Wednesday, September 22, 2010

रात्र

रिकाम्या रस्त्यांवर, रात्री अडीच ला bike कडेला लावुन भंकस करायला किती मजा येते

रात्रीला भारुन टाकलेल्या पिवळ्य़ा प्रकाशाला company असते एखाद्या टपरीवरच्या रेडिओची.

अशा किंचीत थंड वेळी उकळणारया चहाच्या वाफ़ा ...

आणि अखंड बडबड



आडगावच्या एखाद्या station वर शेवट्ची train चुकली म्हणून आपल्यासोबत थांबलेली रात्र

नी सकाळी घेतलेल्या times of india चं अंथरुण पांघरुण

मधेच झोप उड्वुन जाणारी एखादी तुफ़ान मेल

आणि शांतता


lights गेल्यावरही पुर्ण अंधार न होणाय़ा शहरातल्या रात्री नी अंधार दिसावा म्हणून

कंदिल लावाव्य लागणाय़ा गावातल्या रात्री

अशाच एका प्रचंड काळोख्य़ा गावातुन चालताना काजव्यानी पेटलेलं झाड डोळ्याच्या कोपरयात कुठेतरी राहुन गेलय़

कधीतरी रात्रभर शहरातली वीज गेलेली निघुन नी नजरचुकीनं जाणवलेलं आभाळ

आणि चंद्र



पावसाचं नी रात्रीचं affair सुरु असतंच ब्रेक अप न होता

भले भांडणं कीती ही होवोत

कधी रात्रीला हलके हलके बिलगणारा पाउस तर कधी तिला चिडवणारा

भांडण होऊन निघुन गेलेल्या पावसाची वाट बघत ताटकळत असलेली रात्र

आणि तिच्यात मुरत जाणारा पावसाचा गंध



रात्रीची भितीबरोबरची link तशी बरीच जुनी

पण रात्र मला दिवसापेक्षा जास्त passionate नी spontaneous वाटते

नी जरा किंचीत वेडीच

म्हणजे दिवस वाटतो एखाद्या responsible माणसासारखा सतत कामात बुडलेला

त्याचं सगळं कामाचं गणित बिनसवुन टाकणारी रात्र

नी हसते वर त्याच्याकडे बघुन , बघता बघता लपेटून घेते जगाला

आणि हळूच दिवसाला म्हणते good night


Thursday, September 2, 2010

दोघे बसले होते एका cafe मधे नेहमीच्याच...
तिला जायचं होतं परत..............
तो थांबवत पण नव्हता.
मग आता ही coffee संपली की जाउच असं ठरवलन तिनं
उद्या च्या meetings, deadlines ,traffic , सुट्टे पैसे असं सगळं डोळ्य़ापुढून तरळुन गेलं.
सिंहगडावर जाउयात?- तो
सगळ्य़ा meetings, deadlines ,traffic , सुट्टे पैसे एका मिंटात गायब......
आत्ता?- ती
हो.....bore झालय गावात, पण तुला जायचय ना परत? तो तिच्या bag कडे पाहत म्हणाला......
आता काय? राहुदेत पण य़ायचय मला असं म्हटलं तर फ़ार desparate वाटेल का?[ती ..मनातल्या मनात]
ती गपचुप coffee ढवळत राहिली.....
ऊद्याच जा गं आता, मला कंटाळा आलाय तुला station ला drop करायचा......तो
oh, म्हंजे कंटाळा आलाय म्हणून थांब म्हणतोय़ हा......मी थांबावं म्हणुन नाही.....[ती.....मनातल्या मनात]

परत एक मोठ्ठा pause.......
आज रविवार ए पण .....गर्दी असेल वाईट गडावर.....तो
हो, ते ही आहेच म्हणा.......ती
meanwhile coffee चा ३ रा round झाला.....
इतकंपण ठरवता नाही येत? मी असते मुलगा तर सरळ ऊचलुन घेउन गेले असते.......च्यायला हे काय यार.....
मधल्या मधे मी train मात्र सोडली....
आता अजुन तासभर रेंगाळु इथेच,आणखीन ४ कप coffee पिउ, मग संपलाच आजचा दिवस....
आणखीन एक दिवस.....
एवढ्या दिवसांच्या इतक्या coffees मधे week end home झालं असतं कर्जत ला वगेरे......
कर्जत ला पावसाळ्य़ात मस्त असतं
loadshading वगेरे असणार म्हणा तिथे ९ ९ तास.........[ती.....मनातल्या मनात]


तेवढ्यात ......
एका मुलीची entry
hi , कसायस रे? कित्ती दिवसानी...no....? cool...मी add करते तुला FB वर....keep in touch....
झालं , आधीच इतक्या मैत्रिणि आहेत ह्याच्या
मी असते मुंबईत.......
looks really difficult....
ती मुलगी बरी होती आणि तशी दिसायला.......
coffee पिउन काय होणार नुसतं?.........[ती.....मनातल्या मनात]


ती उठलीच मधेच एकदम....जातेच ..उद्या खुप कामंपण आहेत.....तु नको drop करायला......कंटाळा आलाय नं तुला......
मी जाईन रिक्षा घेउन....
अगंपण ९ ३० झाले आता...ऊद्या जा की.....तो

मी बघेन रे काय ते, तुला सांगतेय का सोड म्हणुन?ती

मग दोघं आले bus stand पाशी ,त्यानं तिकीट आणुन दिलं
ती घुश्श्य़ातच bus मधे बसली , त्याच्याकडे न बघता , न बोलता......
बस रिकामीच होती तशी.....
तो ही काही बोलला नाही,
तोंडावर ओढणी गुंडाळुन बसली
बस सुरु झाली नी तिचा बांध फुटलाच.....
.
कधी कळणार ह्याला.....
नाहीच कळणार कधी.....?
इतके दिवस झाले..., मीच मुर्ख आहे. गाढव ,बेअक्कल........
जीव गेला ना माझा ह्याच्या प्रेमात की मग ह्याला अक्कल येइल.....

स्वत:शी बरळत , हुंदके देत झोपलीच ती चक्क लोणावळा य़ेइस्तोवर.....
बाहेर पडली.....हलका हलका पाउस होता......
आणि ती चक्क रडुन रडुन दमली होती......
आणि तिच्या मनाविरुद्ध काही झालं की तिला भुक लागते फ़ार.....

पण आज नको म्हणत ती गाडीकडे जायला वळली तर गाडी गायब
अक्खिच्या अख्खी VOLVO गायब?
गाडीत bag , wallet , कपडे, mobile , pan card, ATM अशा अनेक धक्क्यांच्या जाणिवा व्हायला लागल्या .
आता हे जरा जडच झालं एकुण आपल्या पेलण्य़ाच्या ऐपतीपेक्षा , नइ?
काही सुचेना ..म्हणून मग ती जरा जरा हलक्या पावसात चालायला लागली.....
लोणावळा पण मस्तच असतं तसं कडकडुन दु:ख वगेरे झालेलं असताना......तनहाई वगेरे गायला......
ती एकटीच वेड्य़ासारखी चालत सुटलेली रात्री १२ ला वगेरे
मागुन आवाज आला..."म्हणून किमान wallet नी cell घेउन उतरावं गाडितुन की,वाटलं खावं choco walnut fudge तर फ़जिती होत नाही अशी......"
दोघं fudge वगेरे खात निघाले रस्त्यावरुन ......
तो काहीही न बोलता चालत होता आणि ती त्याच्य़ाकडे पहात........



Thursday, August 26, 2010

waiting room

WAITING ROOM

ती.......
तुला तसा कपडे काय असावेत ह्याचा sense नाहिच, पण fortunately तु कधी उलटा नाही घातलेलास shirt किंवा बटणं वरखाली वगेरे......
मला खुप आवडलं असतं तुझ्यासाठी shopping करायला.
पण आपल्यात तसं काही नाहीच......

काहीही assume करायचं नाही आणि काही आलं मनात तर लपवुनही नाही ठेवायचं हे आपलं ठरुन गेलय , पण तरीही उरतचं काही माझं माझ्यापाशी....
तुझ्यापाशीही उरत असेल का काही ?
तसे विशेष प्रश्न नाही पडत पण आपल्याला एकमेकांबद्दल, एकमेकांच्या past बद्दल किंवा future बद्दल ही.......
रस्ते कधीही बदलु शकतायत ना आपले, पण तोवरचा प्रवास मस्त असणारे आपला.....
काहीच "पण" नाहीत असं नाहीच, पण आपण कदाचित आपापल्या मुक्कामाला नेणाय़ा गाड्य़ा येईपर्यंत एका "waiting room" मध्ये असु बहुतेक.
माझ्याकडे तुझ्या train चे तिकिट नाही नी तुझ्याकडे माझ्या.तोवर मात्र तुझ्यासोबत "waiting room " खुप छान वाटतेय.




तो
मला complications आवडत नाहीत, पण तु आवडतेस.
हे खरं तर खुप contradictory statement आहे, पण खरं आहेच.
रोज काहीतरी emotional पसारा मांडाय़चा नी मग आवरत बसायचा छंद आहे तुला.
आणि परत तु कशी व्यवस्थित नी sorted आहेस दाखवायचा आटापिटा.
काय करावं तुझं?
दुसरयांच्या आयुष्याचा ताबाच घ्यायची सवय तुझी, पण खरच वाटत, देउन टाकावा तुला तो ताबा.
लहान मुली कसं बाहुलीला आपलीच समजुन न्हाऊमाखु घालतात, जेवण भरवुन, तीट लावुन थोपटत निजवतात तसा ताबा सगळ्य़ांचाच घ्यायची तुझी हौस दांडगी ए.
मग तुला राग आला की फटकावायला पण कमी नाही करत.
I enjoy your company .
पण म्हणून हेच "ते" नातं असंहि नाही वाटत मला.
तुला माहित्ये मला ह्या बाबतीत काय वाटतं आणि रोज दुखावली जाताना तुला बघतोय मी.
रोज उन्मळुन पडताना नी तितक्याच जिद्दिनं पुन्हा उभ्या राहणाय़ा तुझं कौतुक आहे मला.
मला सगळच माहित्ये आणि तुला ही , तरी आंधळी कोशिंबीर खेळाय़चीय़ तुला?
तुझ्या ह्या वेड्य़ा स्वभावापाय़ी खेळाय़चाही मोह होतॊ कधीतरी.
पण त्यात मी तुझ्या हाताला लागलो नाही तर चिडाय़चं कशाला?
बघ तुझा रंग लागायला लागलाय माझ्या विचाराना
अशा वेळी time please ला गत्यंतर नाही

क्रमश:

Wednesday, August 11, 2010

बेडूकउडया


अर्धवट उमललेली स्वप्न डोळ्य़ात, असे काही बिलकुल होत नाही बघा आपलं..
असलंच काही तर काल रात्रीची झोप असते उरलेली आणि आपल्याला अर्थातच न दिसणारं मुसळ........
हळुवार , नाजुक, निरागस , निष्पाप वगेरे होत असतं काय काय लोकाना......
त्या सगळ्य़ाची एक रेसिपी असते भरपुर cheese असलेली
आणि cheese तसं खुप लोकाना आवडतं
ह्रिदयाची भाषा नी मनाचे अलवार हितगुज वगेरे जातं आपल्या डोक्याच्या साडे बत्तीस फ़ुट वरुन॥
कारण
आपली स्वप्न पळता पळता fed out होतात..त्यानाच नेमके लागतात No Parking चे boards आणि red signals
मग घ्यावा लागतो u turn आणि परत आपण खुप हिंडुन परत जिथे होतो तिथेच
सापशिडीत आपल्याला साप चावत राहतो आणि त्याना शिड्या लागत राहतात
म्हणून त्याना मोगरा सुचतो आणि आपण अगर मगर करत राहातो

कलासक्त कलोपासक ,सौदर्यशोधक द्रुष्टि आपल्याला हवीच असते की पण ती पेट्रोल च्या नी तुरडाळीच्या
किमती बघुन अधु व्हायला लागते,
मग एक cup coffee की किमत तुम क्या जानो, रमेशबाबु? असल्या कल्पनांमधे सारी सारासार विचारबुद्धि
केट्य़ा खात खात fail होत जाते.
मग आपण जगतो ते सुर्याच्या ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत ,
सकाळ च्या दात घासण्य़ापासुन रात्रीच्या दात घासण्य़ापर्यंतचा आपला
प्रवास.....
चांगला वाईट ह्या सगळ्य़ाच्या पलीकडचा.......
आपण निवडलेला नी system ने approve केलेला......
त्या तोचतोच पणाचा, बुळबुळीत जगण्य़ाचा कंटाळा आला
की जरा चढेस्तोवर दारु प्यायची नी ओकाय़चं
तेवढच जरा बंड केल्यासारखं ही होतं नी हलकं पण वाटतं
पुन्हा मग आपण ह्या भारावणाय़ा, बेभान करणारया , उष्ण कविकल्पनानी भरलेल्या जगात शिव्या घालायला सज्ज होतो
कदाचित शिव्यांनीच भरलेलं जग जास्त स्वच्छ आणि sorted असावं
किंवा पचायला जड असलं तरी आपली धाव च कुंपणापर्यंची असावी.....

Saturday, July 31, 2010

सोचा न था.......


बघु तर काय होतं ते?
आलाय न विचार डोक्यात...मग why not?
आणि त्यावर फ़ार विचार पण नाही करायचा........
कोणालाही काहीही न सांगता दोन चार कपडे, १ २ पुस्तकं नी i pod मीरानं bag मधे टाकले, दादर ला आली...central च्या platform वरुन मिळालेल्या पहिल्या mail मधे चढली....
तिकीट काढण्याचा प्रश्नच नव्हता
तिनं T.C. ला रितसर शोधुन त्याला सांगुन , पैसे भरुन एक जागा मिळवली.

अजीब दास्तां हे ये."..कंहा शुरु कंहा खतम.....ये मंझिले हॆ कौनसी "
हा प्रश्नच हल्ली पडेनासा झालाय आपल्याला , धावतोय नुसतेच सगळ्यांसारखेच, काम तर करतोय पण तेहि त्याच वेळेला तसच तेच तेच करणारे लाखजण आहेत आजुबाजुला...
तसेच्या तसे ५ दिवसांचे आठवडॆ ...त्या frustration चा सुड उगवण्य़ासाठीचा week end....
forget about making difference in other's lives , what about your life? तेवढही जमत नाहिये असं ओरडणाया मनाला तिनं खु्प दिवस झोपेच्या गोळ्य़ा देत ग्लानीत ठेवलेलं....पण ते ही तिचच मन..टोचण्य़ा द्यायचं थांबवेचना.......

train मधली फ़िकट गरम पाण्य़ाची coffee तिला आवडत नाही पण ती सारखी पिते खरी....बहुतेक आयुष्याचही असच झालय काहीतरी बेचव coffee सारखं, काय हवय नी काय घडत ह्यात इतकी तफ़ावत का?
train तिच्या वेगानं धावतेय, कानफ़टात दिल्यासारखा वारा ए...तिनं खिडकी बंद केली नाही म्हणून बाजुचे कोणितरी वैतागलेत .
आता तिनं boss च्या म्हणण्य़ाला हो हो केले नाही ह्यावर त्यानं वैतागण्य़ासारखं काय होतं?तिला लग्न नाहि करायचय इतक्यात ह्यावर आईनं वैतागण्याचं काय कारण?
It's all relative, everything is subjective ह्या गोष्टिचा तिला कितीही राग येत असला तरी खरं होतचं की ते
नाहीतर पचकन गाडीतच थुंकणारया माणसाला तिच्या चेहरयावरची आठी पाहुन "आता ह्यात काय होतं वैतागण्य़ासारखं" असा प्रश्न पडला नसता....
तिला एका बाईनं मधेच विचारलं..कुठे चाललीय़ ती....इतक्या अपरात्री..अवेळी..एकटीच ? बाईंमाणसानं असं एकट्य़ानं बाहेर पडणं कसं असुरक्षित आहे..वगेरे वगेरे
असे कसे नियम ठरले असतील जगातल्या वेगवेगळ्य़ा कोपरयात रहाणारया माणसांचे? आणि ह्या सगळ्य़ा अलिखित नियमाना मी का बांधिल?की आपल्याला नियम तोडण्य़ापुरताच कुतुहल आहे ह्या सगळ्याबद्दल?
train मधेच थांबते ...signal नाही म्हणुन....रात्र झालीय़..सगळेजण आपापल्या कुलपं लावलेल्या सामानाला सांभाळत झोपलेत....
आयुष्य ही असंच थांबलय ...green signal व्हायची वाट पहात..रेंगाळत.....आणि signal चा निर्णय परिस्थितिकडेच आहे की आपण घेत नाहीयोत?
college मधे असताना एकदा तिनं आणि मैत्रेयीनं असा वेडेपणा केला होता....सलग दोन दिवस अजिबात न आवड्णारय़ा गोष्टि केल्या..म्हणजे मिथुन चे पिक्चर बघ, politics च्या सगळ्य़ात boring prof ची lectures attend कर, शेपुची भाजीच कर असले प्रकार ..आणि मग लक्षात आलं की आरेच्या......हे वाटलं होतं तितकं boring नाहीचे....
मग कशाच्या आधारे बनलीय़त मतं?
कुठलाही पदार्थ बनण्य़ापुर्वीची procedure trial and error चीच असेल नं? म्हणजे ज्या कोणि पहिल्यांदा पुरणपोळी केली असेल त्याला काय direct साक्षात्कार झाला नसेलच नं?
पण म्हणुन काय सगळ्य़ानीच पुरणपोळ्य़ा बनवाव्यात?
आपापल्या आयुश्यात experiment करायला समाजाचा कसला आड येतॊ विरोध आणि भिती कसली वाटते एवढी?
वाटेल तशा जगण्य़ाची एक झिंग असते नी तीच विसरायला लागलोय असं वाटून घाबरुन ती आज बाहेर पडलीय़....
एका station वर उतरते रात्री अडीच ला वगेरे.....पिवळे मंद दिवे आहेत आणि झोपलेलं station...i pod कानात घालुन शांतपणे waiting room मधे बसलीय़
इस मोड से जाते हे कुछ सुस्त कदम रस्ते ..कुछ तेज कदम राहे....
एकुण सगळाच कसा विरोधाभास ? आपलाच आपल्या वागण्य़ाशी, विचारांशी ताळमेळ नाही? आपलं आपल्याशीच पटत नाही?
जरा उघडू लागल्यावर बसनं गावात आलीय़...एका lodge मधे जाउन फ़्रेश होउन पुन्हा बाहेर पडतेय....
त्या गावाबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळं काळं गोरं मत नाही आहे ती फक्त उत्सुकता......
असंच असावं नाही सगळ्य़ाच आयुष्याबद्दल....?
गाव चक्क ऐतिहासिक महत्त्व वालं निघालय....ती माती हातात घेते ...भुतकाळाला का वाटलं असेल इथेच जन्माला यावे? actually वास्तुसंग्रहालय वगेरे जरा bore व्हायच तिला एरवी ...पण live match पहातानाची एक वेगळी गंमत असते तसं काहीसं वाटतय तिला.....
गावातल्या काही sites ला ह्या भुतकाळाचा शोध घ्यायला आलेले संशोधक आहेत ..त्यांच्या त्यांच्या कामात गुंग झालेले..त्याना ह्या उत्खननातुन इतिहासातल्या माणसाच्या स्वभावाचे काही धागेदोरे लागत असतील? मानवी मनाच्या उत्क्रांतीचे पुरावे सापडत असतील का? मुळात मनाची उत्क्रांती झाली असेल का? की २७०० वर्षांपुर्वीची अशीच असेल मीरा....confused ?
वेळ जातोय आपला त्याचा त्याचा..आज तिची ही तक्रार नाही नी त्याचीही....perfect harmony .......एका मोडकळीला आलेल्या जुन्या हवेलीमधे जातेय.....सगळं काही black and white असल्याचा उगाच feel येतोय ...black and white म्हटल्यावर तिला उगाच nostalgic व्हायला होतं....गेलेल्या वर्षांची जातानाची सळसळ, उरलेले सल अंगावरुन नुकत्याच सरकवलेल्या पांघरुणासारखे पायाशी जाणवतायत....
वर एका खिडकीपाशी जाउन बसलीय़ जिथुन अक्खे गाव दिसतय..परत अंधारात मिटु पहाणारं...
i pod वर मधुशाला लागलय.....साकी हा शब्द आवडाय़चा म्हणून तिला कधीतरी प्यायला ही आवडाय़चं...पण खंर तर प्रत्यक्ष पिण्य़ापेक्षा तिला तो माहोल जास्त भावतो....
अत्ता ही तिच्याकडे beer आहे.....खिडकीच्या कठड्य़ाला रेलुन ती निवांत बसलीय़..नुकतच उगवणारं चांदण पहात.....
मुंबईत पण उगवतं ते पण लक्ष नाही जात खरं ...किंवा मधेच कधीतरी लक्षात येते की मुंबईला पण तिचं ति़चं आकाश आहे ...जमिनीवरुन चालता चालता त्याच्याकडे दुर्लक्ष होतं खरं........
beer आता जराजरा भिनु लागलीय़....

shall I acompany you?-

गंमत म्हणजे तिला दचकायला होत नाही.

तो तिनं काही म्हणाय़च्या आत तिथं बसतोहि...

इथे परवा आम्हाला एक तांब्याचा अलंकार मिळाला तु घातलं आहेस ना गळ्य़ात तसा......तो

oh......मग मी कदाचित काही शतकांपुर्वी हरवला असेन , नाहीतरी मी गेले अनेक ज्न्म वेंधळी आहेच......मीरा

हं...तसा तुझा चेहरा ही मला ऒळखीचा वाटतोय.....तो

बापरे..मग थोड्य़ा वेळानं तु मलाच इतिहासजमा करशील......मीरा

not a bad idea actually.......हवेलीच्या खिड्कीपाशी एक मोठ्या डोळ्य़ांची, काजळ घालणारी, नाकात रिंग घालणारी आणि सोमरसाचं प्राशन करणारी एक बाई दिसते हल्ली.....अशी दंतकथा....

सोमरस पेक्षा साकी जास्त छान वाटतो नं शब्द?- तो

उगाचच तो खुप ओळखीचा वाटतोय.....

तु घेणार?- मीरा

नाही..मी vodkaa आणलीय़ सोबत....बाकी सगळं होतं company सोडल्यास....ती ही मिळाली.....बस और क्या चाहिये.....?- तो

तो त्याच्या उत्खननाबद्दल non stop बोलत राहतो...ती ऐकतेय.....
मधेच एक छान गझल गुणगुणतो....ती गुलजार ची कविता ऐकवते.......
दोघं बोलतायत अथक.....
बोलता बोलता कधी हवेली फ़िरुन झाली ते कळत नाहीय़े........

मग त्याला वाटतं.....हा त्या हवेलीचा अपमानच..मग तो पुन्हा एकदा तिला त्या हवेलीच्या इतिहासात फ़िरवुन आणतो......

इतिहास रंजकच वाटतो ,ना?- मीरा
कारण आपण तो जगलेलो नसतो....so it kinda gets easy to praise and feel it, doesnt make sense though -
आणि भविष्य ही छान उज्जवल वगेरे मानायची पद्धत असते.....तो
वर्तमानाचीच काहीतरी गोची होते.....मीरा
कारण. ...we are never fair with present......बघ ना, आता आपण भॆटतॊ आहोत ते आजच नं, वर्तमानातच ना........and we are celebreting it, with beer and vodka. thats how it should be, by the way माझी संपत आलीय़ .....घेउन येउयात ? - तो
दोघं चालतायत..आता न बोलता......काही वेगळ्य़ा भावना आणि कल्पना मनात खेळवत.......

हे ही तसं जुनच आहे म्हणा, opposite sex बद्दलचं attraction ......एरवी तिनं ते दिसु दिलं नसतं पण हे वेगळं आहे, ते पुढे कसं रुप घेइल ते माहित नाहीय़े..पण आत्ताच्या दोघांच्याही भावना ते लपवत नाहीयेत.....त्याचे पुढे काय व्हावे असं काही मनात न बाळगता दोघं चालतायत......

त्याच्या quarters पाशी आल्यावर तो जरासा रेंगाळतोय......
बोलु न बोलु अशा विचारात.....
मीरा कडॆ ठळकपणे पहात ..तिच्या जवळ जात म्हणतो....तुझा मोह पडलाय मला....आधी एवढ्याच साठी म्हणतोय की अजुन जरा ताब्यात आहे तुझ्या feelings चा विचार करण्य़ाइतका, तुझ्या मताचा respect करुन अजुन काही क्षण मोह टाळण्य़ाइतका....आत य़ावं न यावं ..तुझा निर्णय आहे आणि १०० ट्क्के मान्य आहे..पण माझ्या मनाला व्यक्त व्हायचाही तितकाच अधिकार आहे......तु माझ्याबद्दल काय विचार करतेस हा तुझा प्रश्न आहे....
ती त्याच्याकडॆ पाहतेय
त्याच्याकडे आवेगानं उसळी घेउ पहाणारया तिच्या अणुरेणुना विरोध करावा , असं सतत morality चे dose देणाघेणारया तिच्या मनाला वाटलं नाहीये.....
पुढच्या क्षणाला ती दोघे आपापली राहिली नाहीयेत,,,त्याच्यात हरवुन , अडकून, त्याच्या मिठीत निर्धास्तपणॆ विसावताना तिला वाटतय
.....ह्या हुन सुंदर काही असुच शकत नाही........

दुसरया दिवशी भल्या पहाटॆ त्याच्या कुशीतुन अलगद उठुन बाहेर पडण्य़ापुर्वी त्याला एकदा डॊळेभरुन पाहतेय......
विचारांच्या वेगात अडकायच्या आधी station वर येउन परतीच्या गाडीत बसलीय़...इथवर जे घडलं ..that was destiny ,
...ह्याउपर जे घडेल तो ही त्या नियतीचाच निर्णय़ असेल.....
भरकटलेल्या मनाचा आता प्रश्नच नाही .....आता ती त्याची जबाबदारी......!



Tuesday, July 20, 2010

random

पार्ट 1
संध्याकाळी..७ २३ ची विरार लोकल
" ए, ती मुलगी काय solid दिसतेय ना"? राही
माहित नाही , मी straight आहे......सना
१२ व्या शतकातला विनोद आहे -राही
१२ व्या शतकात ही gay, lesbians होतेच......सना
well, त्याच्याशी माझं काहि देणे घेणे नाहिये......इथे चायला एक बरा मुलगा दिसत नाहि अख्य़ा दिवसात....राही
कारण तु मुलींकडे बघत असतेस, मला तर दिसतात बुवा बरी मुलं....सना
हां.....तु ज्याना बरं म्हणतेस ना ते तेच लोक असतात ज्याना मी "दारिद्र्यरेषेखालील" समजते....
आणि मुलींकडे बघते त्याला rivalry म्हणते मी, कळाय़ला पाहिजे ना सध्या कशाला विकेट पडतेय मुलांची?....राही
मुलांची विकेट रामायण ,महाभारताच्या काळापासुन ठराविक गोष्टिनाच पडत आलीय़....सना
I don't think so, कारण नाहीतर तुझ्यात कशाला कुठल्या मुलाने interest घेतला असता?.....राही
तु नक्की कोणाचा insult करतेयस?.......सना
forget it, ते महत्वाचे नाही...
मला सांग , मुलांमधे नाहितरी बघण्य़ासारखं काय असतं?म्हणजे बघ , मुली प्रेक्षणीय़ असतातच , ज्या असतात त्या ..पुर्ण कपड्य़ात असल्यातरी.....राही
what do you mean?...सना
अरे मुलींकडॆ बघुन कसं प्रसन्न वगेरे वाटू शकतं, मुलांकडॆ बघुन तसं काहीच वाटत यार.....म्हणजे मुलं कशी नाक्यावर उभी राहुन मुलींकडॆ बघत शिट्ट्य़ा मारतात किंवा comments करतात, तसं मुलीना करायला कुठाय scope?......राही
सोन्ये, तुझे big time brain washing करावं लागणार असं दिसतय.....परवा college मधे त्या professor वर कोण line मारत होतं?as far as शिट्टी मारणं किंवा eve teasing is concerned , तिथं जरा conditioning चा परिणाम ए ..म्हणजे मुलीना ही निश्चितच आवडेल...पण आत्त्ता हिम्मत नाहि, कारण पद्धत नाही ना तशी....सना
शी...मला नाही मजा येणार बरा मुलगा दिसल्यावर शिट्टि वाजवायला.....राही
मग तु काय करशील?....सना
अं.......बघेन त्याच्याकडे.........राही
अग बये, ते तर तु आत्तापण करतेस...सना
हो पण आत्ता चोरुन बघते....राही
का?.....सना
असं कसं direct?....राही
आं.....एखादया मुलाला तु आवडलीस [chances are very few though] तर ते तुला कसं कळतं,?...... सना
अरे ,तो बघत असतो....राही
ते तुला कसं कळतं आणि...?, hyppocrite . तुझ्यात हिम्मत नाही , असं म्हण की..सना
माझ्यात? मी रात्रि अडिच ला एकटि येते .......राही
त्याचा काय संबंध?. सिगरेट ओढतेस वाटली म्हणून? दारु पितेस सहज ? मनात आलं म्हणून किंवा try करायला काय हरकत ए म्हणून one night stand?..........सना
अरे आत्ता तु रस्ता भरकटतेयस......राही
अरे पण भरकटला रस्ता तर काय बिघडलं?......सना
माझा मुद्दा वेगळा आहे, ह्या ज्या गोष्टि तु म्हणतेयस त्या irrespective of gender , चुकच आहेत.....राही
कोणि सांगितलं?तु करुन पाहिलय का? स्वत:ला नाही साधा शिवी द्यायचा अनुभव....सना
ए बाई, logically भांडणार असलीस त बोल., शिव्या ज्या कोणाला देणार त्याला , तिला त्यांच्या आई, बहिणींवरुनच ना?
थेट पुरुषाला उद्देशून कोणत्या शिव्या आहेत? म्हणजे हे पण एक प्रकारचं conditioning च आहे , नं?.....राही
तुझ्यातली आदिमाया जागी झालीय़ का? keep it simple, मुलीना ही line मारायला तितकच आवडतं[तुलापण]जितकं मुलाना आवडतं...सना
परत तुला कळत नाहिये, मुलं कशी वरपासुन खालपर्यंत निरखतात मुलीना, तसं मुलीना कुठाय scope?.......राही
वेल, तुला ज्या मुलाना तु आवडावीशी वाटतेस ती मुलं असं नाही करत [ ह्याचा अर्थ ते त्यांच्या मनात येत नसेलच असा अजिबात नाहि, ]
पण निदान ते असं दाखवणार नाहीत....., च्यायला life मधला निम्मा वेळ आपण कसे त्या गावचेच नाही ,दाखवण्य़ात जातो...
मनात येते वाट्टेल ते, येणारच, नाहि नाहि केलत तर आणखी य़ेणार..... तेव्हा मान्य करुन टाकावं, चुक बरोबर कशाला त्या भानगडित पडा?
मी चिराग च्या प्रेमात होते , तेवा काय रस्याने जाणारा handsome मुलगा डोळ्य़ाआड नव्हते करत.......सना
बाई, आता त्या प्रेमाच्या कुरणात नकॊ शिरुस....राही
कुरण..?.जंगल आहे बये ते, हरवायला मजा येते त्यात .....big time- सना
ते brainwashing उद्या कर, station आलं माझं
bye....

Friday, July 9, 2010

यु होता तो क्या होता

What if?

आठवडाभर हा तुफ़ान कोसळत होता.....पण लोक म्हणतात तसा शहाण्यासारखा...रात्री मन लावुन गपगुमान पडत राहायचा.
मी नुसती आशेत राहायचे की दिवसाही ह्याचा द्वाडपणा चालु राहील,पण पठ्ठ्या नाव काढेना... मग माझ्या लक्शात आले की त्याला माझ्या हातातली छत्री डाचत असणार....
मग मी त्याला promise केले कि बरं बाबा आठवडाभर तुला छत्री नाही दाखवत....खिडकीतुन बघता बघता पाउस मग झोपुन गेले.....
दुसरा दिवस ही आदल्यासारखाच जाणार असं ग्रुहित धरुन निघाले आणि ऐन रस्त्यात ह्याला माझ्यावरचं प्रेम दाखवायची हुक्की आली....
पण गाठ त्याची होती माझ्याशी....आणि हम किया वादा कभी तोडते नही...
मग सुरु झाली आमची गंमत..छत्री तर घ्यायची नाही पण meetings ना जाताना भिजुन जाणं शक्य नव्हतं.नी पाउस जाईस्तोवर आडोशाला थांबणं हा त्याचा केवढा अपमान...
मग डोक्यात किडा शिरला....
मी छ्त्री नाही नेणार पण आता इतर कोणी छत्रीतुन सोडत असेल तर काय हरकत आहे...?पर कहानी मे twist तो चाहिये नाहीतर काय मजा?
so माझं मी असं ठरवलं की Lift तर घ्यायची पण अनोळख्या माणसांची.......
वेळ खुप होता तेव्हा एखाद्या ठिकाणी उभी राहुन छ्त्र्या निरखाय़च्या ,जी छ्त्री आवडेल तिच्या मालकीणीला विचारायचं, बाई गं जरा taxistand or bus stop पर्यंत सोडतेस कां गं?
मुळात ही idea सुचली तेव्हा खुप भारी वाटली ..पण apply करणं जरासं complicated च नाही का?
पण why ला उलटपक्षी why not विचारुन टाकलं नी त्याचा परस्पर काटा काढला...
गंमत म्हणजे सगळ्य़ानी अगदी सहज company दिली...
त्या ७ दिवसात मला ६ जणी भेटल्या.
station पासुन फ़ार तर ८ १० मिंटाच्या रस्त्यातल्या गप्पा surprising ली खुप interesting ठरल्या...
पहिल्यांदा भेटली मंगल ,तिची छत्री काळीच होती पण तिनं मस्तपैकी पिवळ्य़ा रंगाची साडी नेसलेलीन...
गच्च भरलेले आभाळ, धोधोळणारा पाउस ह्या सगळ्य़ात तिची पिवळी साडि इतकी जमुन गेली होती..
मंगल, सानिका, जोशीकाकु, ७ वी त प्रिया, हर्शदा आणि ज्यॊती..
ह्या सगळ्यांबरोबरचा तो walk म्हणजे short film सारखा experience होता..
प्रत्येकीची एक एक गोष्ट ,
एखादी लकब,
काहीतरी आवड निवड
आणि of course त्यांच्या छ्त्र्या....how can I forget those colours, designs , prints and feel
in short हा लय भारी experience ठरला.....
ठरल्याप्रमाणं वचन पाळाय़चा last day...
घरातुन जाताना सारं काही आलबेल होतं पण Churchgate ला पोचले नी बेट्या जो form मधे आला की छत्री काय ,इतर काही असतं तरी न भिजणं अशक्य होतं...मग विचार केला ब्येस्ट पैकी भिजुन marine drive वरच का जाउ नये?
मग भिजत निघाले ..
रस्ता cross करुन डावीकडून आपली रमत चालले होते , एक माणूस समोरुन चालत गेला....थोडा पुढे जाउन परत मागे आला....
Excuse me?
मी मागे वळून पाहिलं.....
कायच्या काय handsome होता तो....
मी बहुतेक फ़ारच blanck look दिला असणार...
should I drop you till the bus stop?
इथे कोणाला हवा होता bus stop, पण त्याच्या मोठ्ठ्या पांढरया छ्त्रीतुन जायची offer कशी सोडावी..?
मग निघालॊ आम्ही....
आम्ही दोघे...पुढंच काही न दिसणारा रस्ता....रपारपा पाउस.
छ्त्री मोठी होती पण पाउस काय कमी आगाउ?
भिजलोच मग खुप...!
मधेच मी त्याला म्हटले...बास, इथवर सोडलस तरी चालेल...मी actually भिजायलाच आलेय..
त्याने पाहिलन माझ्याकडे नी १ क्षण विचार केलान .छ्त्री बंद करुन म्हणाला....., ok, let's go..
marine drive ला गेलो,
खुप गप्पा मारल्या...
इतकं भिजल्यावर coffee obvious होती
मग घडाघडा खुप बोलल्यावर मधेच एक awkward pause गेला..
meanwhile पाउस पण ऒसरला[ इथवर केली मी मदत..आता तुझी तु म्हणत exit च
मारलीन बेट्याने ]
उठ, उठ, उठ [ माझं मन बॊंबलत warn करत होतं, पण तो फ़ारच मस्त होता नी हुषार पण]
पण तरी उठलेच मग, निघते म्हणाले....
निघाल्यावर तो बिलंदरपणे म्हणाला -oh, पण परत लागला तर पाउस?[ हुषार असल्याचं त्यानं लग्गेच सिद्ध केले]
एक काम कर..ही छ्त्री ठेव तुझ्याकडॆ , मी काय इथेच राहतो university जवळ
नंतर दे कधितरी....
आणि मग निघाले मी...
पण पावसाला दिलेले promise इमानेइतबारे पाळल्याबद्दल मिळालं की बक्षिस.....
पांढरी छत्री....
हां...पण ती ज्याची आहे त्याला द्यायला जाइन लवकरच...
क्यु कि किया वादा हम कभी तोडते जो नही....
[महत्त्वाची सुचना- मंगल हे पात्र सोडल्यास,ही कल्पना की ऊडान आहे ,नाहीतर what if म्हणावं लागलं नसतं]