आपण आपले कुठे ही भटकत असतो , आपली कामे , deadlines आणि बाकीची अक्ख्या जगाला जिंकायची वगेरे so called स्वप्न घेऊन
आई बाबा घरी असतात
आपल्याला आपल्या  उलझलेल्या सुलझलेल्या गोष्टीची कोडी सोडवण्यात फुरसत नसते
mobile वर त्यांचे रोज दहा missed calls असतात 

घरी असलो तर आपल्याला कामाबिमांच्या गोष्टी बिलकुल करायच्या नसतात ...डोकेच उठते
आणि नाहीतरी कामाचे आपले नि त्यांचे जग किती वेगळे असते ..समजावण्याइतके patience नसतात
आपल्याला इतकी tensions नि stress वगेरे असतात
त्यांच्यासोबत गप्पा मारायला काय वेळ कधीही मिळूच शकतो की
आपल्या आत्ताच्या priorities वेगळ्या असतात

दरवाज्यावर  'काळजी करू नका .....आम्ही उत्तम असतो'  असे म्हणून निघताना
किती धुतला चेहरा नि लपवला तरी त्या आडची काळजी आपल्याला दिसलेली नसते असे नसते
'पण हौस भारी न ह्यांना सांगून बिलकुल ऐकत नाहीत'
'कसे जगायचे' हे कळलंय आम्हाला ह्या over confidance  ची त्यांना खात्रीच नसते

आपल्याला नाही बा चलत कोणी कामाच्या ठिकाणी   नी मित्रमैत्रिणी नी  गृहीत धरलेले
पण आपले उशिरा येणे ....कधी तर न च येणे
वाट्टेल ते खाणे नि हवे ते बोलणे
आपला विचित्र राग नी आपले survive करणे वगेरे
हे सगळे त्यांनी मात्र समजूनच घ्याचे असते
कारण गृहीत धरण्याचे सोयीस्कर logic त्यांच्यासाठी applicable नसते

ते काय असणार असतातच .....
आपण चुका केल्यावर निस्तरायला ......
भीती वाटल्यावर धीर द्यायला
रडू आल्यावर  कुशीत घ्यायला
मोडून पडल्यावर उभे करायला
पण ह्या सगळ्या disaster management  च्या गोष्टी
त्याची गरज पडेल तेंवा ठीक
आत्ता मात्र वेळा  बाकीच्या सगळ्या महत्वाच्या tasks न द्यायच्या असतात
आई बाबा काय......काळ, आज ..उद्या  असणारच असतात

आपल्या सगळ्या इतर preferences मध्ये मुद्दामून नव्हे पण नकळत ही घरची माणसे मधेच मागे राहतात
चालताना भले ठेच लागल्यावर आपसूक आई ग येत असले तरीही range मधेच जाते नी phone disconnect होतात
जगात सगळ्यात कठीण life आपल्या वाटेला आलेले असते
आई बाबांचे काय ..त्यांच्या वेळचे सगळेच सोपे होते
ते जवळ जवळ सत्ययुगात जन्माला आलेले होते
त्यांच्या पिढीचे असे psychological behavioural वगेरे problems नव्हते

त्यांनी बनवलेली टिकवलेली नाती , त्यांनी जमवलेली माणसे त्यांना आयती मिळालेली असतात
आणि आमच्या मात्र relationships प्रयत्न करून ही टिकत नसतात
आमच्या जगण्याची काठीण्य पातळी ड गटाची असते
where as त्यांना काय कुठल्या परीक्षाच द्यायला लागलेल्या नसतात

ते कधी we have had enough म्हणत नाहीत
ते त्यांचे त्यांचे न थांबणारे प्रेम करत राहतात
त्यांना ही राग येत असला कधीतरी आपला
तरी चुका आपले हे वेड्यासारखे पोटात  घेत राहतात 

परीक्षा , आजारपणे , स्पर्धा , परीक्षा , लग्न , मुंजी , हट्ट, महागाई
ह्या सगळ्याला तोंड देता येईल अशी एक system त्यांच्यात जन्मतः fit केलेली असते
पण खरे तर त्यांचे ही डोके दुखत असते नी मधेच sugar ही वाढलेली असते
त्यानाही कंटाळा येत असेल ही शक्यताच मागच्या पुढच्या जन्मात नसते

मग कधीतरी आपण जोरदार पडलो वगेरे नी लागल्यानंतर bag उचलून घरी जातो मुकाट
कारण त्यांना कधी कशाचे explanation द्यायला लागत नसते
नी मग आपल्याला सांभाळताना त्यांना ही ह्या खेपेस लागलेला दम जाणवतो
परत आपल्याला जरा लाज वाटते नी स्वतःचा निरर्थक राग येतो

तुमच्या प्रकारचे आई बाबा manifacture होणे बंद झालेले आहे माहित्ये का आता
आमची मुले बाळे आमच्या इतकी  इतकी lucky नसणार 
कारण तुमच्यासारखे होणे आम्हाला कसले जमणार

कधी कधी वेगळीच गोची होते ...तुमची आठवण येते , तुमची काळजी वाटते नी ती व्यक्त करायला
मातृभाषा ही तोकडीच पडते
ह्या ही भावना तुम्हाला परिचयाच्या असतात
नी आम्ही कुठे ही गेलो तरी
आई बाबा घरीच असतात