Monday, September 17, 2012

"य 'why's ????????confusions.. fear... insecurity/ 20 seconds of embarrasing bravery = why not"

[yay.....मी एका समीकरणाचा शोध लावला ....खूप दिवसांनी खरे तर ...
१२ वी ला असताना psychology च्या पुस्तकातल्या John Watson , Freud वगेरे मंडळींच्या theories वाचून inspire होऊन पेपर मध्ये माझी माझी पण एक थिअरी लिहून आलेले , खूप झकास वाटलेले , तसा त्या थिअरी ला अर्थात काही अर्थ नव्हताच ...पण तसाही theories ना अर्थ कुठे असतो नाहीतरी .......]

 एक फिल्म पहिली परवा ...' we bought a zoo ' नावाची .

पुन्हा एकदा प्रत्येक वेळी , दर वेळी प्रश्न पडून जातो मला की आपल्या आवाक्या पलीकडे जाऊन , स्वतःच्या भिंती तोडून , विस्तारून विचार करणाऱ्या व्यक्तिरेखा अशा चित्रपटातून च का येतात समोर ? वयापेक्षा खूप समजूतदार असलेली छोटी मुलगी , ह्याच रोज रोज च्या जगाची नजर चुकवून कोपऱ्यात त्याच्यासाठी रोज नवी प्रेमकहाणी उभी करणारी प्रेयसी , डोंगराइतका इगो आड येत असतानाही स्वतःच्या मर्यादा नी चुका स्वीकारणारा एखादा पन्नाशी चा बाप , दिसत नसलेल्या शक्यतेचा विचार करून ती कृतीत आणणारा प्रियकर ..हे सगळे माणूसपणाच्या आहारी जाऊन त्यातून सुटका करून घेणारे लोक चित्रपटात च का दिसतात ... त्या लेखकांना , दिग्दर्शकांना , अभिनेत्यांना कुठेतरी तसे कोणीतरी भेटले असेल , नाही ? असतील असे लोक ...कुठेतरी .. नक्की असतील अशी माझी आपली थिअरी .. बाकी थिअरी ना अर्थ नसतो हे आधीच मान्य केलेले असण्याने शब्दांची कोडी , पकडापकडी नी जोडसाखळी इतपत च त्याचा अर्थ ]

 तर We bought a zoo ........ आपल्या वाटणीला आलेल्या अडचणी पेलेनाशा झाल्या की सरळ एक गोष्ट करायची , त्या तिथेच टाकायच्या आणि सरळ नवी प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायची .... मुद्दा उत्तरे शोधणे हा नसावाच बहुदा ...

 आपला , आपल्या मुलांचा जीव असलेली partner मृत्यूला गमावल्या नंतर एकमेकांमध्ये अडकलेली , सोडवता न येणारी तीन आयुष्यं .... जगायचे मुख्य कारण असलेली 'ती'गमावलेला , गावात जिथे जिथे तो नी ती गेलेत त्या जागा चुकवत फिरणारा बाप , अवघड वयातला दिशाहीन मुलगा आणि ह्या दोघांना जोडू पाहणारी ७ वर्षांची छोटीशी मुलगी .... तीन दिशा ...एकाच छप्पर हरवलेल्या उघड्या घरातली माणसं .....उब यायला तर हवी .... मग घर बदला .....

 शोधता शोधता येऊन पोचतात ,त्याच शिळ्या जगापासून खूप लांब असलेल्या एका अशा घरात. जे बघता क्षणी लेकीला आवडलेय म्हणून बाप घ्यायचे ठरवतो, पण घर आहे एका बंद पडू आलेल्या zoo मध्ये .. ज्याला कोणी वाली नाही नी कोणी लक्ष दिले नाही तर तिथे काम करणारी काही डोकी आणि तिथले प्राणी सगळे वेगळ्या वाटांना जाणार वेगळ्याच अडचणी ...कधी न पाहिलेल्या , प्रश्न कधीच न सोडवलेले , अगदीच syllabus च्या वाहेर चे okey ..interesting आता हे जगून पाहुयात थोडे वेगळे काहीतरी करून पाहुयात .... .

हे छप्पर नसलेले कुटुंब येतं मूळ तुटू लागलेल्या zoo मध्ये . .तिथे जाताना सामान भरताना ,बाप लेकी गप्पा मारताना बाबाला आई ने originally त्याचा असलेला पण तिने ढापलेला नी तिचा झालेला एक sweat shirt सापडतो . ...दोघे थोड्या वेळ काही बोलत नाहीत ... मग मुलगी म्हणते ...आता सगळे नवीन घ्यायला हवं न ? बाबा समजूतदार पणे लेकीचा पोर होऊन मान हलवतो ...नी सोडून जायच्या सामानात न न सोडता येणारी , जुन्या प्रश्नपत्रिकेत ठेवणारी आठवण सोडतो .....

 सगळे काही हरवलेलं असताना , नुसतं धाडसा बद्दल ऐकण्यापेक्षा एखादे धाडस जगून पहावं अशा genuine प्रयत्न करणारा बाप , लेकीचे बोट धरून मुलाला सुद्धा त्या दिशेने विचार करावा म्हणून नेऊ पाहतोय पण मुलाचा जीव अडकलाय ..शहरात , मित्रांत , नसलेल्या आईत , उभे न करणाऱ्या शाळेत ... त्याला उत्तरे न येणारा जुना पेपर चालणारे .....आणि तो काढून घेऊन नव्या परीक्षेला उभे राहायला लागण्यातली अगतिकता , असहाय्यता व्यक्त होते ते बापा बद्दल च्या रागातून , आहे तिथेच अडकून रहायच्या अट्टाहासातून .....

 zoo साठी कामं करणारे लोक त्यांच्या त्यांच्या ओझ्यासकट येतात आणि सगळे उभे राहतात ते zoo restore करण्या साठी संपलोय मी असे वाटणारे क्षण येतात पण कुठे तरी धरून राहत , क्षणांना शरण जात पुढच्या दिवसाला खेचून आणत ....

 zoo च्या कामात गढून गेलेल्या बापाला एक दिवस मुलगी म्हणते ..तु हल्ली गोष्ट नाही सांगत , बाप म्हणतो ....हो , कारण आत्ता आपण एक गोष्ट जगतोय ... एकी कडे तो आयुष्याकडे ताकदीने बघायचा नजरिया आहे आणि दुसरीकडे बायको चा फोटो दिसला तरी कळ जातेय खोलवर ते नाकारायचंय .... मुलगा स्वतःशी , बापाशी , जगाशी भांडतोय पण त्यात ही त्याला गार वाटेल अशी एक साथ नव्याने त्या zoo मध्ये मिळतेय ....


आणि मग हळूहळू सगळे गुरफटलेले धागे वेगळे व्हायला लागतात नी गुंत्याचा गोफ व्हायला लागतो ... त्या zoo मध्ये ही एक मरायला टेकलेला वाघ आहे , त्याला मरू द्यायला हवं ही त्याची गरज आहे हे कळत असताना 'पुन्हा' कोणाला तरी जाऊ द्यायचे हे मान्य न करता येणारा बाप , लेका बरोबर भांडता भांडता , समजावताना त्याचा मित्र होतो आणि मी जे समीकरण ढापलेय ते सांगतो........ Do you know, sometimes all you need is twenty seconds of insane courage .Just literally twenty seconds of just embarrassing bravery .And I promise you , something great will come of it .......


 ह्या बाबाला एक दिवस लेकीच्या खोलीत तोच आईचा sweat shirt सापडतो ...पण आता त्याचा प्रवास ती आठवण टोचून दुखावण्याच्या पलीकडे गेलाय ...आता तो ती आठवण डोळ्यातल्या पाण्यासकट झेलू शकू शकतोय , नव्या प्रश्न पत्रिकेत जुन्याची उत्तरे सापडून जातात ....आणि मग एक दिवस zoo उघडते , लोकांनी गजबजून जातं ...

 त्या नंतर बाबा मुलांना त्या cafe त घेऊन जातो ... जिथे पहिल्यांदा तो त्यांच्या आईला भेटलाय ....ती भेट तो वर्णन करून सांगतोय आणि मुलगी मधेच म्हणते , 'बाबा , तु पुन्हा गोष्टी सांगायला लागलास बघ '...बाप हसतो नी पुन्हा गोष्ट सांगायला लागतो

 ".....तर मी असा बाहेरून जात होतो आणि ह्या इथे , इथे ती बसली होती ....मी अक्षरशः होतो तिथे थांबलो ..ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होती, ....पण आता सांगायचं कसं न .....मला सुचेना मी काचे तून पाहत राहिलो ......मग थोड्या वेळाने आत गेलो....ती काहीतरी वाचत बसली होती मला काहीच सुचत नव्हते ....".

 बाबा चे वर्णन सुरु आहे नी मुलांना ही ती भेट समोर डोळ्यापुढे उभी राहतेय ...डोळ्यात पाणी आहे ..पण ते हिमतीचे आहे ....गमावलेल्या माणसाच्या आठवणीना भिडण्याच्या इच्छेतून कष्टाने कमावलेले .. "आणि मग मी म्हटले .......why would an amazing woman like you even talk to me "? चित्रपटाच्या शेवटी त्याची 'तेंव्हा ची ती' दिसते हसताना आणि म्हणते ..... 'why not'?


 जगात why म्हणून जगायच्या रांगेत खूप लोक आहेत. आपापले न सुटणारे why सोबत घेऊन ,न संपणाऱ्या रांगेत तिथेच उभे राहिलेले why not ची रांग च नसते .....ती वाट फक्त त्या वीस क्षणांचं धैर्य दाखवलं की आपोआप खुली होणार असते ...,त्या च why च्या रांगेच्या बाजूला ...

कदाचित आपण सगळे खुपदा व्याकरणतल्या passive voice चा वापर फार करत राहतो ..गोष्टी घडाव्यात , काहीतरी व्हावे 'by someone else '. व्याकरण आणि आयुष्य सुद्धा active voice ने करायची गोष्ट आहे . तशी ही पण therory च आहे म्हणा , फार अर्थ नसलेली .......पण मला चित्रपट आवडला .... we bought a zoo.

  बाकी हा चित्रपट खऱ्या घटने वर आधारित आहे आणि असे एक zoo [Dartmoor zoological park]जगात खरेच आहे

एक वक़्त था ......

काफी अर्सो बीत गये
कुछ् पागल पन दिमाग पर सवार नही
बस बेचारे सयाने लोगो जैसी होने लगी हुं

 न आज कल रास्ता खोती हुं
 न चलते चलते गिरती हुं
 अनगिनत कप coffeeपिये भी काफी वक़्त हो चुका हे
 हाथ मे cell phone भी तीन साल पुराना हे

 सोच समझ कर खाती हुं
 घर वक़्त पर आती हुं
 ना कोई दोस्त जान लेने पर तुला हे
 न कोई authentic दुश्मन बचा हे

 कपडे सारे धुलकर अलमारी में रक्खे हुंए
 किताबो के सारे पन्ने किताब से ही जुडे हुए
 सब कुच अजीब साफ साफ सा हे
 मेरा ही behavior एक डरावना ख्वाब हे

 कितना सुकून मिलता था ३ दिन ना नहा ने के बाद
कितनी खुशी मिलती थी maths में fail होने के बाद
 अभी भी ताजी हे सडसटवे अधुरे प्रेम कहानी की याद
 वैसे तो साल मे १८ बार जिंदगी होती थी बरबाद

 और ट्रेनें छुटा करती थी
 में बारिश से मिला करती थी
 उन दिनो ,धूप तकलीफ ना हुंआ करती थी
 बिखरी पडी जिंदगी भी sexy लगा करती थी

 अभी ना कही घर में कुडा कचरा
 न दिवार पे मकडी का जाल
पागल पन से मजेदार बने कितने सारे लम्हे
पीछे छोड आई वो सारे छीछोरे साल

अब वैसे जिंदगी तो business as usual चल रही हे
कल शाम से, न जाने क्यो, मुझे मेरी ही याद आने लगी हे

भिंती पलीकडची शाळा

'....आणि काय काय करता गं मग तुम्ही '?वर एक मुलगी मोठ्य्याने 'मलमखाम' असं म्हणली .आम्ही हसलो सगळे खूप आणि ती ही हसली . खूप साऱ्या काळ्याभोर हसऱ्या डोळ्यांच्या सावळ्या मुलींच्या शाळेत जाऊन आले आज .
 माझं खरं तर ,जगाचं 'आपापली शाळा ' ह्या विषयावर जसं प्रेम असतं तसं कधीच नव्हतं ,पण 'मधली सुट्टी' च्या निमित्तानं खूप वेगवगेळ्या शाळांच्या मुलांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेंचेस वर बसून गप्पा मारता आल्या , त्यांची सिक्रेट्स ऐकायला मिळाली , त्यांचे amazing निबंध वाचायला मिळाले , त्यांची मला बंद पडणारी बडबड ऐकायला मिळाली .शहरातल्या शाळा , गावाकडच्या शाळा , प्रायोगिक तत्वावर सुरु असलेल्या शाळांचा रिसर्च ह्या निमित्तानं बघता बघता शाळेच्या आतल्या नी पुस्तकांबाहेर च्या च्या वेगळ्या जगाशी ओळख झाली
महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमानुसार दर १ किलोमीटर च्या अंतरावर एक शाळा असायला हवी ...रस्त्यांवरून जाताना आपल्याला ' वाहने सावकाश हाका , पुढे शाळा आहे ' चे बोर्ड सर्रास दिसतात .त्यामुळे शाळा नक्की आहेत भले २६५३ कमी का असतील .पण रस्त्यांवरून जाताना आपल्याला अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असलेलं दिसतं ..तिथे अनेक लहान मुलं मुली आपापल्या आई बाबांसोबत आलेली असतात .त्यातली काही तर कदाचित शाळा ही बांधत असतील ....त्यांच्या शाळेचं काय ? ती त्यांच्या आईबाबांसोबत वीट भट्ट्या जिथे लागतात तिथे , उस तोडले जातात तिथे जातात . त्यांच्यासाठी शाळा आहेत त्यांच्या गावात पण त्या रिकाम्या ....ओस पडलेल्या ! कागदोपत्री दर एक किलोमीटर अंतरावर शाळा उभ्या राहतात . आपल्याला ऐश्वर्याच्या मुलीचं बारसं ,मंत्रालयाला आग , इशा देओल चे संगीत वगेरे बातम्या माहित असतात .सिग्नल ला पुस्तकं विकणारी मुलांना 'शाळा' असेल का वगेरे प्रश्न आपल्याला सुचतच नाहीत .सुचेपर्यंत सिग्नल ग्रीन होतो .

 जिथे पालकांसाठी त्यांच्या मुलांनी शिकणं ही गरज च नाहीये , जिथे मुलीला शिकवून करायचेय काय ..ती जाणार दुसऱ्याच्या च घरी त्यापेक्षा धाकट्या भावाला सांभाळेल तरी असा दृष्टीकोन आहे त्या देशात प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार आहे खरा पण त्याचं करायचं काय ? हातावर पोट असलेले वारली , कातकरी समाजाचे लोक खुपदा मजुरीचे काम करायला आपलं गाव सोडून वर्षाचे काही महिने वेगवेगळ्या शहरात , गावात जातात जिथे काम असेल तिथे ,त्यातले काही आता त्यांच्या मुलीना एका शाळेत जाऊ द्यायचं ठरवतात आदिवासी आणि वीट भट्टी कामगारांच्या मुलीन्साठीची ही शाळा आहे वसई जवळ च्या उसगाव भागात .

 "माझ्या मोठ्या बहिणीला शाळा सोडावी लागली , आणि धाकट्या भावाला सांभाळायला लागलं .माझ्या आईला मी झाले तेंव्हा तिला आजी ओरडली . आजीला मी आवडत नव्हते .पण मग मला आई बाबांनी ह्या शाळेत घातलं नी नंतर आजीला कळलं मी हुशार आहे ते .आता नही ती मला ओरडत .मी पण शिकून ह्याच शाळेत शिकवायला येणार".... . असं सांगणारी एक मुलगी . उद्या ती खरंच शाळेत येईल का शिकवायला वगेरे हे प्रश्नच महत्वाचे नाहीत .मुळात इथपर्यंत पोचायला तिला करायला लागलेली कसरत च आपल्या गावी नसते , आपल्या ओळखीची नसते .आपले कसे पोट भरल्या नंतरचे complicated प्रश्न ...त्यांचा प्राथमिक आहे syllabus अजून . कृपया तुमच्या मुलीना आमच्या शाळेत येऊ द्या असे पालकांना समजवावे लागतं ...नी गेल्या काही वर्षांच्या सतत च्या पाठ पुरवणी नंतर आता शाळेनं बारसं धरलेय .

 तरी मग एखाद्या मुलीच्या घरून दोन तीन महिन्यांनी आई , भाऊ भेटायला आले की मुली रडून रान उठवतात .खूप मुलीनी तर त्या कशा वेगवगेळ्या प्रकारे पळून गेल्या , मग कसं त्यांना परत आणलं हे ही मला एकदम छानपैकी सांगितलं .कसे ही असलं तरी आपल्या आजू बाजूच्या माणसातून , घरच्यामधून उठून कुठेतरी एका जागी येऊन रहायचं आणि वर ते 'अभ्यास शिकवणार' पण ..कसं आवडणार? ....

पण काही महिने जातात नी मग हळूहळू त्यांची मुळं इथे रुजायला लागतात . चार भिंतींच्या पलीकडच्या ह्या शाळेत शिकवलं काय जातं ह्या चं मला काही पडलेलं नाही कारण मला शाळेच्या गणवेशात , इकडे तिकडे फिरत रमणाऱ्या , घसरगुंडी ला सर्कुंडी म्हणत , कोंबडी नी पिंजरा खेळणाऱ्या , एक क्षण ही न कंटाळलेल्या मुली भेटल्या .

 त्यातल्या एका रेणुका ला 'करीना' व्हायचं आहे... एका जयश्री नं ९ व्या वर्षी शाळेत प्रवेश घेऊन एका वर्षात दोन दोन इयत्ता दिल्यात नी आता ती दहावीत आहे . एक पूजा पहिली पासून इथे आहे नी आता १२ वी ला सकाळ ची ५ ची बस घेऊन ती तासभर लांब असलेल्या एका collage मध्ये पुढचे शिकतेय . जिना उतरताना एक मुलगी एकटीच वर्गात बसून हार्मोनियम वर हात फिरवताना दिसली . एकीला अजिबात आवडत नाही अभ्यास करायला पण तिला fashion designer व्हायचेय म्हणून मग आता शिकायला पाहिजे ..... इथेच मोठ्या झालेल्या मुलींच्या डोळ्यात जबाबदारी ची जाणीव दिसते ..त्यांच्या नंतर आलेल्या कच्च्या बच्च्यांना सांभाळत ह्या ताया शाळा सांभाळतात त्यांच्या शिक्षकांच्या मदतीनं . एक परिणीता होती बुजलेली नुकतीच आलेली ....पण पुढच्या वेळी जाईन मी तोवर ती रमलेली असणारे ..मला खात्री ए

... बाहेर पडल्यावर ह्या आदिवासी मुलींचे प्रश्न सोपे नाहीच होणारेत ..उलट आदिवासी समाजात त्यांना लग्नासाठी त्यांच्या योग्य मुलं कशी मिळणार ?पुढे दहावी नंतर ह्या शाळेच्या सोप्या वातावरणा तून बाहेर पडून collage मध्ये कशा सामावल्या जाणार ?तिथले संस्थापक म्हणले .."दारू न पिणारा नवरा मिळाला तरी खूप ...म्हणून मग मी त्यांना कराटे शिकवतो , निदान स्वतःचे संरक्षण तरी करू शकल्या पाहिजेत ".

 मजा आली त्यांच्या बरोबर खेळून , त्यांची गाणी ऐकून , 'तु सगल्या हिरोला भेटला काय' असे वेगळं मराठी ऐकून ....मी निघताना म्हटलं....मी येईन परत .. त्यावर लग्गेच प्रश्न आला .....'कधी'?

 तशी लाज अधे मध्ये वाटावी आपल्या असण्याची असे अनेक प्रसंग आले तरी अशी एखादी शाळा ,आपली दुक्खं मुर्ख आहेत नी त्यावर रडण्या बिडण्याचा गाढवपणा वगेरे करायचा नसतो असे जाणवून देते ... मला कधी शाळा नाही आवडली पण ह्या शाळेत मात्र मला जायला खूप आवडेल .....

 [ वसई जवळची वज्रेश्वरी इथली उसगावातली ही शाळा आदिवासी मुलीना शिक्षण देते , त्यांचं राहणं , खाणं , पिणं , पुस्तकं , गणवेश , छंद , संगणक सगळा खर्च शाळेचे संस्थापक funds मधून करतात , कोणाला काही करावेसे वाटले , शाळेत जावसं वाटलं, ,मुलीना गोष्टी सांगाव्या वाटल्या , तिथे जाऊन त्यांच्या बरोबर कधी रहावसं वाटलं , खेळावं वाटलं तर ' स्वतःसाठी ' म्हणून जरूर जा ...मुली तुमचं नक्की हसून स्वागत करतील ]

Get well soon ! ! !

सगळेच गमतीचं असते !

 म्हणजे निवडणूक प्रचार सुरु होतो नी मतं मिळवण्यासाठी अनेक गोष्टीचं वाटप सुरु होतं ....तेंव्हा राज्यकर्त्यांना मतं दिसत असतात न गरजूंना न ५ किलो तांदूळ. Horn वाजवणाऱ्या रिक्षावाल्याला समोर चे traffic दिसत असतं नी आपल्याला कारण नसताना सतत honking करणारा रिक्षावाला डोक्यात जात असतो . रथाचं चक जमिनीत रुतलेलं असताना कर्णावर सोडलेला बाण काही जणांसाठी भ्याडपणा असतो , कृष्णासाठी ती आवश्यक राजकीय खेळी असते '. चोरी करणाऱ्या कडे त्याची त्याची कारणं असतात आणि चोरी ज्याच्या घरची होते त्याला ही चोराला शिव्या शाप द्यायचा अधिकार असतोच . दुर्दैवानं "योग्य अयोग्य" चं भाबडं जग उरलेलं नाही ...आता ते झालेय subjective , various point of views , perspectives, perceptions चं जग .

इथे मग हर एकाचा आपापला दृष्टीकोन आला , आपापलं म्हणणं आलं , आणि मग इथे ज्याच्या त्याच्या दृष्टीनं बरोबर सगळेच असतात , its the situation, or such are the circumstances ...अशी जबाबदारी चे बोट दुसऱ्याकडे दाखवायला शिकवणारी वाक्य आली . मोठमोठे लोक पूर्वी "होऊन गेले" हे त्यांचे सुदैव च म्हणलं पाहिजे कारण नाहीतर दर मिनटाला f***k off , चू** , भें***अशा शिव्या देत वावरणारी गर्दी पहिली असती , मूर्ख frustration हवेत तरंगताना दिसले असते , इतक्या इतक्या गोष्टीवरून डोकं फिरणारे मी ,तू , ते .....दिसले असते .ह्या साठी केल्या असतील गोष्टी लोकांनी ? त्यांच्या ही वेळेला केल्या जाणाऱ्या गोष्टी स्वार्थ म्हणून केल्या गेल्या .मग ते मरणे का असो किंव्हा सत्याग्रह करणे असो ,जन्मठेप भोगणं असो ...ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी केल्या ते जगाचं कल्याण करायला नव्हेच .....'स्वतःसाठी म्हणून '. पण मधल्या काळात पुलाखालून पाणी बरेच वाहून गेलं ...आणि आता उरले ते बड्या घरचे पोकळ वासे .

 पूर्वी ही लोक यायचे एकत्र , रामाच्या काळी सुद्धा ,अगदी दंतकथा समजून उदाहरण द्यायचं झालं ,तरी माकडांनी सुद्धा पूल बांधला .पण आता शेतकऱ्याच्या मुलांची मोळी सुटलेली लाकडाची नी सगळेच सुटे विस्कळीत झालेले .! आता फक्त शब्दांचे ढग जमतात पण त्याच्यात पाणी नसतेच ....आता अधू झालेल्या नजरांना end of season चे sales दिसतात ,macdy , domino's , pizza hut मधून ढेकर देऊन बाहेर पडल्यावर कुठला तरी पूर नी कुठल्या तरी दुष्काळाला कुठाय जागा ?

 काल आज मध्ये एक दोन गोष्टी पहिल्या नी बरीच भीती वाटली .माझ्या बहिणीच्या hostel मध्ये एक 'चर्चा' ! विषय एक मरायला टेकलेलं कुत्र्याचं बारीकसं पिल्लू आणलेय, "ते असावं नी नसावं" ह्यावरची प्रदीर्घ संवाद सत्रे .. नी मग मला साक्षात्कार झाला की देवयानी , भाग्यलक्ष्मी , चार दिवस सासूचे , आणि जगण्याशी साधारण संबंध नसलेल्या सिरिअल्स का चालत असतील !

 वेळ खूप आहे खूप जणांना आणि त्याचे काय करायचे ते नेमके ठरवता आलं नाही की "कुत्र्याचे पिल्लू" हा मिटिंग भरवण्या इतका मोठा विषय होतो . रात्री ९ ३० ते १ ३० ह्या प्रदीर्घ कालावधीत सगळ्यात हुशार वागलं ते तर ते छोटूसे पिल्लू ...लोकांना बोलताना बघून ते शांतपणे एका टोपलीत जाऊन बसले नि वसा वसा भांडणारे लोक, एकमेकांच्या अकला काढून पांगल्यावर बाहेर आलं . त्याचे केस , त्याचा वास , त्याची शी शु ह्यानं कदाचित economics ह्या विषयावर post graduation करायला भारतातल्या विविध भागांतून आलेल्या मुली जीव गमावू शकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली ..

 एकी कडे ह्या मुली नि दुसरीकडे त्या पिल्लाला कोणीतरी खाईल , ते मरेल ह्या काळजीनं जरा जास्त व्याकूळ झालेल्या मुली ....एकत्र आल्या ...तात्विक चर्चा , टोमणे , भांडणं ह्याचा एक जंगी कार्यक्रम केला ..आणि एकमेकांना bitches म्हणत आपल्या खोलीत गेल्या ...ते पिल्लूच काय खरे तर इतका विखार पाहून अजून थोडा वेळ ते चर्चा सत्र चालले असते तर मी ही मेले असते !

 बरे त्या कुत्र्याचा त्रास होणारे बाकीच्यांना being humanबद्दल सुनावत होते आणि कुत्र्याची काळजी असणारे काळजीत ग्रस्त होते . मला दोघांची काळजी वाटली .तशी मला माझीही वाटतेच . एकदम त्या कुत्र्याशी relate केलं मी !घाबरलेले ते नी बिचकलेली मी . निर्णय क्षमता आणि tolerance level ह्या इतह्या इतक्या चिंधड्या उडलेल्या !

 जग इतकं फक्त आपल्यापुरता होऊन जातं कि त्यात बाकी काही बरोबर असायला नी ते मान्य करायला जागा च नाही उरलेली .सगळी कडे राडा नी traffic jam ... आणि असे एका कुत्र्याचे काय करायचे ह्याच्या conclusion ला न येऊ शकणारे लोक देशाची धुरा वगेरे वाहणार ....!

 दुसरा प्रसंग तर आणखी गमतीशीर .

आज पुण्याहून मुंबई ला घाई घाई त यायला लागलं .. ७ १४ ला स्टेशन ला पोचले नी ७ १५ ला ट्रेन सुटायची . समोर य रांग ..फार विचार न करता ट्रेन मध्ये शिरले . म्हटलं सरळ T.C.ला गाठून fine भरूया . एक जागा तर मिळेलच! T.C. नं pass holder ladies boggie मध्ये पावती करून एक जागा दिलीन बसायला .

एका एका अक्ख्या बाकावर एक अशा पहुडलेल्या समस्त स्त्रिया अन्याया विरुद्ध पेटून उठल्या आणि असे कसे तुम्ही देऊ शकता जागा , नियमात बसत नाही म्हणून त्यांनी T.C. ला घेरले . "एक मुलगी नाही की एकदा adjust करून घेऊ शकत , गर्दी ही नाहीये", असे त्याने म्हटल्यावर त्यांनी त्याला त्या कशा पाहते ४ वाजता उठतात , त्यांना कसे काय काय करावे लागते , त्यांच्यावर अन्याय होतो , असे दमदाटीने बजावले . T.C. ही इरेला पेटला ..बघतोच मी कसे उठवता तुम्ही तिला तिथून असे म्हणून तो ही तिथे च कोट वगेरे काढून माझ्या साठी थांबला .'तो तिथून गेला की मग ' ? ह्या कल्पनेने मला थोडा घाम फुटला.

आजूबाजूला अनेक मतप्रवाह दिसत होते .काही बायका आडव्या पडून वाद ऐकत होत्या .मधेच डोळा ही लागला असावा काही जणींचा .काही जणींना मी म्हणजे समाजाला निर्माण झालेला धोका वाटायला लागले . काही जणींनी माझ्या नी T.Cह्या घराण्याचा , आई बाबांचा उद्धार वगेरे केला .माझी full on फाटली होती . मधेच एका बाकावर उभे राहून "अहो मूर्ख बायकानो , कान नी डोळे उघडा न जरा .आपापल्या वैतागातून , न जमलेल्या गोष्टींच्या त्राग्यातून , मोडलेल्या झोपेतून बाहेर येऊन ऐका न ,बघा न आजूबाजूला '? असे म्हणायची इतकी खाज येत होती आणि तेंसे केलं तर लोणावळ्याच्या खाई त d end होईल ह्याची ही खात्री होती .

 कौतुक वाटलं ते मला त्या T.C.चं . तासभर त्यानं खिंड लढवली खरी पण त्याला बाकीचीही कामं होतीच ...मग एकदम उठला ...माझ्या बाजूला आला नी म्हणला .....coffee प्यायची ?चल .....ह्या बायका मरुदेत ....

जाताना माझ्या समोर एक भीम काय आकाराची महिला पाय अडवून आली नी म्हणली "आमच्या डब्यात थांबायचे नाही" .मी म्हणले ,नै ते बरोबर आहे , पण मला माझ्या पायांनी बाहेर जायचे असेल तर तुम्हाला तुमचे पाय बाजूला करावे लागतील न ....?"

 जीव मुठीत धरून मी बाहेर आले ..पंजाबी होता T.C. आम्ही तीन चार डबे पुढे आलो..तो मला म्हणला ,'एक मिनिट थांब'.त्याने गाडीचा दरवाजा उघडला नी एक मोठ्ठा दीर्घ श्वास घेतलान ....थोडा relax करता हू ...फिर चलते हे असे म्हणून मग तो मला deccan queen चा famous cheese toast नी coffee साठी घेऊन गेला .

त्याच्या जोडीने दोन बंगाली , एक यु पी चा असे आणखी दोघे जण होते . breakfast साठी त्याची वाट पाहत थांबलेले . "कुछ पंगा हुआ क्या "? असे त्याची विचारल्यावर ह्या जसपाल नावाच्या बहादूर T.C. ने त्यांना रामकहाणी सांगितली .आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा झाल्या . खूप च विरळ oxygen मधून भरपूर झकास oxygen आल्या भागात गेले . हवा खेळती होती . लोक मोकळे होते .

 एक जण त्यांच्यातला कविता करतो छान असे दुसऱ्यानं सांगितलं . ..एकानं मला एका सिनिअर T.C. च्या send off party हे निमंत्रण दिलेन .तो सहज बोलता बोलता म्हणला ..वाईट वाटून घेऊ नका ..."पण औरते कमिनी होती हे ...मुझे तो डर लगता हे ...में तो कभी उनसे पास टिकट न भी हो ....कुछ बोलता नही ...क्या पता बाद में क्या complaints कर दे ..लोग तो औरत को सपोर्ट करते हे ....आप लिखो कुछ औरते जो अत्याचार करती हे उस के बारे में "!
 मला त्यांच्यात आल्या नन्तर पुन्हा त्या hostel मधल्या कुत्र्याशी relate करावं वाटलं ...चांगल्या अर्थानं ..तिथे ही सगळ्या विरोधाला पुरून उरून त्याची कड घेणाऱ्या मुली होत्या आणि इथे ही त्या सगळ्या बायकांपासून मला वाचवणारा जसपाल होता .. पण काळजी वाटली .. वाटलं की नेहमी नसेल असे कोणीतरी सोबत कोणाच्यातरी .
इतका राग कसला खदखदतोय लोकांमध्ये ?
पुण्यात रिक्षावाल्यांना भर सकाळी ११ वाजता ही एखाद्या ठिकाण हून परत यायला passenger मिळणार नाही म्हणून half return का हवा असतो हक्क म्हणून? ट्रेन मध्ये उभ्या राहिलेल्या माणसाला बसलेल्यान्बद्दल आपसूक चीड का आलेली असते ?
 बरेच बरे नाहीये आपल्या लोकांना . "लगे राहो मुन्नाभाई "मधले संवाद आठवले .."अरे मामू , वो बेचारा बहोत बिमार हे ..उसे ग्रीटिंग भेजो ...बोलो ....get well soon". I just can stop thinking about those 3 words ...."get well soon'.!

उम्मीद पे दुनिया कायम हे......

'kate and Leopold' नावाचा ठार वेडा आहे सिनेमा .
खास करून आत्ताच्या realistic चित्रपटांच्या सद्दीत हा सिनेमा अजिबात काही 'घडवत' वगेरे नाही .पण ती अशी एक fantasy आहे जी खरी व्हावी असे खूप लोकांना वाटेल . जी पाहून य दिवस उलटले , वर्षे उलटली , त्यातले तपशील पुसट होत गेले , तरी ही 'kate and leopold' असे म्हटल्यावर ,आठवल्यावर एक हलके हसू येईल चेहऱ्यावर !

 दिल और दिमाग का झगडा , किंव्हा leap of faith बद्दल जगात बोलले जाते खूप , प्रत्येकाची आपापली अनुभवांची गाठोडी ही असतात सोबत ...पडून पडून , आणि so called वास्तव जगातले चटके वगेरे खाऊन आपण आपल्यातली fantasy बद्दल ची आपसूक ओढ गमावत जातो
 .... ह्या चित्रपटात kate चे एक वाक्य आहे ,'you can't live a fairly tell , may be this whole love thing is the grown up version of Santa claus,just the myth we hae been told about since childhood'. मला काय वाटतं माहित्ये का , की जादू अशी अपोआप होत नसते ...कोणतीही fantasy जी आपण आपल्या आत उगवू देतो , वेडेपणा जो फोफावू देतो, त्यातून च अशा दृष्ट लागण्यासारख्या जादुई गोष्टी घडत असतील , नै ?विश्वास पाहिजे ...कितीही लागल्यानंतर , दुखल्या नंतर ही तो आशावादाचा झरा कायम ठेऊ शकला न माणूस तर मग मजा येत जाते . मग नुसते उठणं ,बसणं , येणं , जाणं , रात्र , दिवस , सूर्य ,चंद्र , तारखा , वार , सनावळ्या नाही राहत , प्रत्येक दिवसाची एक दंतकथा होत जाते ...बाकीच्यांचा विश्वास बसो अगर न बसो.

 ह्यात एक stuart नावाचा वल्ली पण आहे , ज्यानं इतिहासातल्या , 1857 सालच्या एका duke ला उचलून आणलेलं असते ते ही time machine किंव्हा तसले कोणतेच फंडे न वापरता ....अर्थात नेहमी प्रमाणं जगाचा त्याच्यावर विश्वास नसतो आणि त्याला बिचाऱ्याला mental ward मध्ये रफा दफा करण्यात आलेले असते .का कसे , वगेरे logic गुमान बाजूला ठेवूयात , कारण logic नाहीचे , आणि ते शोधणे हा ही उद्देश नाहीये ... उद्देश आहे तो विश्वास हा संकल्पने वरचा विश्वास न ढळू देण्याचा . तो तिथल्या एका नर्स शी गप्पा मारताना म्हणतो , 'It is no more crazy than a dog finding rainbow .Dogs are colour blind , Rachel .They cant see colour , just like we dont see time .We can feel it passing , but we cant see , its just a blur .Its like you are riding in a supersonic train , and the world is just blowing by .But imagine , if we could stop that train , get up , look around and see for the time for what really it is .The universe , the world, the thing as unimaginable as colour to a dog .And thats real , untangible as real the chair you are sitting in . We can see it like that and I mean, really look at it , then may be we could see the flows as well as he foam and thats it , its that simple , thats all I dicscovered. May be I am just a guy who saw a crack in the chair , that no one else could see . I am just the dog who saw the rainbow , only none of the other dogs believed me. "

 विश्वास ठेवला पाहिजे ....स्वतःवर आणि इतरांवर ही ! रस्ता अनोळखी आहे , सावध राहायला पाहिजे म्हणत , धोके शोधत राहिलो तर मग कदाचित सुखरूप पोचू ही पलीकडे पण उगवणारे फुल , मावळणारा सूर्य ही सगळे त्या धास्तीत बघायचे राहून जातं . आपण आपले safe game जगत राहतो आणि मग हे काही नव्हतेच रस्त्यावर , अफवा आहेत सगळ्या , कुठाय मजा आणि कुठाय सुख ? सगळे खोटे आणि फालतू दंतकथा अशा निष्कर्षाला येऊन मोकळे होतो ....

 सुखा बद्दल आपल्या पु लं चां एक झकास लेख आहे त्यात त्यांनी लिहिलंय , "रोज उगवणारा सूर्य जोपर्यंत , 'काय साहेब , आपली काय इच्छा आहे ?दिवस कसा जावासा वाटतोय ते सांगा म्हणजे त्या प्रमाणे सगळी arrangement करतो" असे म्हणत नाही , तोवर कशाला सुख म्हणावे ते आपले आपण च ठरवायला हवं". म्हणजे मग स्वतः ची कविता करणे आले , स्वतःचे धडे लिहिणे आले ..भावनांना जवळून बघून त्यांचा आदर करणं आलं ...आपल्या सुखाची recipe स्वतः बनवणं आलं . आणि ती अर्थात पहिल्या attempt मध्ये कशी मस्त होणार ? काहीतरी बिघडणार , करपणार , कमी जास्त होणार ...बाहेरून पैसे देऊन आणलेली readymade गोष्ट ही वाईट नाहीच लागत पण मग experience magical व्हायची शक्यता संपते . आपल्या प्रत्यकाला जगात entry मिळालीय ती अनेक गोष्टीची possibility म्हणून .आपल्या आजूबाजूला माणसे पेरलेली आहेत , घटना लपवलेल्या आहेत , गोष्टींमधले , माणसांमधले सौदर्य दडवलेले आहे .सगळे काही आहे फक्त मग सगळा game सोप्पा करून टाकला तर नियतीला कशी येईल मजा ? तिला ही तिचा वेळ घालवायचाय की! मग आपले डोळे बांधलेले . आणि चाचपडत , अंदाजानं , वासानं अजमावत सारं कोडं सोडवायचं , आता तो खेळ आहे .आणि आपण सगळेच बऱ्या पैकी लिंबू टिंबू असतो ह्या खेळात म्हणून मग लोचे होतात . डोळ्यातल्या पाण्याचा कधी हिशोब लागत नाही .निर्व्याज हसू मनात उरत नाही , कधी जुन्या घटनांच्या आधारे नवीन शक्यता नापास करून टाकतो , कधी चुकीचे लोक निवडतो , कधी कायम धरून ठेवायचे हात सोडून देतो .ह्याने कोडे आणखी जटील होते ..कधी भावना खूप टोकदार होतात किंव्हा माणसं खूप बधीर होतात .काही जण quit करतात , काहीजण खेळत राहतात , हरत राहतात . हेतू कोडे सुटणे हा नसतो च ....हेतू 'शक्यता आजमावणं' हा असतो .

 जगतात सगळे च आणि मरायचे ही सगळ्यांना आहेच .एका क्षणा नंतर इतिहासाच्या आधारानं , आपल्याच जुन्या अनुभवांच्या कुबड्या धरत दिवस काढणं सोडून दिले , घाबरणं सोडून दिले की मग next level सुरु होते कारण तोवर Leopold म्हणतो तसं"Because life is not souly comprised of tasks but taste" हे आपल्याला कुठल्या तरी एका क्षणी लक्ख उमजतं आणि fantasy च्या दिशेने आपलं एक पाउल पुढं पडतं .

Friday, July 29, 2011

उजळण्या

आनंद कितीदा overflow होऊन वाहतो अंग खांद्यावरून ? मुंबईत फक्त सकाळचे दोन तास येते पाणी तसा limited व्यक्त होतो तो ..
जखमा मात्र अश्वथामासारख्या ...चिरंजीव ....
डोळेही दुक्खाना धार्जिणे

तुकारामांनीही दुक्ख डोंगरा एवढे नी सुख जवापाडे का म्हटले असेल ?
Freud च्या theories ना मन हे जन्मतः "अपुऱ्या दिवसाच्या बाळासारखे" नाजूक असते , हेच सापडावे अभ्यासातून ?
वेदनेशी नाळ जोडलेली असणे काही ठाऊक नसतानाही ?
जन्माला येण्यापुर्वीच माहित असलेली भावना
जिवंतपणाची पहिली खुण म्हणजे रडणे ?

नवीन काही फार शिकत नसावा माणूस .
हे त्या अभिमन्यू सारखे आहे
जन्मापुर्वीचेच धडे गिरवण्यात मश्गुल असताना चक्रव्युह भेदायचे राहून जाते
गृहपाठ पूर्ण होत नाही
परत आणखी काही जन्म त्याच त्याच चुका करण्यात घालवायचे

ट्रेन मिळाली नाही कि चरफडायचे ...
मनासारखे झाले नाही की वैतागायचे
आजूबाजूच्या लोकांच्या मतांनी आपले सुख मोजायचे
ते अर्थातच कमी पडणार असते कायमच

dieting कसे जड जाते करायला नी smoking ची सवय सुटणे तसे कठीणच
तसेच असेल कदाचित
कण्याचे अश्रूंशी नाते असेल जवळचे
तर आनंदाची allergy च होणे साहजिक ए
मग उमललेल्या फुलांपेक्षा लक्ष माना टाकलेल्या फुलांकडेच जायचे
नी स्वतःच्या रडण्याने सुरु झालेले आयुष्याचे वाक्य इतरांच्या रडण्याच्या पूर्णविरामाने संपायचे

Thursday, July 28, 2011

पहचान

बंद खोलीत आवाज फक्त दया माया नसलेल्या पावसाचा
अंधार overflow होत असताना
नी पाणी भिंतीतून गळत
अंगात , मनात झिरपताना प्रश्न हाच पडतो
"हा तोच आहे पाऊस"?, ज्यावर माझे डोळे मिटून प्रेम आहे ?

पण ह्याला कसली चव नाही , गंध नाही , भावना नाही
ह्याला फक्त झोडपणे ठाऊक
नी ओळखीचे असले तर फक्त लोकांच्या अंगावरचे शहारे
कशाचा तरी सूड उगवल्या सारख्या ह्या कोसळण्याचे पावसाशी सावत्र असावे नाते

हवेतला उत्साह नी जिवंतपणा शोषत आकाश कोसळत राहते
खिडकीबाहेरच्या अंधाराला अधोरेखित करत


डोळ्यावर sunglasses चढवून , हातपाय चेहऱ्यावर sunscreen lotion थापत ,
रुमालाने उन्हाला क्षणोक्षणी टिपत ,
हाताच्या बोटावर जाणारा प्रत्येक उन्हाळी दिवस मोजत ,
office मधल्या A .C . कॅबीन मध्ये बसून रखरखीत हवा भावनाशुन्य चेहऱ्याने निरखत असताना
काचेबाहेर एक रेष वरपासून ओघळत येते
काचेच्या आतूनच आपण ती धार पकडू पाहतो
वर कडाडलेल्या विजेचा झटका लागून, उन्हाने करपलेले अंगातले काहीतरी, अचानक जिवंत होते
नी बधीर झालेल्या कानांना संजीवनी मिळते, मोजता न येणाऱ्या अंतरावरच्या ढगांच्या आवाजाने .
एक तप करून देव प्रसन्न झाल्यावर जे feeling येईल तसे होते काहीतरी
आणि सुरु झालेली बरसात बघून सुखावलेले जग पाहून मीच माज करत म्हणते ,
"हा तोच" , ज्याच्यावर मी डोळे मिटून प्रेम केले.