वोह , आप कबसे बैठी हे ...सोचा फिर हमारी special coffee पिलादू ...
स्वरा - वोह बस कोई आने वाला था ...और फिर ध्यान नाही रहा, sorry ......
माणूस - वैसे ये हमारी जो कॉफी हे उसका नाम हे 'शादी वाली कॉफी'...
नाव ऐकून स्वरा ला कॉफी पिता पिता ठसका लागेल की काय असेच वाटले .....
माणूस - हमारे यहा , शादियो में बनाते हे ये कॉफी ...कैसी लगी ?
अचानक ह्या माणसाच्या pleasant बडबडीमुळे विझू पाहणारा स्वरा चा मुड पुन्हा सुधारायला लागला .....
आणि counter वर गेलेल्या माणसाला त्या कोपऱ्याच्या अर्ध्या उजेडात दिसले ते स्वराचे हळूहळू रोशन व्हायला लागलेले डोळे ....
त्या काकांबरोबर गप्पा मारताना कुठे ही उमटायला लागलेले हसू ....
एकाच चेहऱ्यावर हास्याच्या इतक्या shades असू शकतात ?
आता कॅफेत कोणीच नाही ...काका ही ,'अच्छा बेटा', म्हणून निघून गेलेले ...जाताना स्वराचे न थांबवता येणारे हसू सुरु करून ...
तिला शाळेत , कॉलेज मध्ये , मैत्र मैत्रिणींमध्ये खुपदा बोलणी खायला लागायची ..अजून ही तिच्या नको तिथे हसण्याने पंचाईत होते च पण हसू उगाच येत राहते ....आणि थांबवायचे कसे मग ते ......?
आजूबाजूची गर्दी मिटत गेलेली ...तरी स्वरा चा पाय काही निघेना ..मुड बिघडायला नी सुधारायला काही कारणे लागत नाहीत तिला .
......मग काहीशा वेळाने कॅफे मध्ये एक एक चीज लागायला लागली ....
सुरवात झाली ती इक तारा ने ....
मधेच 'आजा सनम मधुर चांदनी में हम' लागले ....
जायला निघालेली स्वरा परत त्या गाण्यात अडकली ...
'हजारो ख्वाईशे ऐसी' सुरु झाले नी पुढे लागले ते ' आओ हुजर तुमको सितारो में ले चलु , दिल झूम जा ये ऐसी बहारो में ले चलु ' ...
असे कितीदा होते की तुमच्या आवडीची गाणी एका इतक्या अनोळख्या ठिकाणी लागतायत एका पाठोपाठ एक ...?
हातात आलेली कॉफी न मागता, नी ती ही हवी तशी .......
जणू काही तिच्या साठी मैफिल आहे ही ..तिच्या एकटी साठी !
न मिटलेले हसू , नी मिटलेल्या डोळ्यांनी ती प्रत्येक गाणे enjoy करतेय आणि अचानक गाणी थांबली ...एक एक दिवे कॅफे त तले मंदावायला लागले ....
जायचे नसतेच तिला ....सुरु झालेली कुठली ही आवडती गोष्ट संपलेली , थांबलेली आवडत नाही ..
लहानपणी ही आई गोष्ट सांगत असताना गोष्ट संपली नै पाहिजे असला विचित्र हट्ट ...
पण संपतात गोष्टी ....
इच्छा नसताना कॅफे चा तो कोपरा तिचाच झालाय असे वाटत असताना जायला लागणार ...
जड पावलांनी बाहेर पडायला लागली नी कॅफे कोणीतरी गिटार वाजवायला सुरवात केली ...
पण आता तर ती निघालीय .....
जायला हवेच नाहीतरी ....पुन्हा एकदा ठाम ठरवून बाहेर पडायला निघाली ...
गिटार वाजवणारा तो उंच मुलगा counter च्या इथूनच म्हणला .... - impress करायलाच वाजवत होतो , नाहीतर गाण्याचे कलेक्शन तसे उत्तम ए माझे ...
अशा वेळी नेमके कसे वागायचे बोलयचे असते ते स्वरा ला कधीच सुचत नाही ....
सुदैवाने तिने आशु ने सांगितलेला skirt घातलाय नी पायात ही sports shoes नाहीयेत ...
ती तिथेच रेंगाळली आहे तिथल्या छोट्याश्या दोन पायऱ्यांवर ...
मुलगा - जुहू च्या mocha मध्ये गेली आहेस कधी ?
स्वरा तिथेच तर असते खुपदा पण अशा वेळी उत्तर द्यायची गरज नसते नी अपेक्षा त्या हून नसते
ढगळा शर्ट , एक आठवडा जुनी pant , चष्मा , रोखून धरलेली फिरकी घ्यायच्या मुड मधली तेज नजर , चेहऱ्यावर उगाच चा आगाऊ पणा ...
स्वरा काही न बोलता त्याच्या बरोबर चालायला लागलीय ...
मी हृषीकेश ....तु ?
स्वरा - मी स्वरा , आशु ने पाठवले होते आज इथे ...
blind date
आशु माझी मैत्रीण ....
आम्ही दोघी फारच शिळ्या वाल्या जुन्या मैत्रिणी आहोत ..
पण तो मुलगा आलाच नाही .......
पण मला कंटाळा नै आला ...कॅफे छान होता तो ....
हृषीकेश - हो ,मी पण येतो बऱ्याचदा .....काय करते तुझी आशु ?
स्वरा - चित्र काढते कोणाला ही न समजणारी ....
हृषीकेश - Abstract .? हं आणि तु ? हसण्या पलीकडे ?
दोघे चालत राहतात ...
रस्ता ही फार आवाज न करता शांतपणे त्याची गिटार , तिची बडबड ऐकत सोबत चालतो आहे ...
गोष्टी काय कशा ही सुरु होऊ शकतात ...
रात्री सम्या ने आणलेल्या कानातल्या डूलांवर चे साभिनय प्रेम जाहीर करताना आसावरी कुठे कमी पडत नाही ... नी आता उद्या स्वरा जेंव्हा , 'कसला भारी मुलगा आहे हृषी', असे म्हणणारे तेंव्हा ही आसावरी आश्चर्य चकित होण्यात ही कमी नाही पडायची '......