Cadbury च्या खूप गोड वाटाव्यात अशा adds सुरु आहेत बघा सध्या tv वर ....
लहान पणी खूप मस्ती करून त्रास दिलेल्या शेजाऱ्यांना जाऊन cadbury चा box देऊन त्या मस्ती बद्दल ची माफी मागणारा एक जण ..
दिवाळीच्या आदल्या दिवशी पर्यंत आपल्या sub ordinate ला काम सांगत , ती पुरेशी वैतागल्यावर drawer मधून cadbury चा box देऊन तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आणणारा boss .......
'इस दिवाली आप किसे खुश करोगे '?


आत्ताच एक चक्कर mall मध्ये टाकून आले ....'coffee 'प्यायला म्हणून .....mall मध्ये मला उगाच  खूप असूया , असुरक्षितता , खोटेपणा तरंगताना दिसतो कायम  ! 
माझे बाबा म्हणतात  ,'कृत्रिम , खोटे असले  की उकडते कायम ', A.C.असला तरीही .....


मला न नेहमी रस्त्यावर असणाऱ्या मुलांना  त्यांच्या आजू बाजूला दिसणाऱ्या गोष्टींबद्दल काय वाटत असेल ह्याची उत्सुकता वाटत राहते ....
छान कपडे  घातलेली ,आई बाबांकडे हट्ट करून ice cream  मागणारी , Mac D मधले burgers हातात धरून गाडीतून जाणारी मुले .......
काय वाटत असेल त्या सगळ्या बद्दल ?


एक जपानी चित्रपट पहिला होता .....नाव , दिग्दर्शक असे काही खूप आठवत नाहीये 
एक खूप यशस्वी businessman ....आजच्या एका मिटींग मध्ये तो काही partners बरोबर सुरु केलेली company स्वतःच्या बळावर संपूर्ण पणे स्वतः विकत घेऊ शकणार आहे ..
त्याच्या ड्रायव्हर चा नी त्याचा मुलगा एकत्र वाढले आहेत अगदी लहान पणा पासून .....
मिटींग आधी त्याला एक फोन येतो , तुमच्या ड्रायव्हर चा मुलगा मी kidnap केला आहे ....आणि प्रचंड पैशाची मागणी करण्यात येते .....
त्याला काय करायचे सुचत नाही 
त्याची बायको अर्थात ह्यात विचार करण्या सारखे काहीच नाही 'पैसे द्या , तुमचे deal जाऊद्या, पैसे , यश काय ..मिळवालच परत 'असेच म्हणत राहते ...
त्याच्या मनात द्वंद्व सुरु राहते ..शेवटी तो देतोही  पैसे ...
 पण तो खूप  मोठा व्यावसायिक असल्या मुळे त्या केस मध्ये पोलीस involved होतात ....आणि खूप पद्धत शीर पणे त्याला blackmail करणाऱ्या माणसा पर्यंत पोचतात '...
त्याला पकडल्यावर हा व्यावसायिक त्याला विचारतो 'माझ्या हातून तुझे काही नुकसान झाले होते का '
थोड्या वेळाने तो माणूस बोलायला लागतो .......
' मी तुझ्या  घरापासून काही अंतर लांब राहतो , मला दररोज समोर हे प्रचंड साम्राज्य दिसत राहते , रोज ......
का ? 
हे इतके का मिळावे तुला, तु इतका श्रीमंत का ?
 हा अन्याय का ?
मी नाही ओळखत तुला .......मी त्या अन्यायाला ओळखतो , हा त्या अन्यायाचा सूड घ्यायचा प्रयत्न होता '........


अशा  अन्यायाची पुसट जाणीव मला कायम mall सारख्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावर  जाणवत राहते .....
५ रुपयांचा वडा पाव खाऊन लोक दिवस काढतात ...
११० रुपयांची इडली आणि १७० रुपयांचा पराठा वगेरे मिळतो mall मध्ये ...
'ज्यांना परवडते त्यांनी जावे' ...हे उत्तर असू शकत नाही ..कारण सतत  आतून बाहेरून सजून सज्ज असलेले हे malls आकर्षून घेतात लोकांना ......
आणि मग आत गेल्यावर 'तुमच्या कडे नसणार आहेत इतके पैसे' ह्याची जाणीव झालेले चेहरे असे प्रश्न कधीच न पडणाऱ्या चेहऱ्यांकडे असूयेने बघायला लागले तर त्यात वावगे काय ?


काहीतरी चुकतंय मोठ्ठे असे वाटत राहते मला अशा ठिकाणी .
तर .......
एक छोटा stall पहिला  पणत्यांचा ...खूप छान होता ....पण एक पणती १००० रुपयांची बघून फेस आला ....
'हे दिवे लावणेच आहे '!
रस्त्यांवर साधे , जुनाट , खराब  , फाटके कपडे घालून ही सगळी कडे सुंदर पणत्या विकत आहेत लोक जागो जागी .....पण तिथे bargaining करून १०० ला ६ च्या  ऐवजी ८ पणत्या मिळतायत........


रस्ते सजले आहेत .....
दिवाळी च्या आधी चे १ २ आठवडे खूप लगबग उडाली आहे ...
सगळ्यांना घरे आवरायची आहेत ...सजवायची आहेत ....
खूप कसले कसले sale नी offers दिसतायत सगळी कडे ....
फराळ बनतो आहे ...
'विदेस मधल्या रीश्तेदारोना' पोचता होणार आहे ....
daily soaps मधले लोक उतू जाणारी श्रीमंती , जाडी नी फटाके दाखवणार आहेत .
corporate offices , नातेवाईक , मैत्र मैत्रिणीना देण्या साठी dry fruits , sweets , cadburries , artifacts , gifts घ्यायची आहेत ...
नवीन कपडे घ्यायचे आहेत ......


विंदांची कविता आहे प्रचंड प्रसिद्ध 
'देणारयाने देत  जावे , घेणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे '
हे देणाऱ्याचे हात कसे व्हायचे त्याचे अलिखित शिक्षण खरे तर माझी संस्कृती देत आलीय . 
malls मध्ये लहान मुलांसाठी  free painting workshop होते खरे  पण ' हे देणाऱ्याचे हात वाली भानगड 'mallsमध्ये नाही बुवा मिळत ते ....
सण साजरे करावेतच ....पण जितक्या प्रेमाने , उत्साहाने आपल्यांसाठी करावेत ..तितक्याच उत्साहाने अनोळख्या माणसांसाठी ही करावेत '
दसऱ्या चे सोने वाटायला गावांमध्ये मिरवणुका निघतात ...ते प्रतीकात्मक सोने  काय फक्त आपल्याच माणसाला द्यायचे नसते .....
'देण्याची भावना महत्त्वाची  आणि काय देतोय ते ही तितकंच महत्वाचे ' आणि ते महत्व पैशांवर नाही ठरत .
'सुदाम्याने दिलेले पोहे अर्थात साधेच होते पण मला खात्री आहे की ते जगातले  सगळ्यात चविष्ट असतील ह्याची काळजी सुदाम्याने नक्की घेतली असणारे '.....


परत येताना महा मुश्किलीने   एक रिक्षा मिळाली ..... 
बाजूला न कंटाळता हॉर्न वाजवणाऱ्या एका स्कूटर वाल्याची  मी नी रिक्षा वाल्याने मिळून  शाळा घेतली ....
आता कसे दिवाळी आटपे पर्यंत गर्दीच गर्दी असणार ...,
रिक्षा कमी झाल्यात आता ....,
ह्या रस्त्याला एरवी बिलकुल गर्दी नसते वगेरे गोष्टींवर solid गप्पा झाल्या ...
एक भयानक मोठ्ठा signal लागला होता आणि समोर एक छोटे दुकान होते ...तिथे पणत्या आणि फराळ वगेरे होते काय काय ....मी रिक्षावाल्याला ' दोन मिनिटे थांबा हा' असे म्हणून पटकन उतरले ....एक छान पणत्यांचा सेट आणि लाडवांचे पाकीट घेतले ...आणि उतरताना मीटर च्या झालेल्या पैशांबरोबर त्याला ते ही दिले ...'happy diwali 'म्हणून ......काय मिळाले कसे सांगू शब्दात ? त्याने जे व्यक्त केलेन चेहऱ्यावर त्या १० १२ सेकंदात ते  इथे काही केल्या उतरवता येत नाहीये ......


दोन तीन मैत्रिणी यायच्या होत्या उद्या म्हणून काही खरेदी करणार होते , त्यांच्या च जोडीने मला नेहमी मी सकाळी 'बोहनी करते' म्हणून एखादे संत्र किंव्हा चिकू असेच देणाऱ्या फळवाल्या काकांना पण असाच छोटासा खाऊ घेतला .....ते एरवीच खूप लाड करतात पण आज जरा जास्त च खुश झाले आणि म्हणले ' दिवाली के दिन  सुबह आ जाना ..में भी दुंगा तुम्हे gift '.
मज्जा वाटली आहे मला खूप .....
आणि आता दिवाळी यायची वाट बघणे जास्त interesting होणारे ..
कारण माझ्या परीने का होईना ' इस दिवाली आप किसे खुश करोगे ' चे उत्तर मला सापडलेय ..