Saturday, May 15, 2010
celebration
लाल केशरी होत सुर्याचं पाहता पाहता पश्चिमेत विरघळुन जाणं.......
मागंल्याच्या प्रसन्न गंधाने प्राजक्ताचं पहाटेला कोवळी हाक देणं....
उन्हानं आपला पिवळा पदर अलवार वसुंधरेवर ढाळणं.....
गच्च भरलेल्या नभानं सारा पाऊस ओतुन रितं होणं......
प्राक्तनच असल्याप्रमाणं पाचोळ्याचं वारयासोबत सुसाट धावत नाहीसं होणं....
उगवत्या दिवसासाठी पक्षांनी रोजच न चुकता गाणं म्हणणं.....
जमिनीला भेटण्य़ासाठी धबधब्याचं कड्यावरुन खोल उडी घेणं....
रोज़च्याच रुळलेल्या रस्त्यावरुन रात्रीचं रोज नव्या उत्साहानं य़ॆणं.....
चंद्रकोरीचं कधी सरणं कधी ऊरणं
आकाशाचं चांदणं अंगभर लपेटुन घेणं.......
सुरवात , मध्य , शेवट, उदय, अस्त, आनंद, दु:ख सारं काही आसुसून उपभोगणारया निसर्गाचं
वेदनाही साजरं करणं
फ़ुलणारय़ा फ़ुलासोबत काटयालाही त्याची टोचा़यची व्रुत्ती जगु देणं.......
सारं काही विनातक्रार स्विकारायची शैली जेव्हा शिकेन
तेव्हा निवडुंगाचे सौंदर्य शोधावं नाही लागणार......!
Saturday, May 8, 2010
ते दोघे पस्तिशीच्या घरातले, थोरली वयवर्ष ७ नी बिटकी ४ ची.....!
घर म्हणजे उपद्य़ापाचा कारखाना त्यांचं....!वडिलपणाची जिम्मेदारी त्याच्या एकट्य़ाकडे होती....रोज कडकडुन भांडण्य़ारया मुलींचे भांडण ती सोडवायला जायची नी मन लावुन त्यांच्याहुन मुल होउन तन्मयतेने भांडाय़ची....
त्यामुळे चुकून कधीतरी तिला आईपणा सुचला तरी मुली तिला फ़ार entertain करत नसत.तिला बिल्कुल खपत नसे ते! अतिशय गंभीरपणे जेव्हा थोरली बाबाच्या पाठीवर बसुन फ़िरताना ती तिच्या division मधल्या अनिकेत शी लग्न करणार असल्याचे सांगायची तेव्हा तिच चक्क जळफळाट व्हायचा...!मुली फ़क्त आपल्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करतात, timepass वगेरे, seriously घेतच नाहीत १ पैसा आपल्याला हे तिचे ठाम मत.....
संध्याकाळी मुलींबरोबर फ़िरणं, खेळणं , भांडणं सुरु असताना तो आला की मुली मुळीच तिला दाद द्यायच्या नाहीत....नाठाळ आहेत कारट्या असे नेहमी म्हणायची ती.....
एकदा कधीतरी बिटकी हिचं ऐकुन ऐकुन तिलाच बोलता बोलता नाठाळ म्हणाली.....तो हसत सुट्ला खोखो नी ही चाट.....
संस्कारच नाहीत कारट्य़ांवर असे म्हणता जिभ चावुन थांबली कारण काय सांगा...उद्या हे हि बिटकीनं उचललं तर......?
दोघिंची शाळा एकच....त्याच्या मस्तिखोरपणाच्या आठवड्य़ातुन "क्ष" तक्रारी य़ाय़च्या....नी ति कोणत्या तोंडाने बोलणार? तिच्या मस्तिखोरपणाच्या नी धांदरटपणाच्या गोष्टी आजीकडुन शेकडयांदा ऐकुन आता मुलीना तोंडपाठ झाल्या होत्या.....
तरी शाळेत जाउन खुपदा ऐकुन घेतले कि तिला तोल जायचा अधे मधे ..नी मग स्वत:चा हात दुखेपर्यंत माराय़ची......
रडून लाल नी एवढय़ाशा झालेल्या रडं आवरु पहात कोपरयात बसलेल्या मुली पाहुन मग तिलाच रडायला येई मग....kitchen मधे जाउन स्वत:ला डागण्य़ा द्यायच्या मग आततायीपणाबद्द्ल!
रात्री मुली त्याला बिलगुन झोपल्या कि तिला वाटायला लागे आईपणात पार नापास झालो आपण.....
मग त्याची उरलेली रात्र तिला समजावण्य़ात सराय़ची.....
कधीकधी त्याचा समंजसपणा तात्पुरता संपला की त्यांचीही व्हायची भांडणं..मग थोरली नं य़ेउन पोलिसाना बोलवायची धमकी दिली कि दोघं हसणं दाबत गप्प व्हायचे.....
त्याला त्याच्या कामासाठी जावं लागे बाहेर frequently ......पण कितीही busy असला तरी रोज रात्री जिथे असेल तिथुन दोघिना फोन करुन बोलत राही.....
बापलेकिचं बोलणं अखंड सुरु झाले की मधे़च तिला हुक्कि यायची कुजकटपणा करायची....माझ्या मुली आहेत........मी वाढवलय पोटात ९ महिने..., माझा फोन आहे.....मी बिल भरते...माझी परवानगी कोण घेणार.....?
त्याचं घरात नसणं ना तिला सहन होइ ना मुलीना....!आपण दुसरा बाबा आणूय़ा का असं तिनं म्हटल्यावर मुलीनी २ दिवस बोलणं तिच्याशी..पुन्हा असं बोलणार नाही अस, 50 times म्हटल्यावर त्या normal ला आल्या....
मग तो आला कि कोण त्याचा ताबा घेणार ह्यावरुन तिघींमधे चढाओढ लागे.....मुली शिरजोर होउ लागल्या की तो माझा नवरा आहे ,तुमचा बाबा व्ह्यायच्या आधीपासुन वगेरे सुरु करायची......असले दोघेही घरात तरी त्या दोघी, त्यांची आपापली कामं, ह्या गोंधळात एकमेकांच्या फ़ार वाटणीला येत नसत...
पण निदान आसपास आहोत असे feeling असायच.तो असाच tour वरुन परत आला कि त्याला बिलगुन ति नेहमी म्हणे......ह्या मुली पटकन मोठ्या का नाही होत...माझ्या नवरयाला पार घेउन टाकलय दोघीनी...! नि तो गंभीरपणे म्हणे..अगं..स्त्रिया म्हणे क्षणकाळाच्या पत्नी नी अनंतकाळच्या माता असतात....मग? हो क्का? असतील बुवा...पण मला हवा वाटला माझा अख्खा नवरा एकटिला अधेमधे तर त्यात काही चुक आहे असं नाही वाटत मला...मग तो गप्प व्हायचा बोलता बोलता.
serious व्हायचं timing कायमच चुकायचं तिचं.....
काळजी खरं तर त्याला सतत वाटत राही त्याच्या वेड्य़ा बायकोची ,मुलींपेक्षा जास्त.....!
असाच कुठेतरी tour वर गेला होता.......यायचा होता २ ३ दिवसात.....तिचा वाढदिवस होता.....त्यानं नी मुलीनी surprise plan केले होते......
तो यायचा होता वाढदिवसाच्या आदल्या रात्री.....१२ वाजता....
जीवाचा आटापिटा करुन, काम आटपुन कशीबशी त्यानं flight पकडली.....
तो दुसरया दिवशी य़ाय़चा म्हणुन त्याच्या, मुलींच्या आवडीचं जेवण करु ह्या विचारानं ती बाजारहाट करायला बाहेर पडली........
सगळं सामान घेउन येत असताना थोरलीनं रडत रडत फ़ोन केला बिट्की चावली म्हणुन.....तिची समजुत घालत फोनवर बोलण्य़ाच्या नादात तिनं रस्ता cross करायला घेतला.......
जाग आणली ती असह्य वेदनेने.......hospital च्या bed वर....
तिनं सहन करायचा खुप प्रयत्न केला तरी डॊळ्य़ातुन निसटलीच वेदना......
मग जरा भान आलं तसं बाजुला दिसल्या दोघि नी हातात फुलं घेउन मंद हसत तो......
happy bitrh day......असं म्हणत त्यानं तिला जवळ घेतलं...दुखलं तिला नी फार बरं ही वाटलं.......
मुली एक मिनिट तिथुन हलल्या नाहीत ते ३ दिवस.......
घरी आली ती ..तो घर सगळं सजवलेले.....happy birthday च्या पुढे be- attached केला होता......तिला जपत तिघानी लाड केले तिचे......
रात्री मुली झोपल्यावर पहिल्यांदाच उभे आडवं झापले तिला.....!
कोणी सांगितले होते फोनवर बोलत रस्ता cross करायला?नी मग अखंड तिला ओरडत राहिला....ती त्याच्या मिठीत जाउन रडत राहिली...
त्यांच्या आवाजानं मुली जाग्या झाल्या नी दोघाना रडताना बघुन थोरली हमसाहमशी रडाय़ला लागली...
खुप वेळ रडून झाल्यावर म्हणाली.. ok, तुला आण नवा बाबा हवा असला तर...पण जाणार नाहीस न आम्हाला टाकुन?
आता ह्यावर हसावं की रडावं ते दोघांनाही कळेना.......
पण आपल्या सारख्या वेड्या माणसावर आपला शहाणा नवरा नी शॊन्यासारख्या मुली वेड्यासारखं प्रेम करतात हे बघुन वेदनेतही सुखावली ती....!
नी पुढची १५ मिनिटं शहाण्य़ासारखी वागली....
बाकी सुरुच राहिल तिच्या वेड्य़ा family चं एकुण धडपडत एकमेकांबरोबर मोठं होणं....!
Monday, May 3, 2010
निरर्थकाचं लोणचं
सकाळी उठली ती....
काल ह्याच वेळची पहाट प्राजक्ताच्या फुलासारखी टवटवीत होती ....
मग आज विझु विझु पाहणाय़ा पणतीसारखी मलुल का सकाळ?
तिच्याच पोटात बहुतेक भावनांचे खोल डॊह असावेत.
बेतानं काहीच जमेना....
धो धो बरसणारय़ा पावसाच्या व्रुत्तीनं जन्माला आलेल्या तिला, थेंबथेंब, रिमझिम ह्या तरहा माहितच नव्हत्या.
बरं, त्या भावना दुसरयांचे देणं असायच्या।त्यांचा वर्षाव करायला कोणी मिळालं नाही की त्यांच्या भाराने वाकुन , दमुन जायची ती पार...
असा झगडा स्वत:बरोबर जन्मापासुनचा...
तिच्या अपुर्णत्वाची जाणिव इतकी तीव्र नी त्याबद्दलची खंत, खेद नी संतापही तेवढाच टोकाचा!
आनंदसुद्धा अंगाखांद्यावरुन निथळायचा तिच्या आणि दु:खसुद्धा अंधारात दिसु येईल इतकं तीव्र .......
रोजचा दिवस म्हंजे नवं struggle , मग अख्ख्य़ा आयुष्याचा वगेरे विचार करायला लागली की बिथरायचीच
आजुबाजुला दिसणारय़ा सगळ्या आधारांवर जाउन धडकायची मग , एक तर ते तुटेपर्यंत किंवा ती भानावर येईपर्यंत...
अशाच न आवरत्या येणारया mood मधे बाहेर पडली ती आज.
कोणतीच गोष्ट वेळेवर होत नव्हती, रीक्षा वेळेवर मिळेना, station ला गेली तर काहीतरी motormen चा strike होता नी सूर्य़ तापतोय वर बागडत..तिला जाम सुधरेना..
राग काढावा कोणावर ....?
१० १५ २० २५ मिनिटं गेली...train चा पत्त्ता नाही, सगळ्या गोष्टी कशा तिच्या मनाविरुद्धच होतायत ह्या बद्दल कुरकुरुन झालं .
बाजुच्या रुळावर काम करणारय़ाआ बाइचं रांगतं मुल कडकडीत तापलेल्या रुळावर उघड्य़ा अंगानं एकटंच मजेत खेळत हॊतं.
ह्या क्षणापुरतं ते तिला शहाणं करुन गेलं....
अशाच क्षणानी, अनुभवानी, माणसांकडनं आपल्याला मोठं व्हायला लागणार,कारण डॊळ्य़ात अंजन घालायला कोणितरी लागणारच आपल्याला सदा ह्या कल्पनेने नि:श्वास सोडत ती गाडीत चढली.......
Saturday, May 1, 2010
आणि वाटलं नाहीतरी संपादकाच्या मताशी तो सहमत असतोच असं नाही , तसच बोधकथांमधुन बोध इतरानी घ्य़ाय़चा असल्याने ते काम त्याच्यांवर सोडुन देता येते..
शिवाय बोधकथा लिहिण्यासाठी जितका स्वत:ला न कळलेला विषय घ्यावा तितके उत्तम...इतका scope असल्यावर प्रेमासारखा अगम्य आणि अख्ख्या जगाने चावून , रवंथ करुनही न संपलेला विषयच हाती घ्य़ायचा ठरवलं.
फक्त एक बदल आहे...बोधकथांचं सोपे असते काय बोध घ्यायचा ते निश्चित कळते, ह्या प्रकारात ते लिहिणाय़ाच माहित नसल्याने त्याला दुर्बोधकथा हे नाव जास्त समर्पक वाटतं....!
दुर्बोधकथा -१
...आणि त्यांचे भांडण झाले.
दिवसातलं फोनवरचं ८ वं आणि प्रत्यक्षातलं ३ रं.
मुसमुसत ती बेडरूममधे गेली .bag भरुन धाडकन दरवाजा आपटुन तडक बाहेर पडली.
तो ही तिला जाताना पाहत राहिला
साडे पाच तास पुर्ण अबोला , msg नाही काही नाही, निरव शांतता!
"बरयाच दिवसानी कळतय शांतता क्या चीज हे , नाहीतर हल्ली विसरायलाच झालं हॊतं", असं स्वत:शीच काहीबाही बडबडला....
बेल वाजली. दार उघडलं.
तो धाडकन आत शिरला.
एका हातात bag आणि दुसरया हातात तिला घेउन बाहेर पडला.
चालता चालता १२ व्य़ा मिनीटाला तिला खेकसुन म्हणाला, "तुझ्यासारखं कोणालाच भांडता येत नाही.."
दुर्बोधकथा -२
येता येता तिनं दोघांसाठी ice cream चे कप आणले २.
तिला खर तर पटकन अधाशासारखं खाउन टाकायच असतं ice cream
धीरमुळी निघत नाही
पण तो यायचाच होता अनायसे थोड्याच वेळात. दोघानी खाय़ला मजा येइल आणखी, म्हणुन ठेवलन fridge मधे.
जरा काहीतरी आणाय़ला बाहेर पडली
धापा टाकत तो मित्राबरोबर आला.
च्यायला, काय उकडतय म्हणुन गार पाणी ढोसायला त्याने fridge उघडला
आतमधे ice cream पाहुन कायच्या काय गार वाटले त्याला.
एक कप मित्राला दिला, उरलेला उडवून टाकावा असं जाम वाटलं त्याला...
ती आली .आल्या आल्या जाउन आधी fridge उघडला.
आत एकटाच ice cream चा कप पाहुन खट्टु झाली
फुरंगटुन आत गेली.
मागुन तो आत आला.चमच्याने ice cream तिला भरवत म्हणाला, च्यायला, किती वाटलं खाऊय़ा म्हणुन, पण ठेउन दिलं तुझ्यासाठी...
दोघानी एक कप पुरवून खाल्ला खुप वेळ... ice cream च छान असणार म्हणा ते.
दुर्बोधकथा ३
लग्न कसं करायच ह्याबद्दल तिच्या काही कल्पना होत्या.
लग्न कसं करायचं ह्याबद्दल त्याच्या तशा काही कल्पना नव्ह्त्या, त्यात काय विशेष असतं करण्य़ासारखं? हिच असली तर एक कल्पना होती.
त्यानी लग्न कसं करावं ह्याबद्दल दोघांच्या घरच्यांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या बरयाच कल्पना होत्या.
एक तर मुळात लग्न आणि ते ही एकमेकांशीच , ह्या conclusion ला यायला त्यानी बराच वेळ घेतला होता तर नेमकं लग्न कसं करायचं ह्या मुद्द्यावर काही ताळमॆळ जमेना,,,,
साधं कस करावे लग्न हेच ठरत नाही तर कसे झेपणार नंतर असा प्रश्न दॊघाना पडला...
रात्रभर लोक ह्या बद्दल चर्चा करत बसले होते.
सकाळी office ला जाता जाता एका देवळात त्यानी लग्न करायचं ठरवलं. bike देवळाबाहेर लावून त्यानी फ़ोनाफ़ोनी केली , त्या दिवशी त्या रस्यावरच्या traffic jam कारण वेगळच होतं...
तुम्हाला नातवंडाना सांगायला आम्ही already एक गोष्ट दिली की आम्ही..., कसं react व्हावे ते न कळलेल्या रुसलेल्या आईबाबांची समजुत काढण्य़ात लग्नाचा पहिला दिवस सुखात संपला......
दुर्बोधकथा ४
"उद्या सकाळि लवकर उठुन national park ला जाउयात फ़िरायला"?शुक्रवारी रात्रि ११ साडॆ ११ च्या मानाने तिला सुचलं
खरंतर deadlines शी लढता लढता शुक्रवारी पार मेटाकुटिला आला होता, त्यात उद्या सकाळी लवकर उठायच्या कल्पनेने झोपायची मजा संपलीच!
पण तिचा उत्साह उतु जाणारा चेहरा पाहुन त्याला नाही म्हणवेना....
"जाउयात बरं का, असं उसन्या उत्साहाने म्हणता म्हणता झोपलाच तो...
त्याच्या दमलेल्या चेहरयाकडे बघुन मग उगाच हट्ट केला असं तिला वाटलं
त्याला किंचीत थोपटुन . त्याने mobile मधे सेट केलेला ६ चा अलार्म तिनं बंद केला.
मधेच कधीतरी पाणी प्यायला म्हणुन तो उठला, किती वाजले ते बघावं म्हणून cell पाहिला तर अलार्म बंद केलेला होता.
शांत झोपलेल्या तिला जवळ घेउन मग तोही झोपला परत.
"national park मधे सकाळी आले कि काय मस्त जातो दिवस" कुठ्ल्यातरी झाडाच्या पानांशी खेळणाय़ा तिचा फोटॊ काढता काढता तो म्हणाला.
Monday, March 29, 2010
ऊन की बात...
D vitamin कमी आहे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसत जा असा सल्ला जाता जाता doctor ने दिला .
इथे च्यायला रिकामा वेळ कोणाला आहे म्हणून मी तो येता येता त्याच्याच clinic च्या dustbin मधे टाकला.
रात्री नवरयाला गमतीत doctor च्या सल्ल्याबद्द्ल सांगायला गेले तर तो भलताच गंभीर झाला.
तुला सागंतो , दुर्लक्श करु नकोस ,परवा office मधला जोश्या असाच हसता हसता गेला.
नवरे company ला अतिशय absurd काहीतरी बरळायची सवय असते हे ठाउक असूनही घास घशात अडकला.
आणि सर्वानुमते मी ऊन खाण्याचा ठराव पास झाला.....
उठल्यापासुन सगळ्य़ाचं ऊन्हाच्या कोवळेपणावर च्रर्चासत्र सुरु झाले
"नक्कि जा बर का उन्हात" , नवरयाने कामाला जाताना अर्ध्या जिन्यातुन ओरडुन सांगितले.
आणि शेवटी कंटाळुन मी एकदाची कुरकुरत गच्चीत गेले...
गपगुमान मिंटे मोजत खूर्चीत शहाण्यासारखी बसले
जरा डोळा लागला तो कोवळे ऊन समोर येउन हसले...
मी म्हटलं..आलास बाबा..., तुझीच वाट पहात होते
जरा बाजुला आलं नी म्हणालं...
तुझ घर कोणी ऊन्हात बांधलं?
[मी म्हटलं]
हे आवडलं मला, तुझं स्वत:ला ओळखुन असणं...
असले कसले तुझं दिवसचे दिवस दुनियेला भाजणं?
बाकी तुला गरम होत नाही, घाम येत नाही?
कधी एकदा पाउस येतोय असं हॊत नाही?.......
उगाच अवखळ लहान मुलानी चेहरा गंभीर करुन बोलावे तसे एक pause घॆऊन म्हणालं,
comfortable असते गं आपण जसे आहोत तसं असणं..
आधी मला उगाच वाटाय़चं...'पाऊस' असतो तर किती बरं झालं असतं?
सगळॆ जण आपली वाट पहातायत हे feeling किती मस्त
doctors पासुन कवींपर्यंत सगळ्य़ानाच तो लागतॊ
सगळ्यांच्या लाडाचा वर्षाव त्याच्यावर होतो
नी तसं बघायला गेले तर "थंडी"असणंही माझ्य़ापेक्षा बरंच
असं वाटुन वाटुन, तुला सांगतो,मधे मला frustration आलं.., खरंच...!
सारखं वाटायचं....आपल्यालाच काय lifetime negative role play करायला दिला
माझ्या निराश असल्याचा निरोप counsellor ला गेला
तुला सांगतो लक्ष कामातुन इतकं उडलं हॊतं.....
मॆ महिन्याचे उन सुद्धा जरा अशक्त झाल्यासारख. झालं हॊतं...
D vitamin कमी झाले असणार...कोवळ्य़ा उन्हात बस....मी तारे तोडले....
माझ्या p.j. ने गंभीर वातावरण जरा light झाले....
मग पुढे काय?
पुढे काय...?हं...त्या counsellor बरोबर sessions वर sessions झाली...
दिलेला role पार पाडाय़ला option नाही..तर मग तो enjoy च का करु नये हे जुने शहाणपण परत आले....
अच्छा..,हं.....,तरीच माझ्या नवरयाला कधी नव्हे ते घामोळे झाले......
तुला एक भविष्य सांगु का?
तु असेच विनोद करत राहिलीस तर लवकरच तुझा divorce होइल......
१ दा २ दा ठीक ए ..रोज कोण इतके पुचाट joke सहन करील?[ च्यायला हे उन माझ्याइतकच आगाउ आहे]
आता काही नाही...अब सब o.k., back to normal
आता नाही मनात उरलेला कसलाही सल......
नाहीतरी तुम्ही माणसं..बोल लावताच थंडीपावसाला सुद्धा
त्यामुळे तुमच्या लाडाच. होणं हा आता अगदीच गौण मुद्दा
पाउस सुद्धा मला मस्का मारायला येतो ..य़ंदा जरा जास्त तापव बघ लोकाना....
त्यानी माझी आठवण काढुन उचकी लागावी मला...
ज्याचे त्याचे आपापले egos नी आपापले लाड
असो, आता माझी shift संपत आली, तु गुमान खाली जाउन केर काढ
जाता जाता म्हणालं..बाकी सांगू नकॊस कुणाला आपल्या बोलण्याबद्द्ल
नी डॊळ्य़ांसाठी रोज एक गाजर ह्यापुढे खात चल...
चहा घेणार का विचारेन तोवर मेलं इतकं गरम व्हायला लागलं.....
लगोलग खाली उतरुन आधी थंडगार पाणी ढॊसलं..
रात्री नवरय़ाला उत्साहाने माझ्या उन्हाच्या ग्प्पांबद्दल सांगायला लागले
उन लागलं असणार तुला असं म्हणुन त्याने मला as usual गुंडाळुन टाकले
मग म्हणाला, यंदा उन जरा जास्तच ए नाही, केव्हा एकदा पाउस येतोय असं झालय..
मी जोरात उन्हाची बाजु घेत म्हटल...काही नाही जास्त... मला doctor नी कोवळं ऊन खायला सांगितलय....Friday, November 27, 2009
त्या दोघी आणि तो ......
एकमेकांचे खुप मस्त मित्र.
तिघेही खुप वेगवेगळ्य़ा प्रकारे चक्रम.
मत वेगळी ,विचार वेगळॆ, पण कुथेतरी जगण्य़ाकडॆ बघाय़चा द्रुश्टीकॊन सारखा
हम करेसो कायदा वाला,
झुकती हे दुनिय़ा , झुकानेवाला & झुकानेवाली चाहिये ह्या मताचे तिघॆही.
पाऊस,भेळ नी पुस्तकांवर प्रचंड प्रेम नी नैतिकता, लोकशाही , धर्म , लग्नसंस्था ह्याबद्दल खुप टोकाची मतं.
आधी खरं तर स्वाती नी अरिंजय़चीच ओळख होती, पण स्वातीला मीरा खुप आवडायची, त्या फ़ार जवळच्या मैत्रिणी .नी तितकाच अरिंजय आवडायला लागल्यावर , दोघांना वेळ देण्यात आपण कमी पडु नये म्हणून तिने सरळ त्या दोघांची गाठ घालुन दिली.
नी मग त्या दोघांचे ते तिघे झाले.
ही unfortuntely but inevitably एक lovestory आहे नी अर्थात ३ लोक आहेत म्हंजे triangle आलाच. हे स्वाभाविकच आहे,मग इतक्या predictable गॊष्टीबद्दल काय लिहायचे?
पण कसं असते एकसारख्याच. जुळ्या नी कॊणताही वेगळ्या pattern न try केलेल्या हजारो lovestories असतात, पण ज्यांच्या असतील त्याना त्या special च वाटत असणं, साहजिकच आहे न?
so love triangle आहेच पण थोडा हटके आहे.....[असं निदान मी तरी नकॊ का म्हणाय़ला?]
तर coming back to the story.....
"एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हॊ सकते " हे वाक्य खो खो हसत तिघानीही निकालात काढलं होते .
प्रेमाबद्दलही उजेड पाडायचे त्यांचे दिवे वेगवेगळे होते नी विचार ही
त्यामुळॆ मुलीना कसे पटवायचे ह्याच्या टिप्स अरींजय़ स्वातीकडून घ्यायचा, कॊणत्या मुली interesting असु शकतील हे मीरा सांगायची...
मुलांबद्दल काहीही सल्ला द्यायच्या बाबतीत तो कुचकामी आहे असे दोघींचेही ठाम मत असल्याने त्याला ह्याबाबतीत खुप scope नव्हता.
असो...
तर असे हे तीन लोक...पैकी स्वाती मानसोपचारतज्ञ होती.....ह्याम्ध्ये नक्की काहीतरी घॊटाळा आहे असे मीरा चे ठाम मत.अरींजय काहीतरी rural development related NGO साठी काम करायचा......त्यामुळॆ तो दिवसच्या दिवस बाहेर असायचा.नी मीरा basically जगावर ताशेरे ओधण्य़ात वेळ घालवायची..आणि बाकी pottery पासुन poetry पर्यन्त ज्या गोष्टीचा झटका येइल ते करायची नी स्वाती , अरींजय त्यावरुन तिची मस्करी!
असे ते तिघे आपापली कामे, छंद, नी आयुश्यात busy होते....
वय? तिघेही समवयस्क होते..नी तरूणही...[नाही..म्ह्न्जे lovestory तरुणांची़च असते असे नाही....पण this one happened to be]
आता बरेच दिवस अरिंजय कुठेतरी camp साठी गेला होता....
" कधी उपटणारेत राजे आता "? coffee पिता पिता स्वाती म्हणाली
काही बोलणं नाही गं झालेले अशात.....बरेच दिवस बेपत्त्ता आहे नं पण ह्या वेळी.-मीरा
बघ न....आता आला की म्हणु...हो बाबा..ह्या वेळेला केले तुला आम्ही miss...स्वाती
म्ह्नजे ...? खोटे बोलायचे म्हणतेस ...?-मीरा
हॊ,.त्याच्या ही मनाचा विचार केला पाहिजे अध्येमधे, बरं , निघतेय मी आता.....परवाचं नाटकाचं नक्की आहे नं?
होय गं.भेटूय़ात परवा....तिथुनच जेवायला जाउयात.
o.k.done then!c u .....
ह्ळू जा गं...पाऊस केवढा लागलाय!
स्वाती गेल्यावर मीरा तिच्या सध्याच्या आवडीनुसार मातीच्या वस्तु बनवण्यात मग्न झाली.....तिच्या आवडता पाऊस...आवडती गाणी........
"पाऊस , बेगम अख्तर नी coffee...? looks like निदान आज एखादे मातीचॆ वाडगं तरी जमुनच जाइल", दरवाज्यात भिजजेला अरिंजय उभा होता...
मीराला त्याला बघुन कायच्या काय हर्शवायु झाला...डोळ्य़ांवर आलेले केस मागे सारत ती उथली
अरिंजय़ आत आला,.
.."स्वाती कुठाय? य़ॆता येता तिच्या clinic ल जाउन आलो.काही पत्ता नाही...वाटलं इथे असेल ..इथेही नाही?
अरे ती आता Canada ला असते, परवाच मुलगी झाली तिला.....-मीरा
झाले तुझे टुकार विनोद? coffee कर छानपैकी...नी दार असे उघडे टाकुन काय बसतेस?दरवाजा बंद करत अरिंजय सोफ्यावर जाउन बसला..
मीरा आत kitchen मध्ये इजाजत मधले गाणं गुणगुणत coffee करत होती, मघाशी डोळ्य़ावर आलेले केस मागे सारताना नाकाच्या शेंड्य़ाला माती लागली हॊती...खुप दिवसांनी बय़ा चक्क साडीत होती.तिच्या एकुणच लगबगीची गंम्मत वाटून तॊ आत गेला...
coffee घेउन ती वळली....तिच्या मागेच तो उभा होता....त्याने coffee चा मग ओट्यावर ठेवला .हाताने तिच्या नाकावरची माती पुसली, मग
त्य़ाला तिच्या गालावरच्या खळिला चिड्वावसं वाटलं.
तिला काही कळेना......
तिचा गोंधळ बघुन त्याला आणखीन मजा वाटली
n then it had to happen........
they made love.
तिला अजुनही नक्की काय ते उमगले नव्ह्तेच....त्याला आपल्या घरात, आपल्या रजईत , आपलया बाजुला असे तिने कधीच imagine केले नव्ह्ते
म्हंजे जे झाले ते तिला आवड्ले नव्हते असे नाही
पण आपले एकंमॆकांवर प्रेम नसताना आपण हे का केले .असा प्रश्न तिला पडला...
त्याला ही काही सुचत नव्ह्तच.
coffee गार झाली असेल नं? तों म्हणाला
आता मीराला डॊके कुठे आपटु असे झाले
झालीच असेल, नाही का हे घडेपर्यत ?
त्याला otherwise खुप हसायला आले असते पण आत्ता मीरेला जोरदार guilt नि संतापाचा झटका येणारे हे लक्शात येउन तो sorry म्हणाला..
so u are sorry about whatever happend?
झालं, आता मीरेचे रुपांतर typical बयेत झाले.
आता मुद्देसुद वाद किंवा चर्चा व्हायची शक्यता मावळली.
नी जवळ घेऊन समजवण्याचा तर काहीच chance न्व्हता. एरवी एक मित्र म्हणुन तो हे सहज करू शकला असता..पण आता हे झाल्यावर?
ती नक्की कशी react होणारे ह्याचा अंदाज त्याला येत नव्ह्ता.....
ती उठुन बाहेर गेली....
थोड्या वेळाने तो ही बाहेर आला.
दोघे ही अंधारात शब्द शोधत बसले
मग त्याने दिवा लावला, तिच्या चेहय़ावरची आठी पुरता उजेड व्ह्यायच्या आत त्याला दिसली.
o.k. I am really sorry...not sorry for whatver happened between us.Let me tell you, it was absolutely unintentional.I got carried away.I am sorry if I have hurt you.
ती ऐकत होती......
बोल गं काहीतरी?
नाही...मी विचार करतेय.....
thank god, it might not be that bad .... अरिंजय[ मनातल्या मनात]
ह्या पुढे आपण कसे वागायचय एकमेकांशी ?- मीरा
god....are you saying that our friendship is over......mira?
dont do that
I know whatever happened wasnt right.
but then if u think of calling off the frienship, that's really unfair.
मला सांग, तुझे प्रेम आहे का माझ्यावर?
n dont worry, I m not trying to put pressure.
नाही..असं खरेच नाही सांगता येणार...मला तु आवड्तेस आणि तुला ही मी आवडतॊ.
well, आवडते तर आपल्या दोघाना स्वातीपण
आता ती कुठे आली मधे?
तु तिलाच शोधत आला होतास.
come on, I m telling you, whatever happened between us was absolutely unintentional. I fell for the moment.
तेच तर , म्हंजे माझ्या जागी स्वाती असती तरी हेच घड्लं, असतं?
असं कसं सांगू मी?मला ख्ररचं नाही माहीत गं...i m trying to be honest. ह्या आधी काय आपण कधी ऎकटॆ राहिलो नाहियोत का?
दुसरी कॊणी च का तुझ्याबरोबर ही मी असाच वागलो असतॊ असं नाही.it just happened
मग आपण आता काय़ करायच.?
we can think of a relationship........
का? हे घडले म्हणुन?ह्या आधी relationship चा विचार आला होता का मनात?just because we slept with each other, now should we think about a possible relationship?
were you attracted to me before, did u think of sleeping with me before? or would you want that to happen again?
हो, पण तसं atraction मला खुप जणांबद्दल वाटतं but then its just a casual thing and I am not a sex maniac, you know that! given a chance ,ही ऎक गोष्ट मला पुसुन टाकायला आवडेल....
मीराने त्याच्याकडॆ रोखून पाहिले, तिला त्याचा खरेपणा कळत हॊता.
एक श्वास सोडुन ती म्हणाली........
एवढी मैत्री मैत्री म्हणतॊ आपण......पण हे आलच न शेवटि मधे?मला आवड्तॊस तु...नी जे झाले त्याबद्द्ल माझ्या मनात राग ही नाहीय़ॆ ,पण
म्हणून relationship चा विचार करण मला पटत नाही.we had a moment, now its over, right?
आत्ता मी logically विचार करतेय...पण थोड्य़ा वेळाने कदाचित मी ह्या विचाराच्या मोहात पडेन.म्हणुन आत्ताच बोलुन घॆतेय...lets just try n forget this.
नेहमीची बालिश मीरा आत्ता त्याला खुप प्रगल्भ वाटली...त्याच्या ही पेक्शा समंजस नी खरी...n that was the moment for him not the earlier one.
I dont know how to put this into words, but let me atleast try once....whatever happned a few minutes back, was merely because of temptation. n though it was just physical it would have not happened with any random girl.
जे घडुन गेल्यावर जाणवलेली पहिली भावना म्ह्न्जे भिती...माझ्या guilt conscienceमुळॆ आता मी एक relationship स्वत:वर नी तुझ्यावरही लाद्णार ह्याची भिती!
पण तु किती शांतपणॆ विचार केलास....! मला माझ्या अपराधिपणाच्या भावनेतुन मोकळं केलस...आता एक विचारु? will you be mine?
उलटा खरा प्रवास माझा,पण ती विशेष जाणिव व्हायला एक क्शण पुरतो.....नी मला माझा तो क्शण मिळालाय......
please think about it, I am not really that bad......
मीराच्या डॊळ्य़ातुन एक वाद्ळ पार होताना त्याला दिसले...नी मग एक सुंदर हसु...
coffee प्यायची राहिली नं मगाशी?
मीरा coffee चे मग्स घेउन बाहेर आली..तेवध्यात स्वाती ही आली...मला ?अरिंजय़ कडॆ बघुन म्हणाली.....तु येउन गेलास न clinic la....? मला राजेबाई म्हणाल्या
हिला आजच म्हणत होते मी की ह्या वेळॆला तुला miss केले आम्ही.....
मीरा नं तिची coffee स्वातीला दिली.....
o.k....here is the announcement.....
गेले खुप दिवस मला असे वाटतय की I have some special feelings about you ,अरिंजय़! सागांय़च होते कधीपासुन ...फ़क्त एका छान दिवसाची वाट पहात होते..आज तु आलायस,मीरा आहे, coffee, पाउसपण आहे,...मी भॆळ आणलीय़......It cant ge better than this....
हो न मीरा?
स्वातीच्या हातुन मग घेताना मीरा कडुन तॊ फूट्ला......तुकडॆ गॊळा करताना मीरा म्हणाली.....काच फुटणॆ चांगले असते असे म्हणतात, न?
तेव्हापासुन"एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हॊ सकते हे वाक्य ऎकले तरी ते त्याची टर उडवत नाहीत.
after all hindi films does make sense sometimes!
अस्मि
Friday, November 20, 2009
साश्टाग नमस्कार.
कारण,तुला वय नाहीच नी मला अनेकदा लोळण घ्यायला लावत असल्याकारणाने नमस्कार ओघाने आलाच. म्हणुन हा मायना.
तु माझा एक भाग आहेस असे ऐकुन आहे बरेच दिवस, मला तुझ्या वागणुकीवरुन आपण एकाच माणसासाटी कांम करतो , असे वाटत नाही.
असो, मुद्दा हा आहे कि तुला काय हवय हे माहित्ये का तुला?
नाही...... हा अगदी genuine प्रश्न आहे.
कसे आहे. मेन्दु तुझ्या तन्त्राने वाट्टॆल तसे वागुन वर त्याचे उत्तम समर्थन करतो.
माझे कसे साधे सोपे आहे.....मी कामगार वर्गातला असल्याने इमानेएतबारे जगण्याचे काम करत आलोय, तुझ्यानुसार फ़ारच निर्बुद्ध असे काम आहे ते....घालुन दिलेले नियम पाळण्य़ाचे., आहे खरे...पणं कसे आहे ते मी गेली अनेक वर्शे नीट करत आलोय [तुझ्या अनेक अडथ्ळ्याची शर्यत ओलन्डुन..]म्हणुन तुझे हे सगळे पिसारे, धुमारे वगेरे लाड सुरू आहेत.एक वेळ तु strike वर जाउ शकतोस....पण मी नाही.....
नाही, मी मुद्द्याचे बोलायला लागलो की पळून जायची तुझी सवय आहे, पण तुला तुझ्यापासुन लपायला जागा नाही हे ही तितकच खरे.
प्र्श्न तु महत्त्वाचा की मी हा नाहिचे....आपण एकाच माणसासाथि काम करत असल्याने आपल्यात co ordination असणॆ आवशयक आहे.
नी वडिलकी च्या नात्याने मी तुला दम भरु इच्च्चितो....तुझे चाललय काय...?
किती तो लहरीपणा?
कसॆ आहे....माझ्यात जर काही बिघाड झाला तर तो बाह्य उपचारानी बरा करता येतो.. तरी वर doctor ऐकवणारच...मन प्रसन्न थेवा...
तुझी काळजी घ्यायची जबाबदारी तुझी आहे.....तु तुझे काम कर....मी माझे करु दे....
कारण तुझा लहरीपणा साम्भाळण्यात माझी अर्धी शक्ति खर्च होते. आता मी काय काय करायचे सांग ?
कधीतरी मोटॆ व्हावच लागणारे बाबा तुला....वेळेवर कळ्ले तुला तर मला सोपे जाइल जरा...नी माझ्या कांमाकडॆ लक्श देता येइल.
खुप दिवस साभांळलं तूला ..
आता बघ तुझे तुच...जरा अपमान, नकार पचवायला शिक...दुसरयाचा विचार करायला शिक..समतोल रहायला शिक.....
खुप मजा नी माज केला आहेस माझ्या जीवावर,थिके ..हरकत नाही...पण आता तु जरा स्थिर हो बाबा.धावुन धावुन दमायला मला होते कारण.
बघ..प्रयत्न कर.
तुला आवड्त नसले फ़ारसे..तरीही...
तूझंच...
शरीर।
asmi